Maharashtra Rain: कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपलं! वाहने अडकली, घरांमध्ये पाणी शिरलं

मुसळधार पाऊस आल्याने नोकरदारांची आणि नागरिकांचीही तारांबळ उडाली. अनेकांनी छत्र्या आणल्या नव्हत्या. काहींनी पावसाळी ड्रेसही आणले नव्हते.

जाहिरात
Read Time: 2 mins

विशाल पुजारी, प्रतिनिधी:

Kolhapur Rain News: कोल्हापूर जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी ढगफुटीसदृश पाऊस झाला. या पावसामुळे अनेक भागात काही काळ जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले. ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागलेत. नद्यांच्या पाणी पातळीतही किंचितसी वाढ झालीये. कोल्हापूर शहरातील नागरी वस्तीमध्येही पाणी शिरलं. गटारे भरून पाणी रस्त्यांवर वाहू लागल्याने रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले तर अनेक घरांमध्ये, बेसमेंटमध्येही पाणी घुसले.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अनेक ठिकाणी दुचाकी आणि चारचाकी पाण्यात बुडाल्याच चित्र पाहायला मिळाले. उड्डाणपुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली. तसेच सेवा रस्त्यांवरही पाणी भरल्याने काही वाहने अडकून पडलेली.  या पावसात महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पावसाने शहरात सर्वांचीच दाणादाण उडवून दिली.

या पावसामुळं कोल्हापूरच तुंबापूर झाल्याचे पाहायला मिळालं. संध्याकाळी शासकीय, खासगी कार्यालये सुटण्याच्यावेळीच मुसळधार पाऊस आल्याने नोकरदारांची आणि नागरिकांचीही तारांबळ उडाली. अनेकांनी छत्र्या आणल्या नव्हत्या. काहींनी पावसाळी ड्रेसही आणले नव्हेत. त्यामुळे नागरिक अडकून पडले होते.

नक्की वाचा - Beed News : लग्नाळू मुलांची फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक, बीडमधील धक्कादायक प्रकरण

वाशिममध्येही जोरदार पाऊस

वाशिमच्या रिसोड तालुक्यातील बेलखेडा आणि रिठद परिसरात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.या पावसात संत्रा बाग नुकसान आणि सौलर पंप उन्मळून पडले असून काही भागात वीज वाहिन्यांच्या तारा तुटून पडल्यामुळे वीजपुरवठा पूर्णतः खंडित झाला आहे. त्यामुळे शेतकरी अंधारात आणि सिंचनाच्या समस्येत सापडले आहेत.

Advertisement

जालन्यामध्येही मुसळधार

दरम्यान, जालना जिल्ह्यात रात्री सहाच्या सुमारास भोकरदन तालुक्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे या वादळी वाऱ्यात विजेचा कडकडाट होऊन जोरदार पाऊस झाला यात तळणी गावातील शेत शिवारात शेती मशागतीचे काम करत असताना शेतकरी पंडित आनंदा गायके यांच्या बैलाच्या अंगावर वीज पडून त्याचा भरपूर मृत्यू झाला आहे ,सदर घटनेत शेतकऱ्याचे 70 हजार रुपये चे नुकसान झाले असून खरीप पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्याच्या बैलाचे वीज पडून मृत्यू झाल्याने शेती मशागतीचा प्रश्न या शेतकऱ्याकडे उभा टाकला आहे त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Topics mentioned in this article