Change in ZP election dates : राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आता ५ फेब्रुवारी ऐवजी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाच्या तारखेत बदल झाल्यामुळे साहजिकच मतमोजणीच्या वेळापत्रकातही बदल झाला आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, या निवडणुकांचा निकाल आता ९ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर केला जाईल.
बदललेल्या निवडणुकीच्या तारखेमुळे हजारो शिक्षक TET परीक्षेला मुकणार असल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा परिषद निवडणूक आणि शिक्षकांच्या CTET परीक्षा एकाच दिवशी ७ फेब्रुवारी रोजी आहेत. राज्यात झेडपी आणि पंचायत निवडणुकीसाठी हजारो शिक्षकांना निवडणूक ड्युटी लावण्यात आली आहे. परीक्षेच्या दिवशीच निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याने शिक्षक संभ्रमात पडले आहेत.

परीक्षा विहित वेळेत पास करणे हे सुद्धा शिक्षकांना बंधनकारक आहे. त्यामुळे शिक्षक परीक्षेला मुकणार नाही याबाबत नियोजन करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीने केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world