Teachers' Summer Vacation : राज्यातील शिक्षकांच्या उन्हाळी सुट्ट्यांवर गंडांतर; यंदाच्या सुट्टीतही कामच काम

राज्यभरातील शाळांना २ मे ते १४ जूनपर्यंत उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

Teachers' Summer Vacation : राज्यभरातील शाळांना २ मे ते १४ जूनपर्यंत उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र शिक्षकांना या सुट्ट्यांचा आनंद घेता येणार नसल्याचं चित्र आहे. गेल्या दोन वर्षांपासून निवडणुकांच्या कामात असलेल्या शिक्षकांवर यंदाच्या उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद घेता येणार नाही. यंदा शिक्षकांवर जनगणनेची जबाबदारी टाकण्यात आली आहे. साधारण १६ मे ते १४ जूनदरम्यान शिक्षकांना जनगणनेचे काम करावे लागणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, महापालिका, खासगी अनुदानित शाळातील शिक्षकांना जनगणनेचे काम करावे लागणार आहे. 

अनेक शिक्षकांनी आधीच उन्हाळी सुट्ट्यांचं नियोजन केलेल असेल. अनेकजण कुटुंबासोबत गावी किंवा पर्यटन ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लान करतात. मात्र प्रशासनाने शिक्षकांना मुख्यालय न सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शिक्षकांना उन्हाळी सुट्ट्यांमध्ये फिरायला जाणं अवघड होणार आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Pune News : बास्केट बॉल खेळताना विशालचा मृत्यू; पुण्यातील नामांकित इन्स्टिट्यूटमध्ये भयंकर निष्काळजीपणा

जनगणनेचं काम कधी असेल? 

शिक्षकांना १६ मे ते १४ जूनपर्यंत जनगणनेचं काम करावं लागणार आहे. यासाठी शिक्षकांना घराघरांमध्ये जाऊन माहिती जमा करुन घेण्याची जबाबदारी असेल. शाळांना २ मे ते १४ जूनपर्यंत उन्हाळ्याची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात शिक्षकांकडे १२ दिवसांची सुट्टी शिल्लक असेल. त्यानंतर १६ मेपासून त्यांना जनगणनेचं काम करावं लागेल. या दरम्यान विद्यार्थ्यांना सुट्टी असली तरी शिक्षकांवरील कामाचा ताण वाढणार असल्याचं चित्र आहे. लोकमतने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.  

Topics mentioned in this article