Jalgaon News : संपत्तीचा मोह! निलंबित पोलिसाने भाच्याला संपवलं, कसा रचलं कट?

Jalgaon News : साहिल पाच दिवसांपासून बेपत्ता होता. पाच दिवसानंतर त्याचा मृतदेह शेतातील विहिरीत आढळून आला होता. या घटनेनंतर मृत तरुणाच्या कुटुंबीयांकडून घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला होता.

जाहिरात
Read Time: 2 mins

मंगेश जोशी, जळगाव

Jalgaon News : संपत्तीच्या वादातून निलंबित पोलीस अधिकाऱ्याने 19 वर्षीय तरुणाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातल्या मोहराळा येथे ही घटना घडली आहे.  साहिल शब्बीर तडवी असं मृत तरुणांचं नाव आहे. शेतातील विहिरीत त्याचा मृतदेह आढळला होता. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

साहिल पाच दिवसांपासून बेपत्ता होता. पाच दिवसानंतर त्याचा मृतदेह शेतातील विहिरीत आढळून आला होता. या घटनेनंतर मृत तरुणाच्या कुटुंबीयांकडून घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यानुसार कुटुंबीयांच्या संशयावरून पोलिसांनी गावातील दोन अल्पवयीन मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. 

(नक्की वाचा- Love Story: नवऱ्यासमोरच पत्नीने केलं पुतण्यासोबत लग्न! अजब प्रेमाची देशभर चर्चा)

दोघांचा चौकशी केल्यानंतर आत्याचा पती (मामा) असलेला निलंबित पोलीस कर्मचारी समीर गफूर तडवी याचं नाव समोर आलं. समीर तडवीच्या सांगण्यावरून साहिलला गांजा सेवन करून नशेत त्याला विहिरीत ढकलून दिल्याची कबुली ताब्यात घेण्यात आलेल्या अल्पवयीन मुलांनी दिली आहे. 

(नक्की वाचा- Palghar News: बियाणे खरेदी केलं, तरच खत देणार; कृषी सेवा केंद्रांकडून शेतकऱ्यांची अडवणूक)

यावरून पोलिसांनी निलंबित पोलीस कर्मचारी समीर गफूर तडवी व दोन अल्पवयीन मुलांविरुद्ध यावल पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.  प्रॉपर्टीच्या वादातून निलंबित पोलीस कर्मचाऱ्यांनी  तरुणाची हत्या केल्याचा आरोप तरुणाच्या कुटुंबीयांनी केला आहे.

Advertisement
Topics mentioned in this article