प्रशांत जव्हेरी, नंदुरबार:
Maharashtra Unseasonal Rain News: गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. मुंबई पुण्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. नंदुरबार जिल्ह्यालाही अवकाळी पावसाचा फटका बसला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, हवामान खात्याने व्यक्त केलेला अंदाजानुसार नंदुरबार जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्याचे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जवळपास 100 पेक्षा अधिक घरांचे नुकसान झाले आहे तर शेतात काम करणाऱ्या मजुरावर वीज पडल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.
तर दुसरीकडे आंबा कांदा भगर उन्हाळी मूग बाजरी यासह इतर पिकांचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका वीट भट्टी चालकांना बसला असून जिल्ह्यातल्या विविध भागातील वीटभट्ट्यांवरून दहा लाख पेक्षा अधिक कच्च्या खराब झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे हे नुकसान अधिक असल्याचे वीट भट्टी चालकांनी सांगितले असून अवकाळी पावसाची शक्यता अजून तीन दिवस हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
( नक्की वाचा : पाकिस्तानी नागरिकांनं काढले स्वत:च्याच देशाचे वाभाडे, Video पाहून प्रत्येक भारतीय होईल खुश )
त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यालाही शुक्रवारी दुपारनंतर पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा बसला. रत्नागिरी, चिपळूण, खेडमध्ये जोरदार पाऊस बरसला.
दरम्यान खेड शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागाला अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला. या पावसामुळे खेड बस स्थानक परिसरात पावसाचं पाणी तुंबलं, त्यामुळे बस स्थानकातील व्यापारी वर्गासह प्रवाशांचे हाल झाले. अचानक आलेल्या या मुसळधार पावसामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले.
पाकिस्तानची अवस्था बिकट, भावाच्या मदतीसाठी लंडनहून धावले नवाज शरीफ, दिला महत्त्वाचा सल्ला