जाहिरात

Pune Railway: आता गर्दीची चिंता मिटली! पुणे स्टेशनचा होणार कायापालट, नवीन 6 आयलँड प्लॅटफॉर्मचं बांधकाम सुरू

Pune Railway News: पुणे रेल्वे स्थानकावर वाढती गर्दी पाहता 6 नवीन फलाट उभारण्यासाठी 44.09 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे पुणे स्टेशन आता 12 फलाटांचे होणार असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Pune Railway: आता गर्दीची चिंता मिटली! पुणे स्टेशनचा होणार कायापालट, नवीन 6 आयलँड प्लॅटफॉर्मचं बांधकाम सुरू
"Pune Railway News: पुणे रेल्वे स्टेशनचा विस्तार लवकरच"
Canva

-यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी
Pune Railway News: वाढती प्रवासी गर्दी आणि रेल्वे गाड्यांची वाढती संख्या लक्षात घेता पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारीकरणाचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे. पुणे स्थानकावर आता नवीन सहा फलाटांची भर पडणार आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या पाहणीनंतर या प्रकल्पाच्या कामाला वेग आला आहे.

44.09 कोटी रुपयांचा निधी मंजूर

या प्रकल्पासाठी रेल्वे प्रशासनाने 44.09 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या विस्तारीकरणामुळे सध्या सहा असलेल्या फलाटांची संख्या 12 वर पोहोचणार आहे. हे नवीन फलाट ‘आयलँड प्लॅटफॉर्म' (Island Platform) स्वरूपाचे असतील, ज्याच्या दोन्ही बाजूंना गाड्या उभ्या राहू शकतील. यामुळे कमी जागेत अधिक गाड्यांचे संचालन करणे शक्य होणार आहे.

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: NDTV Marathi

तीन टप्प्यांत होणार विकास कामे:

रेल्वे प्रशासनाने या कामाचे नियोजन तीन टप्प्यांत केले आहे

  • पहिला टप्पा: सध्या फलाट क्रमांक 11 आणि फलाट क्रमांक 12 (लांबी ६०० मीटर) यांचे काम सुरू झाले आहे.
  • दुसरा टप्पा: फलाट क्रमांक 9 आणि फलाट क्रमांक 10 (लांबी 750 मीटर) यांचा विकास केला जाईल.
  • तिसरा टप्पा: फलाट क्रमांक 7 आणि फलाट क्रमांक 8 (लांबी 650 मीटर) बांधण्यात येतील.

(नक्की वाचा: Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी अखेरची संधी! 4 दिवसात 'हे' काम करा अन्यथा 1500 रुपये कायमचे बंद)

या प्रकल्पामध्ये केवळ नवीन फलाटच नाही, तर नवीन रेल्वे ट्रॅक टाकणे आणि प्रवाशांसाठी अद्ययावत सुविधा विकसित करणे यावरही भर दिला जाणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर पुणे स्थानकावरील गर्दीचे नियोजन करणे रेल्वे प्रशासनाला अधिक सुलभ होईल, अशी अपेक्षा आहे.

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: NDTV Marathi

Listen to the latest songs, only on JioSaavn.com