Malegaon Factory Election: '...म्हणून अजित पवारांना चेअरमन व्हायचंय, चंद्रराव तावरेंनी उलगडलं कारखान्याचं राजकारण

Malegaon Sugar Factory Election 2025: सभासदांच्या मुलांना आमच्या कॉलेजात 1000 हजार रुपयात ऍडमिशन घेता येत, उर्वरित पैसे ऊस बिलातून कपात केले जातात, असंही चंद्रराव तावरे म्हणाले.

जाहिरात
Read Time: 2 mins

बारामती: सध्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागलेली आहे 22 जून ला या कारखान्यासाठी मतदान होणार आहे अजित पवार यांनी या कारखान्यासाठी मी स्वतःच चेअरमन असेल अशी घोषणा केली आहे मात्र दुसरीकडे अजित पवार यांना रोखण्यासाठी सहकार महर्षी माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे यांचं सहकार बचाव शेतकरी पॅनल मैदानात उतरले आहे. अशातच तावरे यांनी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 

( नक्की वाचा : Eknath Shinde : राक्षसाचा जीव पोपटात, तसा यांचा जीव BMC.... एकनाथ शिंदेंनी फुंकलं निवडणुकांचं रणशिंग )

अजित पवारांचे जवळपास 12 कारखाने आहेत,ते त्यातून 1 कोटी मेट्रिक टन ऊसाचं गाळप करतात,त्यांना माळेगांव ला दर दिला तर त्यांच्या खाजगी कारखान्यांना देखील द्यावा लागेल हे टाळण्यासाठी अजित पवारांना माळेगांव कारखान्याचा चेअरमन व्हायचं आहे. असा आरोप ही सहकार महर्षी कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे यांनी केला आहे.

Advertisement

माळेगाव कारखाना सुरुवातीला अडीच हजार टन मॅट्रिक क्षमतेचा होता. त्यामध्ये आम्ही पुढे विस्तार वार कडून 4000 क्षमता केली. त्यानंतर पुढे तो 7500 क्षमतेचा केला. आमच्याच कालावधीत वजन डीस्टलरी यासारखे प्रकल्प काढले याशिवाय सभासदांच्या मालकीचा हक्काचं असं एक शैक्षणिक संकुल काढले. यामध्ये जवळपास सात हजारहुन अधिक विद्यार्थी शकतात. डिग्री व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू केला. आज प्रत्येक घरात एक दोन इंजिनिअर आहेत. सभासदांच्या मुलांना आमच्या कॉलेजात 1000 हजार रुपयात ऍडमिशन घेता येत, उर्वरित पैसे ऊस बिलातून कपात केले जातात, असंही चंद्रराव तावरे म्हणाले.

Advertisement

Sharad Pawar: 'हिंदीची सक्ती नको, पण....', शरद पवार यांचे मोठे विधान

आम्ही मंगल कार्यालय काढले यातून 19 हजार रुपयात सर्व सुविधा आम्ही देतो हे राज्यात कोणी केलं नाही. कारखान्यात  60 हजार प्रति दीन क्षमतेने इथेनॉल निमिती केली जाते.आम्ही आजपर्यंत निस्वार्थी सेवा केली आहे असं ही तावरे म्हणाले. महत्त्वाचं म्हणजे तावरेंच्या कार्यकाळात पाच वर्षाच्या सरसरीत माळेगांव कारखान्याचा ऊस दराचा आलेख उच्चांकी राहिल्याचेही त्यांनी म्हटले आहे. 

Advertisement

माळेगांव 12200.00
सोमेश्वर 11427.00
छत्रपती 9726.71
भीमाशंकर 10665.00
घोडगंगा 9744.30
संत तुकाराम 9637.17