गुरु दळवी, सिंधुदुर्ग: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये हायहोल्टेज लढत झाली. या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा दारुण पराभव केला. भारतीय संघाच्या विजयानंतर देशभरात जल्लोष साजरा केला जात आहे. अशातच हा सामना सुरु असतानाच पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिंधुदुर्गमध्ये घडलेल्या या प्रकारानंतर प्रशासनेही परप्रांतीय कामगारांना चांगलाच दणका दिला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नेमकं काय घडलं?
याबाबत सविस्तर माहिती अशी की, भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच सुरू असताना भारत विरोधी घोषणा दिल्याप्रकरणी मालवण शहरातील आडवण भागातील परप्रांतीय भंगार व्यवसायिकांची बांधकामे प्रशासनाने जेसीबीच्या साह्याने पाडली आहेत. नागरिकांनी या कारवाईला पाठिंबा देत कारवाईचे स्वागत केला आहे.
(नक्की वाचा- Exclusive : 18 कोटींचं कर्ज माफ केलं 'ती' बॉलिवूड अभिनेत्री कोण? 'न्यू इंडिया' बँकेचा आणखी एक प्रताप)
काल भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच सुरू असताना हा धक्कादायक प्रकार घडला. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आऊट झाल्यानंतर मालवण आडवण भागातील भंगार व्यवसायिकांनी पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या होत्या. या प्रकारानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली होती. या विरोधात मालवण मधील संतप्त नागरीकांनी सर्वपक्षीय रॅली काढली होती. यावरून मालवणमध्ये वातावरण तापलं होत. प्रशासनाने या विरोधात पावला उचलत संबंधितांची अनधिकृत बांधकामे पाडली आहेत.
दरम्यान, भारताने पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर पुणे, मुंबईसह नागपूर आणि कोल्हापुरकरांनी जोरदार जल्लोष केला. कोल्हापूरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं तरुणाईने फटाके फोडून, बाईक रॅली काढत आनंदोत्सव साजरा केला. लहान चिमुकल्यासह, महिलांनी देखील हा आनंद लुटला. भारतच जिंकणार अशी खात्री होती त्यामुळे जय्यत तयारी करून ठेवलेली, तर विराट कोहलीच किंग ठरला, अशा प्रतिक्रिया यावेळी चाहत्यांनी दिल्या.