Rain Update : मुंबई, पुण्यात मुसळधार पावसाची शक्यता; विदर्भात ऑरेंज अलर्ट, हवामान विभागाकडून इशारा

पुणे, मुंबई आणि विदर्भातील पावसामुळे तापमानात मोठी घट होण्याची शक्यता आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

महाराष्ट्रात मागील आठवड्यापासून निर्माण झालेले अवकाळी पावसाचे वातावरण अद्याप कायम असून, महामुंबई परिसरात आज, मंगळवार आणि उद्या, बुधवारसाठी ‘यलो ॲलर्ट' देण्यात आला आहे. ठाणे आणि मुंबईमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून दक्षिण कोकणामध्येही ‘यलो ॲलर्ट' देण्यात आला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पुण्यात पुढील 4 दिवस येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात पुढील 4 दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. पुणे वेध शाळेने हा अंदाज वर्तवला आहे. मॉन्सूनपूर्व हवामानातील बदल, चक्रीय स्थिती आणि वातावरणातील आर्द्रतेमुळे शहरात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शहरातील तापमानात देखील होणार मोठी घट होण्याची शक्यता आहे.  पुणे आणि परिसरात मंगळवारी (13 मे) कमाल तापमानात किंचित घट होणार असून कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस इतके नोंदविले जाईल. किमान तापमान 24 अंश सेल्सिअस नोंदवले जाईल. 

Advertisement

नक्की वाचा - Marathwada Unseasonal Rain: मराठवाड्याला अवकाळीने झोडपले; 7 जणांचा मृत्यू, शेतीचंही मोठं नुकसान

नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने 14 आणि 15 मे रोजी विदर्भातील गडचिरोली, यवतमाळ, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मुसळधार अवकाळी पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. दरम्यान, नाशिकलाही आज पाचव्या दिवशी अवकाळी पावसाने झोडपले असून सिंधुदुर्गमधील सावंतवाडीमध्ये अवकाळी पाऊस बरसला.

Advertisement