School Holiday: उन्हाळ्याच्या सुट्ट्या कधी लागणार? वेळापत्रक जाहीर; 'या' दिवशी वाजणार शाळेची घंटा

परीक्षा संपल्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्टीची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज समोर आली आहे. शालेय शिक्षण विभागाने उन्हाळी सुट्टी तसेच पुन्हा शाळा सुरु होण्याचे वेळापत्रक जारी केले आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

अजिंक्य धायगुडे पाटील, पुणे:

Maharashtra School Vacation Timetable:  राज्यातील प्राथमिक, माध्यमिक वर्गांच्या परीक्षा आता संपत आल्या आहेत. परीक्षा संपल्यामुळे विद्यार्थ्यांना आता उन्हाळी सुट्टीचे वेध लागले आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीत मजा करण्यासाठी, मामाच्या गावाला जाण्यासाठी अन् मनसोक्त फिरण्यासाठी विद्यार्थी- विद्यार्थिनी आतुर झाले आहेत. त्यामुळेच परीक्षा संपल्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्टीची वाट पाहणाऱ्यांनासाठी मोठी गुड न्यूज समोर आली आहे. शालेय शिक्षण विभागाने उन्हाळी सुट्टी तसेच पुन्हा शाळा सुरु होण्याचे वेळापत्रक जारी केले आहे. 

Accident News: काँग्रेस खासदाराच्या कारचा भीषण अपघात! ट्रकची धडक, आलिशान फॉर्च्युनरचा चक्काचूर

उन्हाळ्याची सुट्टी कधी लागणार? 

महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाने आगामी शैक्षणिक वर्षासाठी शाळांच्या वेळापत्रक जाहीर केले आहे. , शिक्षण विभागाने यंदाच्या उन्हाळी सुट्ट्या २ मे पासून जाहीर केल्या आहेत.  तर १५ जून रोजी सर्व शाळा सुरु होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. महत्त्वाचं म्हणजे यंदा शालेय शिक्षण विभागाने एक महत्त्वाचा आणि मोठा बदल केला आहे.  दरवर्षी विदर्भातील उष्णतेची लाट पाहता तेथील शाळा उशिरा सुरू करण्याची परंपरा होती, मात्र आता नवीन शैक्षणिक धोरण आणि नियोजनानुसार संपूर्ण राज्यातील शाळा एकाच दिवशी म्हणजेच १५ जून रोजी सुरू होणार आहेत. 

Advertisement

​राज्यातील वाढते तापमान आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचे नियोजन लक्षात घेता, शिक्षण विभागाने यंदाच्या उन्हाळी सुट्ट्या २ मे पासून जाहीर केल्या आहेत. साधारणपणे विदर्भातील शाळा जून अखेरीस किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरू व्हायच्या, कारण तिथले तापमान ४५ अंशांच्या पुढे जात असे. मात्र, अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मिळणारा वेळ आणि सणासुदीच्या सुट्ट्यांचे गणित बसवण्यासाठी आता विदर्भालाही उर्वरित महाराष्ट्राच्या बरोबरीने १५ जूनलाच शाळा सुरू कराव्या लागणार आहेत.

Satara News: सातारा ZP निवडणुकीचा राडा भोवला! SP तुषार दोशी सक्तीच्या रजेवर; गृह विभागाचे आदेश

15 जून रोजी भरणार शाळा! 

​या निर्णयामुळे शिक्षकांच्या प्रशिक्षणाचे नियोजन आणि विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेला गती मिळणार आहे. पालकांनी आणि शाळा प्रशासनाने या बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी, असे आवाहन शिक्षण संचालनालयाकडून करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील शाळांमध्ये १५ जून रोजी 'शाळा प्रवेशोत्सव' साजरा करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.