
दिवाकर माने
मागील काही दिवसांपासून मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस होत आहे. विशेष म्हणजे मुसळधार पाऊस कोसळत आहे. हा मान्सून असून त्याचे वेग वेगळे पॅटर्न सध्या सामोर आले आहेत. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात असलेल्या हवामान विभागाचे प्रमुख डॉ. कैलास डाखोरे यांनी या मागचे कारण सांगितले आहे. सध्या मराठवाड्यात अनेक ठिकाणी ढगफूटीजन्य परिस्थिती आहे. याबाबत डॉ. कैलास डाखोरे यांनी सविस्तर विश्लेषण केले आहे.
ढगांमध्ये पूरक परिस्तिथी ज्यात भरपूर बाष्प आहे. हवेत कमी दाब, ज्याच्यामुळे ढगातील बाष्प एकसोबत थंड होऊन कमी वेळात मोठा विसर्ग पाण्याचा होतो असं डाखोरे यांनी सांगितलं आहे. मान्सून टर्फ ज्याच्या मुले ढगात असलेला ओलावा आणि कमी दाबाच्या वाऱ्यामुळे ढगात वारंवार होणारी वीज निर्मिती आणि ढगाचे मोठ्या संख्येने विखरणे यामुळे ही मोठा पाऊस होते असं त्याचं म्हणणं आहे. ऍक्टिव्ह असलेल्या कमी दबावाच्या हवेने एकसोबत एखाद्या परिसरात या ढगातून मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय, असं ही त्यांनी सांगितलं.
तर आजच्या निर्देशनात 'ऊर्ध्वस्थळ चक्रीवाताचे भोवरे' ज्याला आपण The upper tropospheric cyclonic vortices असं देखील म्हणतो, याचा अभ्यास करत असताना मराठवाड्यात दोन जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट तर आहे. परंतु त्यासह पुढील काही दिवसात देखील हलक्या ते मध्यम हलक्या प्रकारचा मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे, असं मत परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे हवामान तज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी मांडले आहे. मराठवाड्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाचा जोर वाढलेला दिसत आहेत. त्यातून ढगफूटीसारखी स्थितीही काही ठिकाणी निर्माण झाली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world