- रील स्टार रोहिणी पाराध्येने सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती
- तिच्या आत्महत्येनंतर २५ दिवसांनी तिच्या पतीविरुद्ध मानसिक व शारीरिक त्रास देण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
- रोहिणीचे वडील बाळू शिवशरण यांनी तक्रार केली की पती निलेश तिला जबरदस्तीने हॉटेलमध्ये काम करण्यास लावत होता
संकेत कुलकर्णी
रिल स्टार रोहिणी पाराध्येच्या आत्महत्येने संपुर्ण राज्यात खळबळ उडाली होती. तिच्या चाहत्यांना तर हा मोठा धक्का होता. तिच्या रिल्सचा एक मोठा चाहता वर्ग होता. मात्र तिच्या आत्महत्येनं तो आवाक झाला होता. तिने असं का केलं असा प्रश्न त्यांना सतावत होता. जवळपास 25 दिवसानंतर त्यांना या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. रील स्टार रोहिणी पाराध्येच्या आत्महत्येनंतर 25 दिवसांनी रोहिणीच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. रोहिणीने आपल्या हॉटेल ग्रामपंचायत या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे ही घटना घडली होती.
यानंतर रोहिणीच्या आत्महत्येचे कारण शोधले जात होते. याबाबत पोलिसांनी सीडीआर तपास देखील केला. मात्र कुठलेच धागेदोरे हाती लागले नाही. तिच्या आत्महत्येबाबत अनेक शंका ही उपस्थित केल्या गेल्या. शिवाय काही अफवा ही पसरल्या होत्या. आता या प्रकरणात ट्वीस्ट निर्माण झाला आहे. रोहिणीचे वडील बाळू शिवशरण यांनी एक तक्रार दिली आहे. त्या तक्रारीत रोहिणीचा पती निलेश तिच्या मनाविरुद्ध तिला हॉटेलमध्ये काम करायला लावत होता. तिला शारीरिक व मानसिक त्रास देत होता. त्यामुळेच तिने आत्महत्येचे पाऊल उचलले आहे असा आरोप केला आहे. या तक्रारीवरून आता पोलीसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
त्यामुळे रोहिणीच्या आत्महत्येच्या पंचवीस दिवसानंतर ही नवी अपडेट पुढे आली आहे. रोहिणीने सोशल मीडियावर आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यातून तिचे हजारो हॉलोअर्स होते. तिच्या रिल्स ही मजेशीर आणि तिच्या हॉटेल संबंधात होत्या. त्यामुळे लोक त्या रिल्स आवडीने पाहात होते. रिल्स वरून तरी रोहिणी आनंदी आहे असं तिच्या चाहत्यांना वाटत होतं. त्याच वेळी अचानक २६ मे रोजी ब्रह्मपुरी हद्दीतील ग्रामपंचायत हॉटेलमध्ये रोहिणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी समोर आली. ती बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण राज्यात पसरली. त्यामुळे तिचे चाहते शॉकमध्ये होते. त्यावेळी वेगवेगळे तर्क लावले जात होते. पण त्यातून ठोस काही समोर येत नव्हते.
तिच्या पतीने ही तिच्या मृत्यूनंतर भावनिक पोस्ट केली होती. त्यावर ही अनेक प्रतिक्रीया आल्या होत्या. शिवाय संशयाची सुई ही त्याच्या दिशेने जात होती. तर काही जण तिने कर्जबाजारी पणामुळे आत्महत्या केली असं ही सांगत होते. काहींनी तर पार अकलना पलिकडचे तर्क लढवले होते. पण शेवटी रोहिणीच्या कुटुंबीयांनी पुढे येत सत्या काय आहे ते पोलीसांसमोर सांगितलेच. अनेक दिवसापासून नवऱ्याच्या जाचाला ती कंटाळली होती. रिल्स मध्ये खूश दिसणारी रोहिणी आतून मात्र पोखरून गेली होती. तिचे खच्चीकरण सुरू होते. त्यामुळेच तिने हा टोकाचा निर्णय घेतला. आता नवऱ्याच्या चौकशीत काय समोर येते ते पाहावे लागेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world