जाहिरात

Ratnagiri News : पाळीव कुत्र्याला वाचवण्यासाठी पठ्ठ्याने बिबट्याला ठार मारलं 

Man Killed Leopard : रत्नागिरीच्या विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई-पाटील यांनी टाईम्स ऑफ इंडियाला (TOI) माहिती दिली की, आम्ही घटनास्थळी जाऊन मृत प्राण्याची तपासणी केली, तेव्हा आम्हाला आढळले की ती सुमारे 2 वर्षांची मादी आहे.

Ratnagiri News : पाळीव कुत्र्याला वाचवण्यासाठी पठ्ठ्याने बिबट्याला ठार मारलं 

Ratnagiri Leopard News : पाळीव कुत्र्याला वाचवण्यासाठी एका व्यक्ती व्यक्ती बिबट्याशी भिडल्याची घटना रत्नागिरीच्या चिपळूण येथून समोर आली आहे. तोंडली-वरेली गावातील 55 वर्षीय आशिष महाजन यांनी रविवारी पाळीव कुत्र्यासाठी बिबट्याशी धाडसाने झुंज दिली. सुमारे 15 मिनिटे चाललेल्या या संघर्षात महाजन आणि बिबट्या दोघांनाही गंभीर दुखापत झाली. बिबट्याचा नंतर मृत्यू झाला. तर महाजन यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

TOI च्या मिळालेल्या माहितीनुसार, कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकून महाजन घराबाहेर आले. त्यावेळी त्यांनी पाहिले की घराच्या अंगणात बिबट्याला पाहिले. बिबट्या कुत्र्यावर झडप घालणार तेव्हाच महाजनांनी कुत्र्याला वाचवण्यासाठी आवाज केला. त्यावेळी बिबट्याने महाजनावर हल्ला केला. त्यावेळी महाजन यांनी जीव वाचवण्यासाठी जवळच असलेल्या हत्याराने बिबट्यावर हल्ला केला. यात बिबट्यांचा काही वेळातच मृत्यू झाला. 

(नक्की वाचा-  अंतराळात अडकलेल्या सुनीता विलियम्सचा परतीचा प्रवास कसा असेल? पाहा LIVE)

महाजन यांचे मित्र तुषार वाघ यांनी सांगितलं की, "भुंकण्याचा आवाज ऐकताच महाजन हातात टॉर्च घेऊन बाहेर पडले. बिबट्या कुत्र्यावर हल्ला करणार होता, पण महाजन यांनी त्याला हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बिबट्याने महाजनवर हल्ला केला. त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकून महाजन यांच्या पत्नी धावत आल्या. आशिष महाजन यांच्यासमोर बिबट्या असल्याने पत्नीने त्यांच्याकडे एक टोकदार भाला फेकला. या भाल्याच्या सहायाने स्वसंरक्षणार्थ महाजन यांनी बिबट्याच्या मानेवर आणि छातीवर वार केले.

(नक्की वाचा- "बरं झालं पक्ष फुटला…", सुप्रिया सुळेंचा धनंजय मुंडेंवर जोरदार हल्लाबोल)

रत्नागिरीच्या विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई-पाटील यांनी टाईम्स ऑफ इंडियाला (TOI) माहिती दिली की, आम्ही घटनास्थळी जाऊन मृत प्राण्याची तपासणी केली, तेव्हा आम्हाला आढळले की ती सुमारे 2 वर्षांची मादी आहे. बिबट्याच्या छातीवर, पायांवर आणि मानेवर जखमा होत्या. जखमी झालेल्या व्यक्तीला रुग्णालयाच्या खर्चाची भरपाई दिली जाईल. परिसरात राहणाऱ्या लोकांना बाहेर पडताना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: