Malegaon Sakhar Karkhana Election Result : कोण होणार चेअरमन? कधीपर्यंत निकाल स्पष्ट होईल? प्रत्येक अपडेट एका क्लिकवर

मालेगाव साखर कारखाना निवडणूकीतील पहिला निकाल समोर आला आहे. ब वर्गातून अजित पवार हे विजयी झाल्याची माहिती आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Malegaon Sugar Factory Election Result Vote Counting : माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी 22 जून रोजी मतदान पार पडले. त्यानंतर आज (24 जून)  प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात झाली असून लवकरच माळेगाव कारखान्याचे नवे कारभारी ठरणार आहेत. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. स्वतःच अजित पवार ब वर्ग प्रतिनिधी म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. असं असलं तरी तावरे गटाने सहकार बचाव शेतकरी पॅनलच्या माध्यमातून अजित पवारांना कडवं आव्हान दिलं आहे.

मालेगाव साखर कारखाना निवडणूकीतील पहिला निकाल समोर आला आहे. ब वर्गातून अजित पवार हे विजयी झालेत. अजित पवार यांना 91 मते मिळाली असून भालचंद्र देवकाते यांना केवळ 10 मतं मिळाली आहेत.  दरम्यान अद्यापही मतमोजणी पूर्ण झालेली नाही. तरी सायंकाळी ५ वाजेपर्यंत निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. बारामतीसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी कोण विराजमान होणार याबाबत बारामतीसह राज्यभरातील नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Malegaon Sugar Factory Election Result: माळेगाव कारखाना निवडणुकीत क्रॉस वोटिंग, पॅनेल टू पॅनेल मतदान नाही

दरम्यान या निवडणुकीच्या निकालाची प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी NDTV मराठीच्या युट्यूब चॅनलवर क्लिक करा. या युट्यूब चॅनलवर तुम्हाला प्रत्येक अपडेट पाहता येईल. 

कट्टर विरोधक एकत्र, माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत राजकीय संस्कृतीचे दर्शन

बारामतीमध्ये आज माळेगाव सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी पार पडत आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील श्री निळकंठेश्वर पॅनल निवडणुकीत उतरलेल आहे तर अजित पवार गटाच्या विरोधात माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन कुमार तावरे यांचं सहकार बचाव शेतकरी पॅनल मैदानात आहे. 

मात्र याच दरम्यान अजित पवार गटाच्या पॅनलचे प्रचार प्रमुख माळेगाव कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष केशव जगताप आणि तावरे गटाचे पॅनल प्रमुख माझे अध्यक्ष रंजन कुमार तावरे यांची गाळभेट झालीये.

Advertisement