त्रिशरण मोहगावकर, प्रतिनिधी:
Latur Heavy Rain: लातूर जिल्ह्यात मागील २४ तासांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली असून, यामुळे जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सततच्या पावसामुळे मांजरा आणि तेरणा या प्रमुख नद्या तसेच अनेक छोटे-मोठे ओढे व नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. नदी-नाल्यांमध्ये आलेल्या पुरामुळे आसपासच्या शेतांमध्ये पाणी शिरले असून, त्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नदी पात्रावर अनेक ठिकाणी बॅरेजेस आहेत या बॅरेजेस चे दरवाजे देखील उघडण्यात आलेले आहेत.
पूरस्थिती गंभीर, शेती पाण्याखाली
लातूर जिल्ह्यात पुलावरून पाणी गेल्याने रस्ते आणि पुल खचल्याने 66 मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. लातूर जिल्ह्यात पुराच्या पाण्यात अडकलेल्या 12 जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. जळकोट तालुक्यात एकजन पाण्यात वाहून गेल्याने बेपत्ता आहे. त्याचा शोध सुरू आहे. उदगीर अहमदपूर जळकोटच्या फायर ब्रिगेड च्या टीम जळकोट तालुक्यात कालपासून शोध घेत आहेत. जळकोटची एक घटना सोडली तर जिल्हयात जिवीत हानी झाली नसल्याची माहिती आहे. 27 पशुधना पैकी 17 गाई म्हशी, 7 वासरे 2 बैल 1 बकरी आणि 605 कोंबड्या वाहून गेल्या आहेत. जिल्हयात एकून 116 घरांची पडझड झाली आहे.
Maharashtra Rain: राज्यात पावसाचे तुफान! नांदेड, लातूरला झोडपलं, शाळांना सुट्टी जाहीर
जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये शेतीमधील पिके पाण्याखाली गेल्याचे माहिती आहे. विशेषतः खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, आणि ऊस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान प्रचंड असून, अनेक ठिकाणी शेतीचे बांधही वाहून गेले आहेत. पुरामुळे अनेक ग्रामीण भागांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. काही ठिकाणी रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. नदीकाठच्या गावांमध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
प्रशासन अलर्टवर; मदत व बचाव कार्य सुरू
जिल्हा प्रशासनाने आपत्कालीन पथके तात्काळ तैनात केली असून, तलाठी, ग्रामसेवक व महसूल विभागाच्या पथकांनी संभाव्य पूरग्रस्त भागांमध्ये पाहणी सुरू केली आहे. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची तयारीही सुरू झाली आहे. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, नदीकाठच्या भागात न जाण्याची सूचना दिली आहे. हवामान खात्याने पुढील २४ तासांत देखील जोरदार पावसाचा इशारा दिल्याने, जिल्हा प्रशासन पूर्णतः सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे.
Nandurbar News: यातना संपणार कधी? झोळीतून नेताना आदिवासी महिलेची रस्त्यातच प्रसूती