Maharashtra Rain: 'पुरग्रस्तांना मदत करा, प्राण्यांना चारा पुरवा..', CM फडणवीसांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी तातडीने मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थिती जाणून घेतली.

जाहिरात
Read Time: 2 mins

 मुंबई: मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. गावांमध्ये पाणी शिरल्याने संपर्क तुटला असून प्रशासनाकडून मदतकार्य सुरु आहे. दुसरीकडे या गंभीर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित मंत्री प्रत्यक्ष पाहणी करत आहेत. या संपूर्ण परिस्थितीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही लक्ष असून ते सातत्याने परिस्थितीचा आढावा घेत आहेत. 

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी तातडीने मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थिती जाणून घेतली. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव आणि परभणी या जिल्ह्यांसह सोलापूर येथील जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश होता. मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक ठिकाणी सुरू असलेल्या मदतकार्याच्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेतला आणि आवश्यक सूचना केल्या.

Emergency असेल तरच घराबाहेर पडा! राज्यातील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट, तुफान पावसाचे संकेत

त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदत शिबिरांमध्ये भोजन, पाणी आणि आरोग्य सुविधांची योग्य व्यवस्था राखण्याचे कडक आदेश दिले आहेत. विशेषतः काही जिल्ह्यांमध्ये चारा टंचाईची (Fodder Scarcity) समस्या असल्याने, पशुधनाच्या संरक्षणासाठी तातडीने चारा पुरवठा करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. 

दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी जलसंपदा विभागाकडून राज्यातील विविध भागातील धरणांच्या विसर्गस्थितीचा आढावा घेतला असून, स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधत आणि सतर्क राहून काम करण्याचे आदेश जलसंपदा विभागाला दिले आहेत. यामुळे मदत शिबिरात आधीच स्थलांतरित नागरिकांना तेथेच थांबविण्यात आले आहे.

Advertisement