- दिवाकर माने
नववर्षाचे स्वागत अनेक जण आपल्या पद्धतीने करत असतात. कोणी पार्टी करतात, तर काही जण देव दर्शन करतात. नववर्षाचे संकल्पही केले जातात. मात्र महाराष्ट्रात असं एक शहर आहे तिथं नववर्षाचं स्वागत खऱ्या अर्थानं अनोख्या पद्धतीने केलं जातं. ते शहर आहे परभणी. या शहरात गेल्या 13 वर्षापासून एक परंपरा जपली जात आहे. 1 जानेवारीला जन्माला येणाऱ्या मुलीला सोन्याचं नाणं दिलं जातं. शिवाय जिलेबीही देण्यात येते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मागील अनेक वर्षांपासून स्त्री जन्माचे स्वागत करण्यासाठी आपल्यापरीने प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचा एक भाग म्हणून मुलींच्या जन्माचे स्वागत करण्याचे काम परभणीतील एक जिलेबी विक्रेते करत आहे. मागील 13 वर्षापासून 1 जानेवारीला म्हणजेच नविन वर्षाच्या पहिल्या दिवशी जन्माला येणार्या एका मुलीला ते सोन्याचे नाणे देतात. स्त्री जन्माला प्रोत्साहन ते देत आहेत. शिवाय स्त्री भ्रूण हत्या रोखल्या पाहिजे आणि स्त्री जन्माचा आदर करत केला पाहीजे ही त्यांची भावना आहे.
परभणी शहरातील हरियाना जिलेबी सेंटरचे चालक सन्नी सिंग हे त्यांचे वडील धरमवीर यांच्या मार्गदर्शनाखाली मागील 13 वर्षापासून छोटासा का होईना आपल्या परीने हा उपक्रम राबवत आहेत. परभणी येथील शासकीय स्त्री रुग्णालयात 1 जानेवारी रोजी सायंकाळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये भाग्यवान कन्यारत्नांच्या पालकांचा हे सोन्याचं नाणं दिलं जातं. जर त्या दिवशी एका पेक्षा जास्त मुलींचा जन्म झाला असेल तर त्यावरही तोडगा काढण्यात आला आहे.
अशा स्थितीत लकी ड्रॉ द्वारे भाग्यवान मुलीला सोन्याचे नाणे दिले जाते. शासकीय स्त्री रुग्णालयात लकी ड्रॉ काढला जातो. त्यातील पहिल्या भाग्यवान मुलीला 2 ग्रॅम सोन्याचे नाणं दिले जाते. तर इतर दोन कन्यारत्नांना 10 ग्रॅमचे प्रत्येकी 1 चांदीचे नाणे देण्यात येते. तर इतर कन्यारत्नांना 2 किलो जिलेबी देवून त्यांचे स्वागत केले जाते. गेल्या 13 वर्षापासून परभणीतील सन्नी सिंग आणि त्यांचे वडील धरमवीर सिंग हा उपक्रम राबवत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world