Zilla Parishad Election Result : कुणाला सर्वाधिक जागा, तर कोण ठरलं सरप्राईज पॅकेज? वाचा A टू Z निकाल

फेब्रुवारी 2026 मध्ये झालेल्या जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीचे सर्व निकाल आता समोर आले आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins

Zilla Parishad Election Result :  फेब्रुवारी 2026 मध्ये झालेल्या जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीचे सर्व निकाल आता समोर आले आहेत. 12 जिल्ह्यांमधील राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे यंदाच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांना दु:खाची किनार होती. त्यामुळे निकाल समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेते भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान पुण्यात राष्ट्रवादी पक्षाने आपली सत्ता कायम राखली. इतर जिल्ह्यांमध्ये काय आहे परिस्थिती? भाजप किती जागांवर विजयी झालाय?  या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (BJP) सर्वाधिक जागा जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही अनेक जिल्ह्यांमध्ये मुसंडी मारली आहे.

12 जिल्ह्यांमधील एकूण 731 जागांचा संपूर्ण तपशील आणि पक्षनिहाय सविस्तर बातमी खालीलप्रमाणे...

जिल्हा परिषद निवडणुकीत कोणाला मिळाल्या किती जागा?

या निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांनी मोठी कामगिरी केली असून, प्रत्येक राजकीय पक्षाची एकूण आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:

 * भाजप (BJP): 225 जागा
 * राष्ट्रवादी काँग्रेस (NCP): 165 जागा
 * शिवसेना (SS): 162 जागा
 * भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC): 55 जागा
 * शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे (SS-UBT): 43 जागा
 * राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार (NCP-SP): 26 जागा
 * अपक्ष (Independent): 20 जागा
 * इतर नोंदणीकृत पक्ष (Unrecognized Parties): 14 जागा
 * मान्यताप्राप्त राज्य पक्ष (इतर राज्ये): 7 जागा
 * महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS): 2 जागा
 * बहुजन समाज पार्टी (BSP): 0 जागा
 * भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI/M): 0 जागा

नक्की वाचा - सोशल मीडियावर 'हिट', जनतेच्या दरबारात 'फ्लॉप'; कोण आहेत नेत्यांचे 'हे' पराभूत नातेवाईक

जिल्ह्यानुसार सविस्तर निकाल

कोकण विभाग:

 * रायगड (59 जागा): येथे शिवसेनेने 23 जागांसह मोठी झेप घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला 17 तर भाजपला 15 जागा मिळाल्या आहेत. ठाकरे गटाने येथे 4 जागांवर विजय मिळवला आहे.
 * रत्नागिरी (56 जागा): शिवसेनेचे येथे निर्विवाद वर्चस्व पाहायला मिळाले असून त्यांनी 41 जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी (5), ठाकरे गट (5), भाजप (4) आणि मनसेने येथे 1 जागा जिंकली आहे.
 * सिंधुदुर्ग (50 जागा): भाजपने येथे 27 जागांसह आपले वर्चस्व राखले आहे. शिवसेना 13, अपक्ष 7 आणि ठाकरे गटाला 3 जागा मिळाल्या आहेत.

पश्चिम महाराष्ट्र:

 * पुणे (73 जागा): राष्ट्रवादी काँग्रेसने 51 जागा जिंकून पुण्यात आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले आहे. येथे भाजपला 10, शिवसेनेला 5, ठाकरे गटाला 6 तर काँग्रेसला 0 जागा मिळाली आहे.
 * सातारा (65 जागा): येथे भाजप (19), राष्ट्रवादी काँग्रेस (18) आणि शिवसेना (15) यांच्यात चुरस पाहायला मिळाली. इतर नोंदणीकृत पक्षाने येथे 1 जागा जिंकली आहे.
 * सांगली (61 जागा): राष्ट्रवादी काँग्रेस (SP) ने येथे 18 जागा मिळवल्या आहेत. भाजप (16), काँग्रेस (11) आणि शिवसेनेने 7 जागांवर विजय मिळवला आहे.
 * सोलापूर (68 जागा): भाजपने येथे 38 जागांसह मोठी मजल मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला 11 तर शिवसेनेला 8 जागा मिळाल्या आहेत.
 * कोल्हापूर (68 जागा): येथे संमिश्र निकाल लागले असून राष्ट्रवादी काँग्रेसला 20, काँग्रेसला 14, भाजपला 12 आणि शिवसेनेला 9 जागा मिळाल्या आहेत.

मराठवाडा विभाग:

 * छत्रपती संभाजीनगर (63 जागा): भाजपने 23 तर शिवसेनेने 20 जागा जिंकल्या आहेत. ठाकरे गटाने येथे 9 जागांवर विजय मिळवला असून 5 जागा अपक्षांच्या खात्यात गेल्या आहेत.
 * परभणी (54 जागा): भाजपने 24 जागांसह आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला 15 तर ठाकरे गटाला 6 जागा मिळाल्या आहेत.
 * धाराशिव (55 जागा): भाजप (19) आणि शिवसेना (15) यांनी येथे चांगली कामगिरी केली आहे. ठाकरे गटाला 7 तर राष्ट्रवादीला 6 जागा मिळाल्या आहेत.
 * लातूर (59 जागा): काँग्रेसने येथे 23 जागांसह दमदार पुनरागमन केले आहे. भाजपला 18 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 12 जागांवर विजय मिळाला आहे.