जरांगेंनी गंभीर आरोप केलेला मुख्यमंत्र्यांचा तो OSD कोण?

माझ्या समाजाला आरक्षण पाहिजे, ते कोणीही द्या. आमचा शिंदे साहेबांवर आजही विश्वास आहे. देवेंद्र फडणवीस हे आमचे शत्रू नाहीत, असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

Advertisement
Read Time: 2 mins

लक्ष्मण सोळुंके, जालना

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषण आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आहे. मराठा समाजाला सगेसोयऱ्यांसह ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पुन्हा आंदोलन करत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधत राज्य सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष कार्य अधिकाऱ्यावर (OSD) गंभीर आरोप केले आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सरकार षडयंत्र करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही चांगलं मानतो.  मात्र मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींनी अजून काय नवीन षडयंत्र रचले काय माहिती? आमच्या बांधवांना ते दिल्लीला घेऊन जाऊ लागले आहेत. काय षडयंत्र रचले ते थोड्या दिवसात उघडे पडेल. मला बदनाम करण्यासाठी किंवा मराठ्यांना बदनाम करण्यासाठी करतात की काय? असा प्रश्न देखील मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला. मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांचे ते ओएसडी कोण याची चर्चा सुरु झाली आहे. 

सरकारने मला खेळवले

प्रत्येक वेळी असंच होत राहिलं तर समाज तरी किती दिवस गप्प बसणार आहे.  मला सरकारने 100 टक्के खेळवले आहे. शिंदे साहेबांना आणि गृहमंत्री फडणवीस साहेबांना सांगतो की मी उपोषण स्थगित करू शकत नाही. काही गोष्टी सविस्तर माहिती झाल्या पाहिजेत. सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी तुम्ही लगेच करणार का? किती दिवस लागणार आहेत? मराठा बांधवांवरील केसेस लगेच मागे घेणार का? याची सविस्तर माहिती द्यावी, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. 

( नक्की वाचा : रावसाहेब दानवेंच्या पराभवाचं खरं कारण काय? 'या' कारणामुळे हुकली सिक्सरची संधी )

तर विधानसभेच्या तयारीला लागू

कदाचित माझे शेवटचे उपोषण असेल. आम्ही थोडे दिवस उपोषण करू. जाणूनबुजून तुम्ही आम्हाला मारायला निघाला आहात. मला तुम्ही असंच खेळवत राहिले तर गोरगरीब मराठी सर्व जाती धर्माचे लोक डायरेक्ट विधानसभेच्या तयारीला लागतील, असं बोलून मनोज जरांगे यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा इशाराही दिला आहे. 

Advertisement

(नक्की वाचा - खासदार संदीपान भुमरे मनोज जरांगेंच्या भेटीला, जवळपास 45 मिनिटे आंदोलनस्थळी थांबले)

माझ्या समाजाला आरक्षण पाहिजे, ते कोणीही द्या. आमचा शिंदे साहेबांवर आजही विश्वास आहे. देवेंद्र फडणवीस हे आमचे शत्रू नाहीत. मात्र जातीच्या आणि आरक्षणाच्या विरोधात बोलले की मी कोणाचे खपवून घेत नाही. त्यांनी हे सर्व बंद करावं, असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. 

Topics mentioned in this article