जाहिरात

Satara News: सातारा ZP निवडणुकीचा राडा भोवला! SP तुषार दोशी सक्तीच्या रजेवर; गृह विभागाचे आदेश

सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश गृह विभागाने दिले आहेत.

Satara News: सातारा ZP निवडणुकीचा राडा भोवला! SP तुषार दोशी सक्तीच्या रजेवर; गृह विभागाचे आदेश

राहुल तपासे, सातारा:

Satara SP Tushar Doshi News:  सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी हायहोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. भाजप विरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी असा नाट्यमय संघर्ष पाहायला मिळाला ज्यामध्ये भाजपने बाजी मारत अध्यक्षपद मिळवले. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई, राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांना पोलिसांकडून धक्काबुक्की झाली.   या राड्यावरुन राज्याचे राजकारण चांगलेच तापले ज्याचे पडसाद अधिवेशनात पाहायला मिळाले. या संपूर्ण प्रकरणी आता साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. 

झेडपी अध्यक्ष निवडीचा राडा भोवला 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरणात सर्वात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. झेडपी अध्यक्ष निवडीवेळी झालेला राडा सातार जिल्हा पोलीस अधीक्षकांना चांगलाच भोवला आहे. सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश गृह विभागाने दिले आहेत. ही चौकशी होईपर्यंत अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्याकडे सातारा पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

VIDEO: पनवेलच्या कामोठ्यात नागरिकांच्या जीवाशी खेळ! मेडिकलमध्ये घुसून 'मनसे'ने उतरवला तरुणाचा माज

मंत्री शंभुराज देसाई, मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील यांना पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याचा गंभीर प्रकार घडला होता यावरुनच शंभुराज देसाई यांनी तुषार दोशी यांना निलंबित करण्याची मागणी केली होती. विधानसभेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी याबाबतचा निर्णय दिला होता, ज्याला भाजप नेते जयकुमार गोरेंनी जोरदार विरोध केला. अखेर आता गृह विभागाने तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. 

कोण आहेत तुषार दोशी? 

तुषार दोशी हे जालन्याचे पोलीस अधीक्षक असताना अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला होता. मराठा आंदोलनातल्या लाठीचार्जनंतर तुषार दोशी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. जालनानंतर त्यांची सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता ते  सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीवेळी झालेल्या राड्याप्रकरणी चर्चेत आले आहेत. 

(नक्की वाचा-  Ashok Kharat: 'भोंदू बाबा'वर मेहेरबान कोण? यादीत नाव नाही, तरीही खरातच्या मंदिराला निधी मंजूर! रेकॉर्डच गायब)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com