जाहिरात

प्रेयसीला भेटायला गेला अन् जीव गमावून बसला, धुळ्यात नेमकं काय घडलं?

निजामपूर जैतानी येथील अजय भवरे हा तरुण आपल्या प्रेयसीला तिच्या घरी भेटायला गेला होता.त्यानंतर अजय भवरेला प्रेयसीच्या नातेवाईकांनी लाथा-बुक्क्यांनी व काठीने बेदम मारहाण केली. 

प्रेयसीला भेटायला गेला अन् जीव गमावून बसला, धुळ्यात नेमकं काय घडलं?

नागिंद मोरे, धुळे

प्रेयसीला भेटायला गेलेल्या तरुणाची हत्या झाल्याची घटना धुळ्यामधील साक्री तालुक्यातील निजामपूर जैतने येथे घडली आहे. याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात चार संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान मयत अजय भवरे या तरुणाच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

निजामपूर जैतानी येथील अजय भवरे हा तरुण आपल्या प्रेयसीला तिच्या घरी भेटायला गेला होता. सदर प्रकार मुलीच्या घरच्या लोकांना लक्षात येताच त्यांनी त्याची विचारपूस केली. त्यानंतर अजय भवरेला प्रेयसीच्या नातेवाईकांनी लाथा-बुक्क्यांनी व काठीने बेदम मारहाण केली. 

(नक्की वाचा - घड्याळाचे काटे फिरणार? अजित पवारांना नवीन चिन्हावर निवडणूक लढावावी लागण्याची शक्यता)

या मारहाणीत अजय भवरे हा बेशुद्ध झाला. त्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांना बोलवून घडलेला सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी अजय भवरे याला शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

(नक्की वाचा-  मध्य रेल्वेवरील फुकट्या प्रवाशांची खैर नाही, 20 वर्षांपूर्वी घेतलेला निर्णय बदलणार?)

याप्रकरणी अजय भवरे याच्या कुटुंबियांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर अजय भवरेच्या कुटुंबियांनी व नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता.पोलिसांनी अजय भवरे यांच्या कुटुंबियांची समजूत काढून आपण चार आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन देखील पोलिसांनी दिलं आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
'मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले' ठाकरे बंधू भडकले
प्रेयसीला भेटायला गेला अन् जीव गमावून बसला, धुळ्यात नेमकं काय घडलं?
kalyan-west-assembly-seat-many-contenders-in-mahayuti-thackeray-faction-mns-ready-for-battle
Next Article
शिंदेंच्या गडाला भाजप तडा देणार की ठाकरे मुसंडी मारणार? कल्याण पश्चिम विधानसभेचे गणित काय?