जाहिरात

Maharashtra Rain: राज्यात पावसाचे तुफान! नांदेड, लातूरला झोडपलं, शाळांना सुट्टी जाहीर

Maharashtra Rain: नांदेड जिल्ह्यातील परिस्थिती बिघडली असल्याने  एसडीआरएफ आणि सीआरपीएफ आणि सैन्य दलाला पाचारण केले आहे.

Maharashtra Rain: राज्यात पावसाचे तुफान! नांदेड, लातूरला झोडपलं, शाळांना सुट्टी जाहीर
नांदेड:

योगेश लाटकर

Maharashtra Rain News:  अकोल्याच्या म्हातोडी गावात गेल्या तीन-चार दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा संततधार आणि ढगफुटीसदृश पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गावात सर्वत्र पाणी साचल्याने अनेक घरातील जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विजेच्या कडकडाटासह सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांची धांदल उडाली असून, वाहनचालकांनाही अनेक ठिकाणी अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तर काही भागात वीज पुरवठा खंडित झाल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. प्रशासनाकडून मदत कार्य सुरू असले तरी अजूनही अनेक नागरिक अडचणीत आहेत.

नांदेडमध्ये तुफान

नांदेड शहरात आज पहाटे पासुन मुसळधार पाऊस सूरू आहे. कालपासून जिल्ह्यात पाऊस सूरू आहे. आज देखील हवामान खात्याने नांदेड जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. पहाटे 2 पासुन विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सूरू आहे. पाऊस आणि पुर परिस्तिथीमुळे जिल्ह्यांतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. पाऊस सुरूच असल्याने शहरातील सखल भागात पाणी साचले आहे. जिल्ह्यातील परिस्थिती बिघडली असल्याने  एसडीआरएफ आणि सीआरपीएफ आणि सैन्य दलाला पाचारण केले आहे.

Mumbai Local News: मध्य रेल्वेचा सलग दुसऱ्या दिवशी खोळंबा! प्रवाशांचा संताप; जाणून घ्या सद्यस्थिती?

लातूरमध्ये शाळांना सुट्टी

लातूर जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे 60 पैकी 29 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी नोंदवली गेली आहे. या पावसामुळे नदी, ओढ्यांची पाणी पातळी वाढून रस्ते, पुलावरून पाणी वाहत असल्याने जवळपास 49 रस्त्यांवरील वाहतूक बंद झाली आहे.  29 ऑगस्ट 2025 रोजी पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता लक्षात घेऊन हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. तसेच शाळांनाही सुट्टी जाहीर केली आहे. 

बीडमध्येही पावसाचा हाहाकार...

 मागील दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाने शिरूर तालुक्यातील सिंदफणा पाणी प्रकल्प ओवरफ्लो झाला असून सिंदफना नदी दुथडी भरून वाहत आहे. 24 तासांमध्ये बीड जिल्ह्यात 25 मिलिमीटर पाऊस झाला यात शिरूर तालुक्यात 22.5 मिलिमीटर पावसाची नोंद आहे. या दमदार पावसाने तालुक्यातील सिंदफणा, सिद्धेश्वर आणि बेलपारा हे पाणी प्रकल्प ओसंडून वाहत आहेत. यामुळे शिरूरकरांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागलाय. मे महिन्यानंतर या ठिकाणी पावसाने ओढ दिली होती. मात्र मागील आठवडाभरापूर्वी आणि दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पाणी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहे. विशेष म्हणजे सिंदफणा प्रकल्प पूर्ण भरून नदी दुथडी भरून वाहत आहे. हे चित्र शेतकऱ्यांना समाधान देणार आहे.

Sangamner News: शिवसेना शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला, हल्लेखोर कोण?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com