Ujani Dam: पावसाचा कहर! उजनीच्या पाणीसाठ्यात 7 टक्क्यांनी वाढ, दोन दिवसात भरण्याची शक्यता

मे महिन्यामध्ये प्रथमच भीमा नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह येत आहे. महत्त्वाचं म्हणजे उजनी धरणामध्ये 12 तासात चार टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

संकेत कुलकर्णी, प्रतिनिधी:

Maharashtra Rain News: सध्या राज्यभरात तुफान पाऊस कोसळत असून पुणे, बारामतीसह पंढरपूर, सोलापूर भागामध्ये पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. पंढरपुरात चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत तब्बल दोन मीटरने वाढ झाली आहे. तर भीमा नदीवरील असणाऱ्या अंबाबाई बंधाऱ्याचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. भीमा आणि नीरा नदीच्या खोऱ्यात झालेल्या पावसामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. मे महिन्यामध्ये प्रथमच भीमा नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह येत आहे. महत्त्वाचं म्हणजे उजनी धरणामध्ये 12 तासात चार टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

उजनी धरण सात टक्क्यांनी वधारले:

सोलापूर जिल्ह्याची वरदायीनी असणाऱ्या उजनी धरणात तब्बल 12 तासात चार टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे. तर धरण सात टक्क्यांनी वधारलेला आहे. रविवारी संध्याकाळी सहा वाजता उजनी धरणात 55 टीएमसी पाणी होते तर आज सकाळी सहा वाजता उजनी धरणात 59 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. तर उजनी धरण वजा सात टक्क्यांवर येऊन पोहोचले आहे. सध्या उजनी धरणात दौंड येथून 18 हजार क्युसेक्य इतका विसर्ग येतोय. तर रात्रभरात उजनी धरण क्षेत्रात आठ मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे.. त्यामुळे उजनी धरण सततच्या पावसामुळे लवकरच वजा क्षमतेतून प्लसमध्ये येण्याची शक्यता वर्तवली जात आहे .

Advertisement

माळशिरस तालुक्याला नीरा नदीच्या प्रवाहाचा फटका

नीरा नदीच्या वाढत्या प्रवाहामुळे माळशिरस तालुक्यातील कुरबावी गावात पाणी शिरले आहे. या गावात एनडी आर एफची दोन पथके दाखल झाले आहेत. पहाटेपासूनच गावातील 80 लोकांचे स्थलांतर करण्याची सुरुवात केली आहे. नीरा नदीमध्ये 30000 राहून अधिकचा प्रवाह येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय. अशातच आता कुरबावी हे गाव पुराच्या विळख्यात सापडलेले दिसून येत आहे.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Chhagan Bhujbal:'...तर भुजबळ उपमुख्यमंत्री होवू शकतात', फडणवीसांच्या जवळच्या नेत्याचं वक्तव्य

दुसरीकडे, माळीनगर परिसरातील नीरा नदीच्या पाण्याने 20 घरांमध्ये पाणी शिरले गेले. सतर्कतेचा इशारा म्हणून तब्बल 20 कुटुंबांना जिल्हा परिषदेच्या शाळेत स्थलांतर करण्यात आले आहे.. माळीनगर आणि माळशिरस तालुक्यातील पूर्व भाग हा संपूर्णपणे जनमाय झालेला दिसून येत आहे. गणेश गाव येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा देखील पाण्याखाली गेलाय. नीरा नदीवर मोठ्या प्रमाणावर पाणी येत असल्याने माळीनगर परिसर व माळशिरस पूर्व भागाचा पुणे जिल्ह्याशी असणारा संपर्क आता तुटण्यास सुरुवात झाली आहे.

Advertisement