मनोज जरांगेंचं सहाव्यांदा उपोषण; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी, सत्ताधाऱ्यांनाही इशारा

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे. सगेसोयरे अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर करून अंमलबजावणी करावी. हैदराबाद, सातारा, बॉम्बे गॅझेट लागू करण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.

Advertisement
Read Time: 2 mins

लक्ष्मण सोळुंके, जालना

मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे सहाव्यांदा आमरण उपोषणाला सुरू सुरुवात केली आहे. सगे सोयरे कायदा अंमलबजावणीची मागणी त्यांना या उपोषणाद्वारे केली आहे. मागेल त्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांची आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मनोज जरांगे पाटील सहाव्यांदा अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसले आहेत. रात्री 12 वाजता मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरू केलं. उपोषणाला बसण्याआधी गावातील महिलांनी जरांगे यांचं औक्षण केलं. त्यानंतर जरांगे यांनी उपोषणाला सुरुवात केली. 

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे. सगेसोयरे अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर करून अंमलबजावणी करावी. हैदराबाद, सातारा, बॉम्बे गॅझेट लागू करण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांना ही शेवटची संधी आहे. त्यामुळे त्यांनी मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण कराव्या. आरक्षण दिलं नाही तर सोडणार नाही, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. 

(नक्की वाचा -लोकसभा निवडणुकीतनंतर काँग्रेसला 'अच्छे दिन'; विधानसभेसाठी इच्छूकांची रांग)

आमच्या सगळ्या मागण्या पूर्ण करा अन्यथा माझ्या नावाने बोंबलू नका. छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस हे दोघे जातीयवादी, आम्ही जातीयवादी नाही. कामं सोडून अंतरवालीत येऊ नका असं आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांना आवाहन केलं आहे. संधी शोधून सरकारने काम करायला हवं, असं जरांगे यांनी म्हटलं. 

( नक्की वाचा : Vande Metro : देशातील पहिल्या 'वंदे मेट्रो'चं किती आहे तिकीट? काय आहे वेगळेपण? वाचा संपूर्ण माहिती )

आरोग्य पथकाने केली तपासणी

मंगळवारी मध्यरात्री उपोषण सुरु केल्यानंतर आज सकाळी जिल्हा आरोग्य विभागाचं पथक अंतरवाली सराटी येथे दाखल झालं. आरोग्य पथकांकडून जरांगे पाटील यांची वैधकीय तपासणी करण्यात आली आहे. यावेळी या पथकाच्या वतीने जरांगे पाटील यांचं वजन, रक्तदाब, त्याचं बरोबर शुगर ही चेक करण्यात आली.