Maratha Reservation: आरक्षणासाठी शेवटची टक्कर.. मनोज जरांगेंची मोठी घोषणा; नवी रणनिती ठरली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाच्या ्मागणीकडे लक्ष द्यावे अन्यथा पुन्हा एकदा आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. आज नांदेड दौऱ्यावर असताना ते माध्यमांशी बोलत होते.

जाहिरात
Read Time: 2 mins

Maratha Reservation: मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मैदानात उतरण्याचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाच्या ्मागणीकडे लक्ष द्यावे अन्यथा पुन्हा एकदा आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. आज नांदेड दौऱ्यावर असताना ते माध्यमांशी बोलत होते.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय म्हणाले मनोज जरांगे? 

'मी मराठा आरक्षणाच्या बाबतीत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात. आता बघूया, आता तेच मुख्यमंत्री आहेत.आडवे येतात की नाही,  25  जानेवारीपर्यंत आरक्षणाचा विषय मार्गी काढतात की नाही ते बघू. 25 जानेवारीला आमरण उपोषण फायनल आहे. हे उपोषण सामुहिक होण्याचीही शक्यता आहे. राज्यभरातून लोक आम्हाला उपोषणासाठी बसायचं आहे म्हणत आहेत. त्यामुळे काय होतयं पाहू. मात्र कोणाला जबरदस्ती नाही. ज्यांची इच्छा असेल ते बसतील. मराठा आरक्षणासाठी शेवटची टक्कर आहे.  जिल्हाजिल्ह्यात लोक उपोषणाला बसतील,' असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत. 

मस्सजोगमध्ये एका लेकराचा जीव गेला, अद्याप आरोपी फरार आहेत, त्यामुळे वाल्मिक अटकेच्यामुळे समाधानी नाही. आता ज्यांचा तपास करायचा आहे तो करा. याप्रकरणात जो कोणी असेल तो मंत्री असो राष्ट्रपती असो, त्यांना सुट्टी द्यायची नाही. अन्यथा आम्ही महाराष्ट्र बंद पाडू. या आरोपींनी कोणाला फोन लावले, कोणी आसरा दिला. यामध्ये कोणकोण मंत्री आहेत, आमदार-खासदार आहेत, त्याची माहिती समोर यावी, अशीही मागणी जरांगे पाटील यांनी केली.

ट्रेंडिंग बातमी - New Year special: नव्यावर्षात जन्मलेल्या मुलीला 'या' शहरात दिलं जातं सोन्याचं नाणं, काय आहे प्रथा?

दरम्यान,  बीडमधील खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या सीआयडीकडून चौकशीला सुरवात झाली आहे.  बीड शहर पोलीस ठाण्यात वाल्मिक कराडची cid पथकाकडून चौकशी होत असून  Cid कोठडी मिळाल्यानंतर वाल्मिक कराडच्या चौकशीचा पहिला दिवस आहे. एका बंद खोलीत कराडची चौकशी केली जात आहे. 

ज्या बीड शहर पोलीस ठाण्यात वाल्मीकरांना ठेवण्यात आला आहे त्या पोलीस ठाण्यात येणाऱ्या आता प्रत्येक माणसाची नोंद घेण्यात येत आहे. यासाठी पोलीस स्टेशनच्या मुख्य गेटवर दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्यात एका रजिस्टर वर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नावाची नोंद केली जात आहे.

Advertisement