PCMC Politics: विधानपरिषदेसाठी तगडी फिल्डिंग! पिंपरी चिंचवडमधून 4 नावे चर्चेत; राष्ट्रवादीत मोठी चुरस

राष्ट्रवादी काँग्रेसचा केवळ एकच विधानसभा आमदार असल्याने, पक्षाला बळकट करण्यासाठी विधान परिषदेच्या रिक्त जागेवर शहरातील एका नेत्याची वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

सुरज कसबे, पिंपरी चिंचवड:

Maharashtra Vidhan Pairshad Election 2026:  आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपली ताकद वाढवण्यासाठी सरसावला आहे. शहरात सध्या भाजपचे वर्चस्व असून त्यांचे दोन विधानसभा आणि दोन विधान परिषद असे एकूण चार आमदार आहेत. त्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसचा केवळ एकच विधानसभा आमदार असल्याने, पक्षाला बळकट करण्यासाठी विधान परिषदेच्या रिक्त जागेवर शहरातील एका नेत्याची वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी अखेरची संधी! 4 दिवसात 'हे' काम करा अन्यथा 1500 रुपये कायमचे बंद

विधान परिषद निवडणूक, पिंपरी चिंचवडमध्ये मोठी चुरस 

समोर आलेल्या माहितीनुसार, विधानसभेच्या  जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधून चार प्रमुख नावांची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे, यात विलास लांडे जे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे प्रथम आमदार आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, योगेश बहल जे राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आहेत, अजित गव्हाणे जे भोसरी विधानसभा निवडणूक लढवलेले माजी नगरसेवक आहेत. तर नाना काटे ज्यांनी चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक लढवलेली होती यांच्या नावाचा समावेश आहे.

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, विधान परिषदेच्या या जागेसाठी ज्येष्ठ नेते विलास लांडे आणि शहराध्यक्ष योगेश बहल  यांच्या नावांमध्ये सध्या जोरदार रस्सीखेच सुरू आहे. शहराचा राजकीय समतोल राखण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी पक्ष कोणाच्या गळ्यात आमदारकीची माळ टाकतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पक्षश्रेष्ठींच्या या निर्णयामुळे आगामी महापालिका आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला शहरात अधिक ताकद मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Pune Railway: आता गर्दीची चिंता मिटली! पुणे स्टेशनचा होणार कायापालट, नवीन 6 आयलँड प्लॅटफॉर्मचं बांधकाम सुरू