2 days ago

Maharashtra Rain LIVE Updates: राज्यात मान्सूनची एन्ट्री झाल्यानंतर पावसाने धुमाकूळ घातला आहे. गेल्या चार दिवसांपासून मुंबई, पुण्यासह राज्यभरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये नदी, ओढे, धरणे तुडुंब भरले असून बारामती, इंदापूर, पंढरपूरमध्ये पुराचा फटका बसला आहे. दुसरीकडे पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाल्याचे पाहायला मिळाले. आज मुंबई, ठाण्यासह रायगड रत्नागिरीला रेड अलर्ट देण्यात आला आहे. 

May 27, 2025 22:53 (IST)

महाराष्ट्रातील सहा मान्यवर पद्म पुरस्काराने सन्मानित

विविध क्षेत्रांमध्ये  अतुलनीय काम करणाऱ्या  68 मान्यवरांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते  देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या ‘पद्म पुरस्कारां’ ने सन्मानित करण्यात आले. यात महाराष्ट्रातील  सहा मान्यवरांचा  समावेश आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात राष्ट्रपती यांच्या हस्ते दुस-या  व अंतिम टप्यात पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, तसेच अन्य केंद्रीय मंत्रीगण  व केंद्र शासनातील  वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या पुरस्कार समारंभात राज्यातील सहा  मान्यवरांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी लोकसभा अध्यक्ष डॉ .मनोहर जोशी  यांना सार्वजनिक क्षेत्रातील योगदानासाठी ‘पद्मभूषण पुरस्कार’ (मरणोत्तर) तर  अशोक सराफ, अच्युत पालव , अश्विनी भिडे-देशपांडे यांना कला क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी तसेच कृषी क्षेत्रातील भरीव कामगिरीसाठी सुभाष शर्मा व वैद्यकीय क्षेत्रातील उत्तम कार्यासाठी डॉ. विलास डांगरे यांना  पद्मश्री पुरस्काराने राष्ट्रपती यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

May 27, 2025 22:19 (IST)

ACB च्या जाळ्यात अडकलेल्या उप जिल्हाधिकाऱ्याच्या घरात घबाड सापडलं

छत्रपती संभाजी नगरचे  निवासी उप जिल्हाधिकारी तथा अपर जिल्हा दंडाधिकारी  विनोद गोंडुराव खिरोळकर हे एसीबीच्या जाळ्यात सापडले. त्यांच्यावर सव्वा कोटीची लाच मागितल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्याचा एक हाफ्ता घेताना त्यांना रंगेहात पकडण्यात आलं आहे. त्यानंतर त्यांच्या घरी झडती घेण्यात आली. त्यात मौल्यवान मालमत्ता मिळून आली आहे. घरात एसीबीला रोख रक्कम-13,06,380, सोन्याचे दागिने - 589 ग्रॅम, किंमत अंदाजे 50,99,583 रुपये, या शिवाय चांदीचे दागिने 3 किलो 553 ग्रॅम, किंमत 3,39,345 ऐवढी आहे.  मौल्यवान वस्तू व रोख रक्कम अशी एकूण  किंमत 67,45,308 रुपये मिळून आहे.

May 27, 2025 21:57 (IST)

भंडारा जिल्ह्यात वीज पडून दोघांचा मृत, अन्य दोघे जखमी

आज सायं. 06.00 वा. भंडारा जिल्ह्यातील तालुका पवनी येथील खांबडी शेतशिवारात धान कापणी करीता आलेले हार्वेस्टर मशीन वरील कामगार व शेतकरी महिला पुरूष यांच्या अंगावर वीज पडून ते जखमी झाले. तर दोन जणांचा यात मृत्यू झाला आहे. 

May 27, 2025 20:30 (IST)

लातूर जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस

लातूर जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झालेला आहे. तर लातूरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये थेट पाणी शिरल्याने तळ्याचे स्वरूप आले. शहरातल्या अनेक भागांमधील  रस्ते जलमय  झाले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना या रस्त्यातून मार्ग काढताना अनेक अडचणींना सामना करावा लागतो. तरी या पावसाने थेट लातूरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात पाणी साचल्याने जलमय झाले आहे.

Advertisement
May 27, 2025 19:16 (IST)

काशीमिरा पोलिसांनी 70 किलो गांजा केला जप्त

मिरा भाईंदरमध्ये काशीमिरा पोलिसांची मोठी कारवाई केली आहे.  काशीमिरा पोलिसांनी 70 किलो गांजा जप्त केला आहे.  बाजारभावप्रमाणे गांजाची किंमत तब्बल 14 लाख रुपये आहे.  भिवंडी वरून चौघे गांजा तस्करी करत असल्याची माहिती  मिळाली. या प्रकरणी एकूण चार आरोपींना अटक करण्यात आले. 

May 27, 2025 19:07 (IST)

दक्षिण बस्तर विभागात सक्रिय असलेल्या 4 कट्टर नक्षलवाद्यांसह एकूण 18 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

दक्षिण बस्तर विभागात सक्रिय असलेल्या 4 कट्टर नक्षलवाद्यांसह एकूण 18 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. छत्तीसगड सरकारने आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांवर एकूण 39 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. छत्तीसगड सरकारच्या "छत्तीसगड नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण पुनर्वसन धोरण" आणि "नियाद नेल्ला नार" योजनेचा प्रभाव आणि अंतर्गत भागात सतत नवीन सुरक्षा छावण्या उभारून पोलिसांच्या वाढत्या प्रभावामुळे हे आत्मसमर्पण करण्यात आले.

Advertisement
May 27, 2025 19:03 (IST)

न्यायमूर्ती नितीन सांबरे यांची दिल्ली उच्च न्यायालयात बदली

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात कार्यरत न्यायमूर्ती नितीन सांबरे यांची दिल्ली उच्च न्यायालयात बदली.

May 27, 2025 19:01 (IST)

नागपूर हिंसाचारातील मुख्य आरोपी फहीम खानला जामीन फेटाळला

नागपूर शहरात 17 मार्च रोजी घडलेल्या हिंसाचाराचा प्रमुख आरोपी फहीम खान याचा जामीन अर्ज  फेटाळण्यात आला आहे.  जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीमती पवार यांनी अर्ज फेटाळला आहे. समाज माध्यमांवर आणि प्रत्यक्ष चिथावणी देऊन लोकांच्या भावना भडकाविल्याचा आणि देशद्रोहाचा आरोप त्याच्या वर आहे.

Advertisement
May 27, 2025 17:33 (IST)

गावातील ओढ्यात 3 जण गेले वाहून , लहान मुलीचा मृतदेह सापडला, नांदेड येथील घटना

नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात एका ओढ्याला अचानक आलेल्या पुराने दुर्दैवी घटना घडली आहे. या पुराच्या पाण्यात एक महिला आणि दोन लहान मुली वाहून गेल्या आहेत. ही घटना आज दुपारी दीड वाजताच्या सुमारास हदगाव तालुक्यातील वरवट गावात घडली. अरुणा शक्करगे ( वय 35 वर्ष) या त्यांची मुलगी दुर्गा वय 8 वर्ष आणि पुतणी समीक्षा हिच्या सोबत शेतात होत्या. यावेळी जोराचा पाऊस सुरू झाला.  पाऊस लवकर थांबणार नाही असे वाटल्याने त्या शेतातून घराकडे निघाल्या. पण रस्त्यात ओढ्याला पूर आलेला होता. त्याच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तिघीही त्यात वाहून गेल्या. घटनेची माहिती मिळताच प्रशासन तिथे पोहोचले आणि शोध सुरू झाला. दरम्यान 8 वर्षीय दुर्गाचा मृतदेह सापडला आहे. अजून दोघी बेपत्ता आहेत.

May 27, 2025 17:12 (IST)

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवली

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवली आहे.  31 जुलै 2025 ची डेडलाईन दीड महिन्याची वाढ करण्यात आली आहे.  आता 15 सप्टेंबर 2025 पर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न भरता येणार आहे.  केंद्रीय प्रत्यक्ष कर विभागाने ही महत्वाची घोषणा केली आहे. 

May 27, 2025 16:58 (IST)

सव्वा कोटींची लाच घेताना उपजिल्हाधिकारी ACB च्या जाळ्यात

संभाजीनगरमध्ये उपजिल्हाधिकारी आणि त्यांचा स्विस सहाय्यक ACB च्या जाळ्यात अडकला आहे. एक प्रकरणात तब्बल सव्वा कोटींची लाच मागितली असा आरोप केला होता. त्या लाचेचा पहिला हफ्ता घेताना स्वीय सहायकाला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. तर निवासी उपजिल्हा अधिकारी यांना ही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. विनोद खिराळकर असे उपजिल्हाधिकारी यांचे नाव आहे.

May 27, 2025 16:11 (IST)

नंदुरबार शहरात भाजप आणि शिंदे शिवसेना वाद पुन्हा चव्हाट्यावर

कामगार कल्याण योजनेचे संच वाटपा वरून शिंदे सेना व भाजप हे आमने-सामने आलेले पाहायला मिळाले. माजी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित व शिंदे सेनेचे विधान परिषद आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे पुत्र राम रघुवंशी भांड्यांच्या संच वाटपावरून वाद झाला. नंदुरबार मध्ये श्रेय वादातून शिंदे सेना व भाजपाचा वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले. 

May 27, 2025 16:08 (IST)

घनसावंगीत तुफान पाऊस,बोडखा बुद्रुकमध्ये पूर परिस्थिती, बोडखा-घनसावंगी संपर्क तुटला

घनसावंगीत तुफान पाऊस,बोडखा बुद्रुकमध्ये पूर परिस्थिती, बोडखा-घनसावंगी संपर्क तुटला

जालन्यातील घनसावंगी तालुक्यात आज दुपारच्या सुमारास तुफान पाऊस झालाय.तालुक्यातील मांदळा, खडका,चिंचोली, बोडखा बुद्रुक भागात पावसानं जोरदार हजेरी लावली.या पावसामुळे बोडखा बुद्रुक गावातील  नारोळा नदीला पूर आला असून बोडखा बुद्रुक गावचा घनसावंगीशी असलेला संपर्क तुटला आहे.

May 27, 2025 14:25 (IST)

LIVE Updates: सलमान खाननंतर अभिनेता आदित्य कपूरच्या घरात अज्ञात महिलेचा प्रवेश

अभिनेता सलमान खाननंतर आता अभिनेता आदित्य रॉय कपूर याच्या घरात केला अज्ञात महिलेने प्रवेश

आदित्य रॉय कपूर याच्या वांद्रे निवासस्थानी अनोळखी महिलेने केला प्रवेश

गजाला सिद्दिकी नावाच्या महिलेचा ती आदित्यची फॅन असल्याचा दावा

आदित्यचे कपडे आणि भेट देण्याच्या नावाखाली महिलेने केला घरात प्रवेश 

दरम्यान आदित्य रॉय कपूर घरी आले असता महिने केला त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न 

खार पोलीस ठाण्यात महिले विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३३१(२) अंतर्गत गुन्हा नोंद

May 27, 2025 14:24 (IST)

LIVE Updates: मुंबई विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावराला बॉम्बने उडवून देण्याची धमकी 

मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन

अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

May 27, 2025 11:35 (IST)

LIVE Updates: विजेचा शॉक लागून बाप लेकाचा मृत्यू

विजेचा शॉक लागून बाप लेकाचा मृत्यू

गेवराई तालुक्यातील मारफळा येथील घटना

वादळी वाऱ्यात विजेची तार शेतात पडली होती

सकाळी शेतात खत देताना लागला विद्युत शॉक

May 27, 2025 11:05 (IST)

LIVE Updates: अमित शाह यांच्या दौऱ्यात बदल, नियोजित कार्यक्रम रद्द करुन दिल्लीला जाणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नियोजित महाराष्ट्र दौऱ्यात बदल.. पद्य पुरस्कार सोहळ्यामुळे अमित शाह हे दिल्लीला रवाना होणार आहेत. 

May 27, 2025 10:40 (IST)

Maharashtra Corona Updates: राज्यात 69 कोरोना रुग्णांची नोद

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. राज्यात आज 69 नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली आहे. 

मुंबईत -37

पुणे मनपा - 2

पिंपरी चिंचवड मनपा -1

ठाणे -19

लातुर मनपा -1

नवी मुंबई- 7

रायगड -1

कोल्हापूर -1

May 27, 2025 09:24 (IST)

LIVE Updates: गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या मालकीचा ऐतिहासिक वाडा पाडला

गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या मालकीचा साताऱ्यातील किन्हई येथील ऐतिहासिक वाडा पाडला

संबंधित वाडा पेशवेकालीन

पडझड झाल्यामुळे वाडा पाडल्याचे सांगितले जाते

10-15 वर्षापूर्वी तेथे काही वर्ष शाळा होती

 ऐतिहासिक वाडा जतन करणे गरजेचे होते गावकऱ्यांच म्हणणे

May 27, 2025 09:22 (IST)

LIVE Updates: मरीन एक्वा मेर्टो लाईन अद्याप बंद

वरळी आचार्य अत्रे चौक येथील मरीन एक्वा लाईन मेट्रो अद्याप बंदच...

काल मुंबईत मुसळधार पाऊस झाला त्याचा मेट्रोला देखील बसला फटका...

या मुसळधार पावसामुळे मुंबईच्या या महत्वकांक्षी प्रकल्पाचे फार मोठे झाले नुकसान...

आचार्य अत्रे चौक येथील मेट्रो स्थानकात पाणी शिरले आणि मेट्रो बंद करण्याची नामुष्की ओढावली...

साधारण पंधरा दिवसांपूर्वीच या भूमिगत असलेल्या मरीन एक्वा लाईन मेट्रोचे झाले होते उद्घाटन... 

मेट्रो कधी सुरू होणार हे अद्याप अस्पष्टच...

सध्या या मेट्रो स्थानकाच्या आत मध्ये दुरुस्तीचे काम सुरू असून ती दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर मेट्रो सुरु होईल 

May 27, 2025 08:35 (IST)

Pune News: पुण्यात पुन्हा गाड्यांची तोडफोड

पुण्यात  पुन्हा गाड्यांची तोडफोड 

पुण्यातील तळजाई येथे पाच ते सहा गाड्यांची तोडफोड 

हातात कोयता घेत गाड्यांचे तोडफोड करत आरोपींकडून राडा 

पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू

May 27, 2025 08:35 (IST)

LIVE Updates: गृहमंत्री अमित शाह अजित पवारांची खलबतं, 20 मिनिटे बैठक

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची काल रात्री २० मिनिटे सह्याद्री अतिथी गृहावर बैठक

अमित शाहा काल रात्री मुंबईत मुक्कामी होते दरम्यान अजित पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट

May 27, 2025 08:09 (IST)

LIVE Updates: रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाची संततधार

 रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळपासून पावसाची संततधार

जिल्ह्याला आज रेड अलर्टचा इशारा

मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता

मच्छिमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये

गरज असेल तरच बाहेर पडावे जिल्हा प्रशासनाचं रत्नागिरीकरांना आवाहन

जिल्हाधिकारी यांनी देखील घेतला आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा

May 27, 2025 08:08 (IST)

LIVE Updates: शाळेची घंटा वाजणार! राज्य मंडळाच्या शाळा सोहळा जून पासून होणार सुरू

पुण्यासह राज्यात लवकरच वाजणार शाळेच्या घंटा 

CBSE च्या शाळा ९ जून पासून तर राज्य मंडळाच्या शाळा सोहळा जून पासून होणार सुरू 

प्रशासनाचा निर्णय 

अनेक शाळांनी आधीच प्रवेश प्रक्रिया, पुस्तकांचे वाटप आणि नव्या शैक्षणिक वर्षाच्या योजनांचे काम केले पूर्ण

May 27, 2025 08:07 (IST)

Mumbai News: मुंबईच्या विक्रोळी परिसरामध्ये झाड कोसळून एका तरुणाचा मृत्यू

विक्रोळीच्या गणेश मैदान परिसरामध्ये सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास एका तरुणाच्या डोक्यावर झाड कोसळले. 

26 वर्षीय तेजस नायडू हा या परिसरात मित्रांसोबत उभा होता 

यावेळी मुळे जीर्ण झालेलं झाड तेजस नायडू यांच्या अंगावर कोसळले 

उपस्थित आणि त्याला नजीकच्या गोदरेज रुग्णालयामध्ये भरती केले मात्र त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झाला

May 27, 2025 08:07 (IST)

LIVE Updates: ऐन पावसाळ्यात पुणेकरांची पाणीकपात

मुसळधार पावसातही अर्ध्यापेक्षा जास्त पुण्याचा पाणीपुरवठा विस्कळीत 

पर्वती जलकेंद्राला महावितरणकडून पाणी पुरवठा केला जातो. मध्यरात्री दीडच्या सुमारास वीज वाहिनीमध्ये बिघाड झाल्याने विद्युत पुरवठा विस्कळित झाला

काल आणि परवा असा दोन दिवस पाणीपुरवठा विस्कळीत 

तर आजपासून पाणीपुरवठा होणार सुरळीत 

सदाशिव पेठ, शुक्रवार पेठ, नारायण पेठ, रविवार पेठ, कसबा पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, शनिवार पेठ, नवी पेठ आंबिल ओढा, दत्तवाडी, गंज पेठ, गुरुवार पेठ, सोमवार पेठ, घोरपडे पेठ, महात्मा फुले पेठ, स्वारगेट, शिवाजीनगर, पर्वती, बिबवेवाडी, सहकारनगर, पद्मावती, शिवदर्शन, अरण्येश्वर, तळजाई वसाहत, शांतिनगर, शंकर महाराज वसाहत, दांडेकर पूल  या परिसरात पाणी कपात