Mumbai Monsoon Alert : महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा! मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाचा इशारा

मुंबईत आज मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. दुपारी 2.44 वाजता समुद्रात हाय टाईड आहे. यावेळी समुद्रात सुमारे 4.39 मीटर लाटा उसळण्याची शक्यता आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

गेल्या अनेक दिवसांपासून उघड-झाप सुरू असलेल्या पावसाने 14 जूनच्या रात्रीपासून राज्यातील अनेक भागात दमदार हजेरी लावली आहे. येत्या 24 तासांत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली जात असून रत्नागिरी-रायगडला अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर मुंबई उपनगरात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 

मुंबई उपनगरात काल 14 जूनच्या रात्रीपासून तुफान पाऊसधारा कोसळत होत्या. ठाणे, कल्याण आणि अंबरनाथ-बदलापूर परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्याशिवाय मुंबईतही रात्रीपासून पाऊस कोसळत आहे. सकाळपासून मुंबईत पावसाची रिपरिप सुरू  असून मुंबईत ढगाळ वातावरण अनेक परिसरात अंधार पाहायला मिळत आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Vikhroli Flyover : मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, इंधन अन् वेळही वाचणार; आजपासून विक्रोळी उड्डाणपूल वाहतुकीस खुला

मुंबईत आज मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. दुपारी 2.44 वाजता समुद्रात हाय टाईड आहे. यावेळी समुद्रात सुमारे 4.39 मीटर लाटा उसळण्याची शक्यता आहे. मुंबईकरांनी समुद्रात येणाऱ्या भरती वेळी समुद्रकिनारी न जाण्याचे प्रशासनाने आवाहन केलं आहे. 
 

Topics mentioned in this article