12 hours ago

Maharashtra Legislative Council Election Result Live Updates:  महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी व निकाल  जाहीर होणार आहेत. या निवडणुकीत महायुतीने आधीच ६ जागा बिनविरोध जिंकल्या आहेत.नाशिक, जळगाव, सातारा-सांगली, संभाजीनगर- जालना, नांदेड, सोलापूर, भंडारा-गोंदिया, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, परभणी आणि नागपूर सकाळी 8 वाजतापासून निकाल जाहीर होणार आहेत. 

Jun 22, 2026 13:58 (IST)

Maharashtra Politics: सर्वात मोठी बातमी! ठाकरेंचे बंडखोर खासदार मुंबईत दाखल

ठाकरेंचे खासदारांनी अनेक देऊळ मंदिराची दर्शन घेऊन मुंबई परतले

बंडखोर खासदारांचा दिल्ली, देहरादून, वाराणशी आणि तिरुपती बालाजी असा प्रवास...

ठाकरेंचे खासदार भाऊ साहेब वाघचौरे, नागेश आष्टीकर, संजय जाधव, संजय देशमुख यांचा मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन

आगमना पूर्वी बंडखोर खासदारांच्या स्वागता साठी कार्यकर्त्यांचा एअरपोर्ट परिसरात जमायला सुरुवात....

श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय ऍड नीलेश देशमुख देखील सोबत आहे....

या सर्व खासदारांची राण्याची व्यवस्था आणि सर्व सुविधा खासदार श्रीकांत शिंदे यांचा मार्फत करण्यात आली.....

Jun 22, 2026 13:46 (IST)

Jalgaon Vidhan Parishad Result: जळगावचा गड महायुतीने राखला, नंदकिशोर महाजन विजयी

जळगाव विधान परिषद निवडणुकीत महायुतीने आपला गड कायम राखत दणदणीत विजय मिळवला आहे. महायुतीचे भाजप उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी 616 पैकी तब्बल 582 मते मिळवत एकतर्फी विजय नोंदवला. महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांना केवळ 17 मतांवर समाधान मानावे लागले. निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतलेल्या अपक्ष अनिल चौधरी यांना 11, तर शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांना स्वतःचे एकच मत मिळाले. दरम्यान, मतमोजणीत 5 मते अवैध ठरल्याने निकालाची अधिकृत घोषणा करण्यात आली. महायुतीच्या या विजयामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात उत्साहाचे वातावरण आहे.

Advertisement
Jun 22, 2026 13:22 (IST)

Nashik Vidhan Parishad Result LIVE: नाशिक विधान परिषद निवडणूक, महायुतीचे 50% नगरसेवकांचं गोकुळ गीते यांना मतदान

* नाशिक विधान परिषद निवडणूक 

* नाशिक महानगरपालिकेतील महायुतीचे 50% नगरसेवकांचं गोकुळ गीते यांना मतदान 

* नाशिक महानगरपालिकेत 122 पैकी महायुतीचे 102 नगरसेवक 

* जवळपास 50 नगरसेवक यांनी केलं अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांना मतदान 

* तर येवला ,नांदगाव , कळवण व मालेगाव येथील नगरसेवकांचे मतदान देखील गोकुळ गीते यांना पाडल्याची माहिती....

Jun 22, 2026 13:20 (IST)

Hingoli Parbhani Vidhan Parishad Result: महायुतीला धक्का, परभणीत महायुतीचे 92 मतदान फुटले

हिंगोली परभणी विधान परिषद निवडणुकीत 334 पेक्षा अधिक मतदान असलेल्या महायुतीचे उमेदवार सईद खान यांना 242 मते मिळाली. त्यामुळे महायुतीचे तब्बल 92 मतदाना फुटले. सईद खान यांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या नावाचा उल्लेख केला नाही. उलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्तरावर हा प्रकरण बघितल्या जाईल असा सूचक विधान केलाय. 

Jun 22, 2026 13:18 (IST)

Nashik LIVE Updates: नाशिकच्या निकालावरुन नाराजीनाट्य.. शिंदे गटाचा संताप

जळगावमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुख सरिता कोल्हे यांनी नाशिकच्या निकालानंतर भाजपवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून नाशिकच्या निकालावरून महायुती खडा पडल्याचे सरिता कोल्हे यांनी म्हटले आहे. दरम्यान गोकुळ गीते यांच्या विजया मागे अदृश्य शक्तींचा हात असल्याचे म्हणत सरिता कोल्हे यांनी थेट भाजपावरच निशाणा साधला असून याबाबत सरिता कोल्हे यांच्याशी संवाद साधला आहे 

Jun 22, 2026 12:52 (IST)

- गोकुळ गिते यांनी काल फादर्स डे ला ठेवलेले व्हॉट्स ऍप स्टेटस चर्चेत 

- 'कल तुम्हारे नाम से पिता की पहचान बदल दो' अशा आशयाचे ठेवले होते स्टेटस आणि दुसऱ्या दिवशी गोकुळ गिते झाले आमदार 

- नरेंद्र दराडे यांचा मुलगा कुणाल दराडेने बाप काढल्याने गोकुळ गिते यांची सटकली होती आणि त्यांनी अधिकृतपणे माघार देण्यास दिला होता नकार 

- माघारीच्या दिवशी नाशिकमध्ये बघायला मिळाल्या होत्या नाट्यमय घडामोडी

Advertisement
Jun 22, 2026 12:24 (IST)

Dharashiv Election LIVE Updates: ओमराजेंच्या बंडाचा फटका! धाराशिवमध्ये धक्कादायक निकाल

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या बंडाचा महविकास आघाडी ला फटका?

विधानपरिषद निवडणूक मधील महविकास आघाडी ची 150 मते फुटली

 महायुतीचे भाजपाचे उमेदवार बसवराज पाटील यांना 845 मते 

721 मतांनी बसवराज पाटील विजयी 

तर काँग्रेसच्या महेश देशमुखांना  मिळाली  केवळ 124

150 महाविकास आघाडीची मतं ही महायुतीच्या उमेदवारा

Jun 22, 2026 11:44 (IST)

Satara Sangli Vidhan Parishad: मंत्री गोरेंना धक्का, अभयसिंह जगताप यांची तगडी फाईट

 सांगली-सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीत माझा पराभव झाला असला तरी ही लढाई सुरूच राहील,आमदारकी साठी माझी निवडणूक नव्हती लोकशाही वाचवण्यासाठी माझी लढाई सुरू होते, अशी भावना सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीतील महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार अभयसनीय जगताप यांनी व्यक्त केली आहे. 

तसेच १०० मते ही अधिकची मत पडलेली आहेत, त्यामुळे महायुतीकडून महाविकास आघाडीकडे येण्यासाठी मतदार इच्छुक असल्याचा यातून स्पष्ट झाला आहे. सातारच्या दोन्ही मंत्र्यांनी मंत्रीपद शाबूत ठेवण्यासाठी मतदारांवर दबाव टाकला होता त्यामुळेच आपला पराभव झाला, अशी टीका देखील जगताप यांनी मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि जयकुमार गोरे यांचं नाव न घेता केली आहे.

Advertisement
Jun 22, 2026 11:43 (IST)

Sangli Satara Vidhan Parishad Election Result: मंत्री जयकुमार गोरेंना बालेकिल्ल्यात धक्का, १०० मते फुटल्याचा दावा

सांगली-सातारा विधान परिषद निवडणूकीत धैर्यशील कदम विजयी झाल्यानंतर सांगलीच्या मारुती चौकामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून गुलाल उधळत जल्लोष करण्यात आला आहे.. यावेळी पेढे वाटण्यात आले आमदार धैर्यशील कदम या नावाची पाटी ही झळकवण्यात आली. 

महायुतीतील भाजपाचे उमेदवार धैर्यशील कदम विजयी धैर्यशील कदम यांना ८८५ पैकी 593 मते पडली.  पहिल्या क्रमांकाची मते मिळून 301 मतांनी धैर्यशील कदम यांचा झाला विजय झाला आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अभयसिंह जगताप यांना 292 मते पडली. महाविकास आघाडीची. 192 मते होती, मात्र महायुतीची 100 मते फुटल्याचा दावा अभयसिंह जगताप यांनी केला आहे, हा मंत्री गोरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. 

Jun 22, 2026 11:38 (IST)

Solapur Vidhan Parishad Election Result: 365 मतांच्या प्रचंड आघाडीसह राजेंद्र राऊत यांचा दणदणीत विजय

सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांनी दणदणीत विजय मिळवत विरोधकांना मोठा धक्का दिला आहे.मतमोजणीअंती राऊत यांना तब्बल 483 मते मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे वसंत देशमुख यांना 118 मतांवर समाधान मानावे लागले.

मतमोजणीदरम्यान महायुतीच्या बाजूने मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचे स्पष्ट झाले.एकूण मतांपैकी 13 मते बाद ठरली.वैध मतांच्या गणनेत राजेंद्र राऊत यांनी प्रतिस्पर्धी वसंत देशमुख यांच्यापेक्षा तब्बल 365 मतांची आघाडी घेत विजयाची नोंद केली.या निकालामुळे सोलापूर जिल्ह्यात भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या विजयामुळे राजेंद्र राऊत यांचे जिल्ह्यातील राजकीय वर्चस्व आणखी मजबूत झाल्याचे मानले जात आहे. निवडणुकीपूर्वी अत्यंत प्रतिष्ठेची ठरलेल्या या लढतीत राऊत यांनी एकतर्फी विजय मिळवत विधान परिषदेत दमदार प्रवेश केला आहे. निकाल जाहीर होताच बार्शीसह सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी, गुलाल उधळण आणि विजयाचा जल्लोष सुरू झाला.

Jun 22, 2026 11:37 (IST)

Amravati Vidhan Parishad Result: अमरावतीत भाजपचा विराट विजय, काँग्रेस उमेदवाराला शून्य मते

अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीचा अखेर निकाल जाहीर झाला असून भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे यांनी ३९० मताधिक्य घेत एकतर्फी आणि प्रचंड विजय मिळवला आहे. दुसरीकडे, निवडणुकीपूर्वीपासूनच सुरू असलेल्या अंतर्गत बंडखोरी आणि क्रॉस व्होटिंगच्या राजकीय सूडनाट्यामुळे काँग्रेसचा या निवडणुकीत दारूण पराभव आणि ऐतिहासिक 'सुपडा साफ' झाला आहे.

काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हर्षजीत देशमुख यांना या निवडणुकीत चक्क 'शून्य' (०) मतदान मिळाले असून, पक्षाच्या एकाही मतदाराने त्यांच्या बाजूने कौल दिला नाही. तर वंचित बहुजन आघाडीचे निलेश विश्वकर्मा यांना ३१ मते मिळाली आहेत. निवडणुकीच्या मतदानापूर्वीपासूनच काँग्रेसमध्ये उफाळलेले अंतर्गत गृहयुद्ध आणि नगरसेवकांनी पक्षाचा 'व्हिप' डावलून केलेली उघड बंडखोरी भाजप उमेदवाराच्या या दणदणीत विजयासाठी आणि काँग्रेसच्या मानहानीकारक पराभवासाठी पूर्णपणे कारणीभूत ठरल्याचे स्पष्ट झाले आहे..

Jun 22, 2026 11:36 (IST)

Jalgaon Vidhan Parishad Result LIVE: जळगावमध्ये भाजपचे नंदकिशोर महाजन यांची विजयी मिरवणूक

जळगाव मध्ये भाजपचे नंदकिशोर महाजन यांचा विजय 

जळगाव मध्ये विजयानंतर काढण्यात आली विजय मिरवणूक 

ढोल ताशांच्या गजरात व गुलालाची उधळण करत काढण्यात आली विजय मिरवणूक 

विजयानंतर नंदकिशोर महाजन यांनी महायुतीच्या नेत्यांचे व मतदारांचे मानले आभार 

निधीच्या मुद्द्यावरून निवडणूक झाली मात्र या मुद्द्यावर बोलण्यास विजयी उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी टाळले

Jun 22, 2026 11:35 (IST)

Solapur Vidhan Parishad Election Result: मुख्यमंत्र्यांकडून राजेंद्र राऊत यांचे अभिनंदन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सोलापूरचे नवनियुक्त आमदार राजेंद्र राऊत यांचे केले अभिनंदन..

फडणवीस यांनी कॉल करून दिल्या शुभेच्छा 

राजेंद्र राऊत सोलापूर विधान परिषद निवडणुकीत विजय झाल्यानंतर दिल्या शुभेच्छा..

राजेंद्र राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 365 मतांनी विजयी झाल्याचे सांगितले

Jun 22, 2026 11:28 (IST)

Nashik Vidhan Parishad Result LIVE: नाशिकमध्ये मोठा उलटफेर! अपक्ष आमदार गोकुळ गिते शिंदे गटाच्या वाटेवर

गोकुळ गीते एका विशेष विमानाने मुंबईच्या दिशेने रवाना होणार 

 एकनाथ शिंदे यांनी भेटीसाठी बोलावलं

 गोकुळ गीते यांना मंत्री उद्या सामंत यांनी भेटण्यासाठी बोलावलं 

शिवसेना शिंदे गटात प्रवेश बाबत करणार चर्चा 

मंत्री उदय सामंत यांचा गोकुळ गीते यांचे नाना गामणे यांना फोन

Jun 22, 2026 10:05 (IST)

Nashik Election Result: नाशिकमध्ये एकनाथ शिंदेंना धक्का

एकीकडे उद्धव ठाकरेंचे सहा खासदार फोडणाऱ्या एकनाथ शिंदे यांना नाशिक मध्ये मात्र मोठा झटका.. महायुतीचे शिंदे सेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा अपक्ष गोकुळ गिते यांनी केला दारुण पराभव..

एकनाथ शिंदेंनी निवडणूक केली होती प्रतिष्ठेची

छगन भुजबळ आणि भाजपाचे अंतर्गत मत यामुळे एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारस धक्का बसला

Jun 22, 2026 10:04 (IST)

Sangli Satara Vidhan Parishad Election Result: साताऱ्यात भाजपचे धैर्यशील कदम विजयी

सांगली ब्रेकिंग...

सांगली-सातारा विधान परिषद निवडणूक 

महायुतीतील भाजपाचे उमेदवार धैर्यशील कदम विजयी 

धर्यशील कदम यांना ८८५ पैकी पडली 593 पहिल्या क्रमांकाची मते

301 मतांनी धैर्यशील कदम यांचा झाला विजय

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अभ्यासिक जगताप यांना पडली 292 मते 

महायुतीची 100 मते फुटल्याचा अभयसिंग जगताप यांचा दावा 

192 मते होती महाविकास आघाडीची.

Jun 22, 2026 09:52 (IST)

Maharashtra MLC Election Result Live: विधानपरिषदेच्या सर्व ११ जागांचे निकाल समोर..

आजच्या 11 मतदारसंघातील प्रमुख लढतीत कुणाचा विजय ? कुणाचा पराभव ?

-----------------------

नांदेड : अमर राजूरकर (भाजप) (विजयी) विरुद्ध रामदास पाटील (काँग्रेस) (पराभव)

नागपूर (पोटनिवडणूक) : डॉ. राजीव पोतदार (भाजप) (विजयी) विरुद्ध अतुल लोंढे (काँग्रेस) (पराभव)

भंडारा-गोंदिया : नरेश ईश्वरकर (काँग्रेस पाठिंबा) (पराभव) विरुद्ध अविनाश ब्राह्मणकर (भाजप) (विजयी)

छत्रपती संभाजीनगर-जालना : सुहास शिरसाट (भाजप) (विजयी) विरुद्ध गणेश लोखंडे (ठाकरेंची शिवसेना) (पराभव)

परभणी-हिंगोली : सईद खान (शिवसेना) (विजय) विरुद्ध डॉ. विवेक नावंदर (ठाकरेंची शिवसेना) (पराभव) विरुद्ध सुशील देशमुख (अपक्ष) (पराभव)

जळगाव : नंदकिशोर महाजन (भाजप) (विजय) विरुद्ध  शरद तायडे (ठाकरेंची शिवसेना) 

सांगली-सातारा : धैर्यशील कदम (भाजप) (विजयी) विरुद्ध अभयसिंह जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार) (पराभव)

नाशिक :  गोकुळ गिते (अपक्ष) (विजयी) विरुद्ध  नरेंद्र दराडे (शिवसेना) (पराभव)

सोलापूर : राजेंद्र राऊत (भाजप) (विजयी) विरुद्ध  वसंतराव देशमुख (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार) (पराभव)

धाराशिव-लातूर-बीड : बसवराज पाटील (भाजप) (विजयी) विरुद्ध महेश देशमुख (काँग्रेस)

अमरावती : हर्षदीप देशमुख (काँग्रेस) (पराभव) विरुद्ध प्रवीण पोटे (भाजप) (विजयी) विरुद्ध निलेश विश्वकर्मा (वंचित) (पराभव)

Jun 22, 2026 09:49 (IST)

Dharashiv Vidhan Parishad Election Result: भाजपाचे उमेदवार बसवराज पाटलांचा दणदणीत विजय

धाराशिव ब्रेकिंग - 

भाजपाचे उमेदवार बसवराज पाटलांचा दणदणीत विजय 

721 मतांनी काँग्रेसचे उमेदवार महेश देशमुख यांना चारली पराभवाची धूळ

राज्यात सर्वाधिक मताधिक्य घेऊन विजयी असण्याची शक्यता

845  मतांसह बसवराज पाटील विजयी

महाविकास आघाडीच्या मतालाही धक्का 

काँग्रेस उमेदवार महेश देशमुख यांना 124 मत, 14 बाद झाल्याची माहिती 

14 मतपत्रिका कोऱ्या असल्याची माहिती

विजयाची अधिकृत घोषणाबाकी

Jun 22, 2026 09:48 (IST)

Jalgaon Vidhan Parishad Result LIVE:जळगावमध्ये भाजप उमेदवार नंदकिशोर महाजन यांचा विजय

Jalgaon Election Result:

जळगावमध्ये भाजप उमेदवार नंदकिशोर महाजन यांचा विजय 

जळगाव हा महायुतीचा बालेकिल्ला पुन्हा सिद्ध आमदार सुरेश भोळे यांची पहिली प्रतिक्रिया 

महायुतीत झालेली बंडखोरी मतदानापूर्वी शमली त्यामुळे महायुतीत मनोबिलन झाल्याचेही केले आमदार सुरेश भोळे यांनी स्पष्ट 

आमदार सुरेश भोळे यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी..

Jun 22, 2026 09:45 (IST)

Nashik Vidhan Parishad Result LIVE: नाशिकमध्ये धक्कादायक निकाल, गोकुळ गीते विजयी

नाशिकमध्ये धक्कादायक निकाल.. अपक्ष गोकुळ गितेंनी केला नरेंद्र दराडेंचा पराभव.... गोकुळ गितेंचा 357 मतांनी विजय

एकूण मतदान -618

पैकी 13 अवैध 

605 वैध मते 

कोटा 303

अपक्ष गिते -357

महायुती नरेंद्र दराडे - 248(4टेबलं ) 

गिते विजयी

प्रसाद हिरे -00

Jun 22, 2026 09:43 (IST)

MLC Election Result LIVE Update: विधानपरिषदेचा महानिकाल! सर्व जागांच्या विजयी उमेदवारांची यादी

विधान परिषद निवडणुकीचा निकाल

17 जागांपैकी 6 जागांचे निकाल बिनविरोध

11 जागांसाठीचे निकाल जवळपास स्पष्ट

  1. नांदेडमध्ये महायुतीचे अमर राजुरकर विजयी 
  2. नागपूरमध्ये महायुतीचे राजीव पोतदार
  3. भंडाऱ्यामध्ये महायुतीचे अविनाश ब्राम्हणकर विजयी
  4. संभाजीनगर-जालनामध्ये महायुतीचे सुहास शिरसाट विजयी
  5. परभणीमध्ये महायुतीचे सईद खान विजयी
  6. जळगावमध्ये महायुतीचे नंदकिशोर महाजन विजयी
  7. सोलापूरमध्ये राजेंद्र राऊत विजयी
  8. सातारा- सांगली विधान परिषद: धैर्यशील कदम विजयी
  9. नाशिक विधान परिषद: गोकुळ गीते विजयी 

Jun 22, 2026 09:38 (IST)

Solapur Vidhan Parishad Election Result: सोलापूरात भाजपचे राजेंद्र राऊत विजयी

सोलापूर ब्रेकिंग : 

- भाजपचे राजेंद्र राऊत विजयी 

- राजेंद्र राऊत यांना 454 मते तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वसंत देशमुख यांना ११८ मते 

- राजेंद्र राऊत ४८३ मतांनी आघाडीवर 

-⁠

Jun 22, 2026 09:31 (IST)

Nashik Vidhan Parishad Election Result: नाशिकमध्ये सर्वात मोठा उलटफेर, अपक्ष गोकुळ गीतेंची विजयी आघाडी?

नाशिक विधान परिषद निवडणूक निकालात सर्वात मोठा ट्वीस्ट निर्माण झाला आहे. नाशिकमध्ये गोकुळ गीते यांनी विजयी आघाडी घेतली आहे. महायुतीसाठी  हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. 

Jun 22, 2026 09:28 (IST)

Aurangabad - Jalna Vidhan Parishad Result LIVE: भाजप उमेदवार सुहास शिरसाट विजयी

औरंगाबाद- जालना विधानपरिषद निकाल: भाजप उमेदवार सुहास शिरसाट विजयी

Jun 22, 2026 09:27 (IST)

Nagpur Vidhan Parishad Election Result LIVE: धिकृत निकाल जाहीर होण्यापूर्वीच भाजपकडून विजयाच्या जल्लोष सुरू

- अधिकृत निकाल जाहीर होण्यापूर्वीच भाजपकडून विजयाच्या जल्लोष सुरू 

- भाजप उमेदवार डॉ राजीव पोतदार यांची निर्णायक आघाडीच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष सुरू करण्यात आला आहे 

- सिव्हिल लाईन परिसरात भाजप पदाधिकारी,कार्यकर्ते गोळा झाले असून फटाके फोडण्यात येत आहेत,मिठाई वाटण्यात येत आहे

Jun 22, 2026 09:23 (IST)

Solapur Election Result LIVE: सोलापूर विधान परिषदेत राजेंद्र राऊत आघाडीवर

सोलापूर ब्रेकिंग : 

- भाजपचे राजेंद्र राऊत आघाडीवर

- भाजप राजेंद्र राऊत यांना 107 मते 

- तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वसंत देशमुख यांना 27 मते 

- तर 16 मते वैध की अवैध याबाबत चर्चा सुरू

Jun 22, 2026 09:19 (IST)

MLC Election Result LIVE Updates: कॉस वोटिंगचा काँग्रेसला फटका, भाजपचे आणखी दोन उमेदवार विजयी

नागपूरपाठोपाठ भंडाऱ्यातही भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे. भंडाऱ्यात भाजपचे अविनाश ब्राम्हणकर विजयी झाले आहेत. त्यापाठोपाठ नांदेडमध्येही भाजपचा विजय झाला आहे. नांदेडमध्ये अमरनाथ राजुरकरांचा विजय झाला आहे. मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग झाल्याने भाजपला मोठा फटका बसला आहे. 

भंडारा गोंदिया विधानपरिषद निवडणूक 

भाजपा अविनाश ब्राह्मणकर - ३०४

अपक्ष नरेश ईश्वरकर - १५२

भाजप अविनाश ब्राह्मणकर विजयी

Jun 22, 2026 09:15 (IST)

Dharashiv Election LIVE Updates: धाराशिवमध्ये भाजपच्या विजय रथाची सजावट

धाराशिवमध्ये भाजपच्या विजय रथाची सजावट 

मतमोजणीला सुरुवात दुसरीकडे निकाला अगोदरच भाजपकडून जल्लोषाची तयारी 

धाराशिव बीड लातूर विधान परिषदेत भाजप विरुद्ध काँग्रेस लढत 

विजयाची खात्री आहे त्यामुळेच आम्ही तयारी करत आहोत भाजप कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया 

Jun 22, 2026 09:07 (IST)

Nagpur Vidhan Parishad Election Result LIVE: नागपूरमध्ये राजीव पोतदार विजयी, लोंढेंचा पराभव

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांची मतमोजणी सुरु आहे, त्यामधील पहिला निकाल हाती आला आहे. नागपूर विधानपरिषदेत भाजपचे राजीव पोतदार विजयी झाले आहेत. त्यांनी अतुल लोंढे यांचा पराभव केला आहे. 

Jun 22, 2026 09:02 (IST)

Nashik Vidhan Parishad Result LIVE: नाशिकच्या मतमोजणी केंद्रात राडा, गोकुळ गिते- दराडे समर्थक आमनेसामने

नाशिकच्या मतमोजणी केंद्रात राडा! दराडे आणि गिते उमेदवार प्रतिनिधी आमने सामने, गोकुळ गिते यांनी नरेंद्र दराडे यांच्या भावाबाबत घेतला होता आक्षेप. त्यानंतर दोन्ही गटात बाचाबाची,  पोलिसांनी उमेदवार प्रतिनिधींना बाहेर काढले

Jun 22, 2026 09:00 (IST)

Nashik Vidhan Parishad Election Result LIVE: निकालाच्या दिवशी गोकुळ गिते फिरले.. नाशिकमध्ये मोठा ट्वीस्ट

नाशिक विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्वीस्ट आला आहे. अपक्ष गोकुळ गीते यांनी माघार घेण्याची घोषणा केली होती मात्र त्यांनी गुपचूप प्रचार केला, असा गंभीर आरोप नरेंद्र दराडे यांनी केला आहे. दुसरीकडे, मी माघार घेतली होती पण पाठिंबा दिला नव्हता, माझा मतदारांवर विश्वास आहे असे म्हणते गोकुळ गीते यांनीही निकालादिवशी भूमिका बदलली आहे, त्यामुळे या निवडणुकीत मोठा ड्रामा पाहायला मिळत आहे. 

Jun 22, 2026 08:55 (IST)

Nashik Vidhan Parishad Election Result LIVE: गोकुळ गिते आक्रमक, नरेंद्र दराडेंच्या भावाबाबत घेतला आक्षेप

- गोकुळ गिते यांनी नरेंद्र दराडे यांच्या भावाबाबत घेतला होता आक्षेप 

- किशोर दराडे विद्यमान शिक्षक आमदार असल्याने मतमोजणी केंद्रात उपस्थिती कसे ? असा घेतला होता आक्षेप 

- गिते आणि दराडे यांचे वकील मतमोजणी केंद्रात दाखल 

- सुनावणीमध्ये शंकेचे निरसन करण्यात आले असून दुसरीकडे मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात

Jun 22, 2026 08:51 (IST)

Nashik Vidhan parishad Election Result LIVE: नाशिक विधानपरिषद निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप

- नाशिक विधानपरिषद निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेवर आक्षेप

- अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी आक्षेप घेतल्याची माहिती

- गोकुळ गीतेंच्या आक्षेपावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर सुनावणी सुरू

Jun 22, 2026 08:39 (IST)

Parbhani- Hingoli Vidhan Parishad Result: परभणीत मतमोजणीला सुरुवात

परभणी हिंगोली विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला काही क्षणात सुरुवात होणार आहे. विधानपरिषद निवडणुकीसाठी तीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतमोजणी प्रक्रियेसाठी 3 टेबलांवरती ही मतमोजणी होणार आहे. खरं पाहिले गेले तर महाविकास आघाडीचे डॉक्टर डॉ. विवेक नावंदर,  महायुतीचे सईद खान आणि अपक्ष सुशील देशमुख अशी तिहेरी लढत या निवडणुकीत पाहायला मिळाली होती. तिन्ही पक्षाकडून विजयाची दावे केले जात आहेत. काही क्षणात मतमोजणीला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. 

Jun 22, 2026 08:38 (IST)

Amravati Vidhan Parishad Result: अमरावती विधान परिषद, मतमोजणीला सुरुवात

अमरावती विधानपरिषद निवडणूक

आज सकाळी 8 वाजता पासून मतमोजणीला होणार सुरुवात...

उमेदवारी अर्ज प्रक्रियेपासून अमरावतीची निवडणूक राज्यात चर्चेत राहिली आहे 

451 पैकी 427 मतदारांनी बजावला होता मतदानाचा हक्क...

भाजपाचे उमेदवार प्रवीण पोटे पाटील यांचा एकतर्फी विजय होण्याचा अंदाज....

 मतमोजणीसाठी दोन टेबल चार अधिकारी  असणार,  दोन तासात सकाळी 10 वाजेपर्यंत अंतिम निकाल घोषित होणार...

भाजपकडून प्रवीण पोटे पाटील, काँग्रेसकडून हर्षजीत देशमुख आणि वंचित बहुजन आघाडी कडून निलेश विश्वकर्मा आहे रिंगणात...

 एकूण सात मतदान केंद्रावर झाले होते मतदान..

 मतपत्रिकेचे एकूण 25 गठ्ठे तयार करून मतमोजणीची आकडेवारी करणार चेक.

Jun 22, 2026 08:37 (IST)

Jalgaon Vidhan Parishad Result LIVE: निवडणुकीसाठी मतमोजणीला सुरुवात

जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी मतमोजणीला सुरुवात

मत पेट्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर काढण्यात आल्या असून मतमोजणीला सुरुवात...

मतदानाच्या चिठ्ठ्या पेटीच्या बाहेर काढून मतमोजणीला सुरुवात झाली आहे

Jun 22, 2026 08:36 (IST)

Sangali-Satara Vidhan Parishad Election Result: सांगली-सातारा विधान परिषद मतमोजणीला सुरुवात

सांगली-सातारा विधान परिषद मतमोजणीला सुरुवात.

पाच टेबलवर होणार मतमोजणीला सुरुवात 

८९४ मतांची होणार आहे,मतमोजणी 

वैध मते मोजल्यानंतर पहिल्या पसंतीची कोटा होणार निश्चित 

१० वाजेपर्यंत मतमोजणीचा कल होणार स्पष्ट 

३ उमेदवार आहेत रिंगणात,मात्र दुरंगी झाली निवडणूक 

महायुतील भाजपाचे धैर्यशील कदम आणि महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अभयसिंह जगताप यांच्यात झाली आहे थेट लढत

Jun 22, 2026 08:35 (IST)

Aurangabad - Jalna Vidhan Parishad Result LIVE: भाजप उमेदवार सुहास शिरसाट आघाडीवर

भाजप उमेदवार सुहास शिरसाट आघाडीवर 

मतमोजणीला सुरवात झाली आहे 

औरंगाबाद -जालना विधानपरिषद 

महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना

Jun 22, 2026 08:34 (IST)

Nashik MLC Election Result LIVE: नाशिकमध्ये मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात

- नाशिकमध्ये मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात 

- मतपत्रिकांच्या एकत्रिकरणाला सुरुवात 

- मतपत्रिकांचे 50-50 चे गठ्ठे केल्यानंतर वैध अवैध मत बाजूला केली जाणार 

- मतमोजणी केंद्रात निवडणूक अधिकारी, उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित

Jun 22, 2026 08:30 (IST)

Maharashtra Vidhan Parishad Election Result LIVE: कुठे कोणते उमेदवार बिनविरोध विजयी?

कुठे कोणते उमेदवार बिनविरोध विजयी?

ठाणे - रवींद्र फाटक - शिवसेना

यवतमाळ - दुष्यंत चतुर्वेदी - शिवसेना

रायगड - रत्नागिरी - सिंधुदुर्ग - अनिकेत तटकरे - राष्ट्रवादी काँग्रेस

पुणे - विक्रम काकडे - राष्ट्रवादी काँग्रेस

वर्धा - गडचिरोली - चंद्रपूर - अरुण लखाणी - भाजप

अहिल्यानगर - प्राजक्त तनपुरे - भाजप

Jun 22, 2026 08:29 (IST)

Nashik Vidhan Parishad Result LIVE: नाशिक विधान परिषदेच्या निकालाकडे लक्ष

राज्यातील 11 विधान परिषद निवडणुकीसाठी उद्या मतमोजणी होणार असून खास करून नाशिकच्या जागेकडे विशेष लक्ष लागले आहे. हायव्होल्टेज ठरलेली ही निवडणूक ऑपरेशन टायगर राबवणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी प्रतिष्ठेची केली आहे. अपक्ष गोकुळ गीते यांनी महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत माघारीची घोषणा केली असली तरी मात्र शिंदे गटाचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना गीते यांनी काटे की टक्कर दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यामुळे उद्याच्या निकालानंतर देखील नाशिकमध्ये नाट्यमय घडामोडी समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही