E-KYC Deadline: राज्यभरातील शिक्षकांसाठी महत्त्वाचं! E-KYCबाबत सर्वात मोठी अपडेट; एप्रिलचा पगार मिळणार का?

विद्यार्थ्यांचे निकाल तयार करायचे, निवडणूक कर्तव्यावर हजर राहायचे की ई केवायसी करण्यासाठी बँकेत जायचे, असा प्रश्न शिक्षकांकडून उपस्थित करण्यात आला होता.

जाहिरात
Read Time: 2 mins

ऋतिक गणकवार, मुंबई:

Maharashtra Teachers Ekyc Deadline: बँक खात्याचे ई केवायसी केलेले नसल्यास शिक्षकांना मे महिन्यामध्ये वेतन मिळणार नाही, असे आदेश शिक्षण विभागाने दिल्याने राज्यातील सर्वच शिक्षकांची धावपळ उडाली होती. विद्यार्थ्यांचे निकाल तयार करायचे, निवडणूक कर्तव्यावर हजर राहायचे की ई केवायसी करण्यासाठी बँकेत जायचे, असा प्रश्न शिक्षकांकडून उपस्थित करण्यात आला होता.

या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने ई-केवायसी करण्यासाठी जूनपर्यंत मुदतवाढ दिल्याने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यामुळे शिक्षकांना जूनमध्ये मिळणाऱ्या वेतनापूर्वीपर्यंत मुदत मिळाली आहे. मात्र ही मुदत अखेरची असून, यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असे वित्त विभागाने स्पष्ट केले आहे.

Advertisement

Sangli News: वाचवायला धावला, दोघांचाही जीव गेला, 2 शाळकरी मुलांच्या मृत्यूने सांगलीत हळहळ

 राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या आदेशानुसार, शालार्थ प्रणालीतून वेतन घेणाऱ्या सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या बँक खात्याचे ई-केवायसी (E-KYC) तातडीने पूर्ण करणे अनिवार्य झाले आहे. ज्या कर्मचाऱ्यांची ही प्रक्रिया पूर्ण होणार नाही, त्यांचे मे महिन्याचे वेतन रोखले जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र आता या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने शिक्षकांसाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचे टप्पे! 

  •  आधार सीडिंग तपासणे: प्रथम आपले आधार कार्ड कोणत्या बँकेत 'सीडिंग' (Seeding) आहे, हे NPCI च्या पोर्टलवर किंवा आधारच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तपासावे.
  •  पगार खात्यातच सीडिंग असल्यास: जर आधार सीडिंग तुमच्या पगार होणाऱ्या बँकेतच असेल, तर कोणतीही ऑनलाइन प्रक्रिया करण्याची गरज नाही. केवळ ई-केवायसी फॉर्म भरून बँकेच्या शाखेतून प्रमाणित करून घ्यावा.
  •  दुसऱ्या बँकेत सीडिंग असल्यास: जर आधार दुसऱ्या खात्याशी लिंक असेल, तर NPCI पोर्टलवर जाऊन 'Option-3 Movement' निवडून आपले पगार खाते अपडेट करावे.
  •  दुरुस्ती व मार्गदर्शन: आधार कार्डावरील नाव किंवा इतर माहितीत तफावत असल्यास संबंधित बँकेशी संपर्क साधून आवश्यक बदल करून घ्यावेत.

Shocking news: डोळ्यादेखत 10 घरं जमिनीने गिळली, गाड्या ही गायब, 'या' गावात भयंकर तांडव