Video: समोसा, कचोरीसाठी पायाने तुडवला मैदा, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ, Video पाहून म्हणाल...

व्हिडिओतील कामगाराचे नाव माधाराम गोकलराम प्रजापत आहे. त्याला या घटनेनंतर कामावरून काढून टाकण्यात आले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • बुलडाण्यातील जानेफळ येथील जय अंबे स्वीट मार्ट हॉटेलमध्ये मैदा पायाने तुडवण्याचा व्हिडीओ व्हायरल
  • अन्न व औषध प्रशासनाने त्वरित कारवाई करत हॉटेल बंद करण्याची नोटीस दिली आहे
  • एफडीएच्या पथकाने हॉटेलमालकाच्या घरीही खाद्यसाहित्य ही ताब्यात घेतले आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
बुलढाणा:

अमोल सराफ 

अन्न आणि औषध प्रशासनाने सध्या सगळीकडे धडक कारवाई सुरू केली आहे. तुकाराम मुंढे यांनी एफडीएची धुरा सांभाळण्यानंतर संपूर्ण राज्यात ही कारवाई होत आहे. मात्र असं असलं तरी अनेक हॉटेल व्यवसायिक सुधारले नाहीत. बुलडाण्यात एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओत हॉटेलमध्ये मैद्याचे पदार्थ बनवले जातात. त्यात समोसा- कचोरी आणि इतर नाश्ताचे पदार्थ बनवले जातात. त्या आधी हा मैदा पायाने तुडवला जात आहे. असा हा व्हिडीओ समोर आला आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून याची त्वरीत दखल घेतली आहे. 

18 जून रोजी जानेफळ येथील जय अंबे स्वीट मार्टमध्ये हा प्रकरा घडला होता. त्यानंतर एफडीएचे पथक या ठिकाणी धडकले. त्यांनी या हॉटेल विरोधात कारवाई केली आहे. हे  हॉटेल बंद करण्याची नोटीस हॉटेल मालकाला देण्यात आली आहे. येथील बस थांबा चौकात अमडापूर रोडवर भवाराम हिरामण प्रजापत याच्या मालकीचे जय अंबे स्वीट मार्ट हॉटेल आहे. या हॉटेलमधून अनेक जण नाश्ता करत असात.  त्यात समोसा आणि कचोरी यांचा समावेश असतो.  विक्री करण्यात येत असलेले पदार्थ बनविण्यासाठी वापरण्यात येणारा मैदा एक कामगार आपल्या पायाने तुडवत होता. हा  व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. 

Advertisement

नक्की वाचा - Rohini Paradhye: रिल स्टार रोहिणी पाराध्ये आत्महत्या प्रकरणात ट्वीस्ट, 'ही' व्यक्ती खरी सुत्रधार, गुन्हा दाखल

त्यानंतर याची अन्न व औषध प्रशासनातर्फे गंभीर दखल घेतली. अन्न सुरक्षा अधिकारी अक्षय संजय भोपाळे यांच्या पथकाने जानेफळ येथे धाड टाकली. हॉटेल मधील साहित्याची तपासणी केली. तसेच हॉटेल मालकाच्या घरी सुद्धा हॉटेलमधील साहित्य होते. त्यानुसार बेसन, मैदा, तेल व इतर साहित्याची तपासणी करून नमुने घेण्यात आले आहे. दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओतील कामगाराचे नाव माधाराम गोकलराम प्रजापत आहे. त्याला या घटनेनंतर कामावरून काढून टाकण्यात आल्याचे हॉटेल मालकाने सांगितले आहे.  

नक्की वाचा - Monsoon Update: काय आहे सोमाली जेट ज्याच्यामुळे महाराष्ट्रात मान्सून रखडला? वाचा सविस्तर रिपोर्ट

अशा पद्धतीने पदार्थ बनवून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे. यातू मोठी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर हॉटेल मालका विरुद्ध विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईनंतर शहरातील अन्य अन्न पदार्थ विक्रेते घाबरले आहेत. त्यांनी या कारवाईचा धसका घेतला आहे. शिवाय हॉटेलच्या स्वच्छतेकडे लक्ष दिले जात आहे. नागरिकांच्या आरोग्याची खेळणाऱ्यानां अन्न व औषध प्रशासनाचा हा दणकाच म्हणावा लागेल. दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.