Maharashtra Live Blog: नवरात्रीमध्ये तुफान बरसलेल्या पावसाने दसऱ्यानंतर विश्रांती घेतली आहे. राज्यभरात पावसाचा जोर ओसरला असून पुढील दोन दिवसात आणखी जोर कमी होईल अशी शक्यता वर्तवली आहे. दुसरीकडे राज्यामध्ये शक्ती चक्रीवादळाचे संकट ओढावले आहे. दिनांक 3 ते 7 ऑक्टोंबर दरम्यान उच्च ते मध्यम चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला असून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड रत्नागिरी, सिंधुदुर्ग, या जिल्ह्यांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.
LIVE Update: महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा
- महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा
- दिनांक 3 ते 7 ऑक्टोंबर दरम्यान उच्च ते मध्यम चक्रीवादळाचा इशारा
- मुंबई, ठाणे, पालघर, रायगड रत्नागिरी, सिंधुदुर्ग, या जिल्ह्यांना इशारा
- मच्छीमारांनी समुद्रात जाणे टाळावे प्रशासना कडून स्पष्ट इशारा
LIVE Update: भर पावसात आदिमायेला भक्तीभावाने दिला निरोप
नाशिकच्या मनमाडमध्ये नऊ दिवस भक्तीभावाने आराधना केलेल्या आदिमाया आदिशक्तीच्या मृर्तीचे मोठ्या भक्ती भावात विसर्जन करण्यात आले. सकाळपासून गणेश कुंडावर विसर्जनासाठी गर्दी होती.मात्र सायंकाळच्या सुमारासात मिळालेल्या मुसळधार पावसाने देवभक्तांच्या उत्साहावर काहीसे विरजण पडले तर शहरातील सर्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भर पावसात पारंपारिक संबळ ,ढोल ताश्या व डीजेच्या तालावर फेर धरला व दांडिया, गरबा खेळत देवीभक्तांननी आदिमायेला निरोप दिला.
LIVE Update: केंद्रीय परिवहन महामार्ग मंत्री नितीन गडकरी वर्धा जिल्ह्याच्या दौ-यावर
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून ते दुपारी 2.15 वाजता सेलू येथे येतील त्यानंतर सेलू बसस्टॅन्ड जवळ पांदन रस्ते भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती लावतील त्यानंतर दुपारी 2.30 वाजता सेलू येथील माहेर मंगल कार्यालय येथे आयोजित शेतकरी मेळाव्यास उपस्थिती लावतील त्यानंतर दुपारी 3.15 वाजता राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या मसाळा येथील निवासस्थानी भेट देतील दुपारी 4 वाजता मसाळा येथून नागपूरकडे प्रयाण करतील.
LIVE Update: अतिवृष्टीने निफाड तालुक्यातील पुलांना तडाखा
अतिवृष्टीमुळे निफाडच्या गोंदेगाव - जऊळके रस्त्यावरील पूल वाहून गेल्याने शाळकरी विद्यार्थी व स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.विद्यार्थ्यांना अक्षरशा: गुडघाभर पाण्यातून जीव धोक्यात घालून ये- जा करावी लागतेय पालकांना सर्व कामे सोडून विद्यार्थ्यांना शाळेत सोडवावे लागत तर शेतकऱ्यांना आपला शेतमाल वाहतूक करताना तसेच दुचाकी चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.या जीवघेण्या प्रवासामुळे मोठा अनर्थ होण्याची शक्यता असून प्रशासनाने तातडीने हा पुल दुरुस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहे.