Maharashtra Rain : महाराष्ट्रातील पुढील चार दिवस पावसाचे; पुण्याला रेड अलर्ट 

हवामान विभागाकडून राज्यात 5 ते 9 जुलै दरम्यान वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

पुढील चार दिवस राज्यात पावसाचा (Maharashtra Rain Update) हाय अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून राज्यात 5 ते 9 जुलै दरम्यान वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.  5 जुलै रोजी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर तसेच नाशिक, पुणे, सातारा आणि  कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता.

त्याशिवाय मुंबई, नंदुरबार, धुळे ,जळगाव,छत्रपती संभाजीनगर ,जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट होता. त्याशिवाय आज पुणे आणि पालघर जिल्ह्यांना रेड अलर्ट (Pune Red Alert) देण्यात आला आहे. याशिवाय सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, ठाणे, नाशिक यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उद्या ७ जुलै रोजी पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे पुणेकरांनी घराबाहेर पडताना सतर्क राहणं आवश्यक आहे. याशिवाय रत्नागिरी, रायगड, सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आणि ठाणे, पालघर जिल्ह्यांना यल्लो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे शहरासह घाटमाथ्यावर 7 जुलै रोजी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Nashik News: नाशिकमध्ये जोरदार पाऊस! गोदावरीच्या पाणीपातळ्यात वाढ, 9 धरणांमधून विसर्ग सुरु

वसई विरार शहरात मुसळधार पाऊस

वसई विरार शहरात आज सकाळपासूनच पावसाची दमदार बॅटिंग सुरू झाली आहे. यामुळे शहराच्या अनेक सखल भागात पाणी साचलं. साचलेल्या पाण्यातून वाहन चालकांना आपली वाहने चालवावी लागत आहेत मात्र पाण्यात खड्यांचा अंदाज येत नसल्यामुळें अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. शहरात कोसळणाऱ्या मुसळधार काही प्रमाणात जन जीवन विस्कळीत झालं.  दरम्यान, पुढील 3-4 तासांत पालघर, ठाणे जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली असून नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

Advertisement

पवना डॅम परिसर हिरवाईने नटला...

मावळ तालुक्यात पवना डॅमलगत असणाऱ्या तुंग किल्ला हा पावसाळ्यात पर्यटकासाठी नेहमी केंद्रबिंदू असतो. सध्या पाऊस जोरदार चालू असल्याने पवना डॅम परिसर हिरवाईने नटलेला आहे. त्यातच तुंग किल्ल्याचे धुक्यात लपलेलं मनमोहक रूप पर्यटकांना आकर्षित करत आहे. धुक्याने वेढलेला तुंग किल्ला पवना लगत असल्याने अतिशय सुंदर मनमोहक वाटतो त्यामुळे या भागात पर्यटकाची संख्या जास्त पाहायला मिळत आहे.

Advertisement
Topics mentioned in this article