Pune Mango Festival 2026: आंब्याचा सिझन सुरु झाला आहे. कोकणला लाभलेले वरदान फळांचा राजा हापूस आंबाही बाजारात दाखल झाला आहे. मात्र आंब्याचे बाजारातील भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेरचे आहेत त्यामुळे अनेकांचा हिरमोड होत आहे. अशातच आता पुणेकरांसाठी एक मोठी गूडन्यूज समोर आली आहे. पुण्यामध्ये स्वस्तात मस्त आंबे मिळवण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे.
Pune News: पुणेकरांचा मोठा खोळंबा! शहरातील अत्यंत महत्त्वाचा पूल 1 महिना बंद; प्रवासाआधी 'हे' वाचा
पुणेकरांसाठी आंब्याची मेजवानी..
याबाबत सविस्तर माहिती अशी की, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ व पुणे जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री' या संकल्पनेअंतर्गत पीएमटी बस डेपो शेजारी मार्केटयार्ड, पुणे येथे आंबा महोत्सव-२०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्धाटन राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते ११ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता करण्यात येणार आहे.
या महोत्सवात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर व ठाणे या कोकणातील जिल्ह्यांमधील जीआय मानांकन प्राप्त हापूस आंब्यासह केशर, पायरी व इतर वाणांचे आंबे उपलब्ध असणार आहेत. मार्केटयार्ड येथे सुमारे ६० स्टॉल्सद्वारे थेट विक्रीची व्यवस्था करण्यात आली असून शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव व ग्राहकांना दर्जेदार आंबे वाजवी दरात मिळण्याचा उद्देश आहे. हा आंबा महोत्सव सलग २५ व्या वर्षी आयोजित करण्यात येत असून १० जून २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे. ग्राहकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पणन मंडळाचे सरव्यवस्थापक विनायक कोकरे यांनी केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world