जाहिरात
2 months ago

 Maharashtra Live Blog: नवरात्रीमध्ये तुफान बरसलेल्या पावसाने दसऱ्यानंतर विश्रांती घेतली आहे. राज्यभरात पावसाचा जोर ओसरला असून पुढील दोन दिवसात आणखी जोर कमी होईल अशी शक्यता वर्तवली आहे. दुसरीकडे राज्यामध्ये शक्ती चक्रीवादळाचे संकट ओढावले आहे.  दिनांक 3 ते 7 ऑक्टोंबर दरम्यान उच्च ते मध्यम चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला असून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड रत्नागिरी, सिंधुदुर्ग, या जिल्ह्यांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. 

Maharashtra Live Blog: ठाकरेंच्या खासदारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट!

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार नागेश आष्टीकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आज सह्याद्री येथे अतिवृष्टी संधर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यापूर्वी आष्टीकरांनी थेट सह्याद्री अतिथीगृहावर येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली

हिंगोली, नांदेड, यवतमाळमध्ये मोठी अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून भरीव मदत सरकारने करावी अशी मागणी या भेटीत केली, असं आष्टीकरांनी सांगितलं. त्याचबरोबर 

सहस्त्रकुंड धरणाला विरोध आहे त्यामुळे ते धरण प्रकल्प रद्द करून नदी खोलीकरण करून घ्यावे ही मागणी यावेळी केल्याचं त्यांनी सांगितलं.

LIVE Updates: कुख्यात गुंड निलेश घायवाळ याचा पासपोर्ट रद्द होण्याची शक्यता

कुख्यात गुंड निलेश घायवाळ याचा पासपोर्ट रद्द होण्याची शक्यता 

खोटे कागदपत्र दिल्याचा संशय पोलिसांना असून तसे उघडकीस आले तर निलेश घायवाळ चा पासपोर्ट रद्द करण्याची शक्यता 

आत्ता पर्यंतच्या तपासात असे उघडकीस आले आहे की त्याने नावात फेरफार करत तात्काळ मध्ये पासपोर्ट मिळवला आहे 

तर त्यावर दिलेला पत्ता देखील बनावट असल्याचं समोर येत आहे 

निलेश घायवाळ वर अन्य गुन्हे, खोटे कागदपत्र दिल्या प्रकरणी दाखल होण्याची शक्यता 

तर या सगळ्याबाबत पुणे पोलिसांकडून पासपोर्ट कार्यालयाला पत्रव्यवहार झाल्याची सूत्रांची माहिती

LIVE Update: शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर प्राणघातक हल्ला

शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर प्राणघातक हल्ला...

दिग्विजय बागल आणि रश्मी बागल यांनी सुपारी देऊन हल्ला केल्याचा चिवटे यांच्या आरोप 

माजी मंत्री स्वर्गीय दिगंबर बागल यांचे  पुत्र आहेत दिग्विजय बागल 

महेश चिवटे यांची गाडी अडवून झाली बेदम मारहाण

रश्मी आणि दिग्विजय बागल सध्या आहेत शिवसेना शिंदे गटात 

शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीला हिंसक वळण 

काही दिवसापूर्वी धमकी दिल्याप्रकरणी दिग्विजय बागल यांच्या विरोधात महेश चिवटे यांनी दिली होती पोलिस तक्रार

वैद्यकीय मदत कक्षचे मंगेश चिवटे यांचे बंधू आहेत शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे

LIVE Update: महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा

- महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा

- दिनांक 3 ते 7 ऑक्टोंबर दरम्यान उच्च ते मध्यम चक्रीवादळाचा इशारा

- मुंबई, ठाणे, पालघर, रायगड रत्नागिरी, सिंधुदुर्ग, या जिल्ह्यांना इशारा

- मच्छीमारांनी समुद्रात जाणे टाळावे प्रशासना कडून स्पष्ट इशारा

LIVE Update: भर पावसात आदिमायेला भक्तीभावाने दिला निरोप

 नाशिकच्या मनमाडमध्ये नऊ दिवस भक्तीभावाने आराधना केलेल्या आदिमाया आदिशक्तीच्या मृर्तीचे मोठ्या भक्ती भावात विसर्जन करण्यात आले. सकाळपासून गणेश कुंडावर विसर्जनासाठी गर्दी होती.मात्र सायंकाळच्या सुमारासात मिळालेल्या मुसळधार पावसाने देवभक्तांच्या उत्साहावर काहीसे विरजण पडले तर  शहरातील सर्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या  कार्यकर्त्यांनी भर पावसात पारंपारिक संबळ ,ढोल ताश्या व डीजेच्या तालावर फेर धरला व दांडिया, गरबा खेळत देवीभक्तांननी आदिमायेला निरोप दिला.

LIVE Update: केंद्रीय परिवहन महामार्ग मंत्री नितीन गडकरी वर्धा जिल्ह्याच्या दौ-यावर

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून ते दुपारी 2.15 वाजता सेलू येथे येतील त्यानंतर सेलू बसस्टॅन्ड जवळ पांदन रस्ते भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती लावतील त्यानंतर दुपारी 2.30 वाजता सेलू येथील माहेर मंगल कार्यालय येथे आयोजित शेतकरी मेळाव्यास उपस्थिती लावतील त्यानंतर दुपारी 3.15 वाजता राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या मसाळा येथील निवासस्थानी भेट देतील दुपारी 4 वाजता मसाळा येथून नागपूरकडे प्रयाण करतील.

LIVE Update: अतिवृष्टीने निफाड तालुक्यातील पुलांना तडाखा

अतिवृष्टीमुळे  निफाडच्या गोंदेगाव - जऊळके रस्त्यावरील पूल वाहून गेल्याने शाळकरी विद्यार्थी व स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.विद्यार्थ्यांना अक्षरशा: गुडघाभर पाण्यातून जीव धोक्यात घालून ये- जा करावी लागतेय पालकांना सर्व कामे सोडून विद्यार्थ्यांना शाळेत सोडवावे लागत तर शेतकऱ्यांना आपला शेतमाल वाहतूक करताना तसेच दुचाकी चालकांना मोठी  कसरत करावी लागत आहे.या जीवघेण्या प्रवासामुळे मोठा अनर्थ होण्याची शक्यता असून प्रशासनाने तातडीने हा पुल दुरुस्त करावा अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहे.

Track Latest News Live on NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com