लक्ष्मण सोळुंके, जालना
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. आमरण उपोषणाच्या चौथ्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सगे सोयरे शब्दाच्या अमंलबजावणीसाठी जरांगे पाटील पुन्हा आमरण उपोषण करत आहेत. चौथ्या दिवशी जरांगे पाटील यांचा रक्तदाब कमी झाला आहे. तर शरीरातील पाण्याची लेव्हलही कमी झाली आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांना उपचाराची गरज असून डॉक्टरांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिला असून आपल्या मागण्यांवर जरांगे पाटील ठाम आहेत.
(नक्की वाचा- 'गोड बोलून माझा काटा काढण्याचा डाव', जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप)
जरांगे यांना उपचाराकरिता विनंती करण्यासाठी डॉक्टरांचं पथक अंतरवाली सराटी येथे दाखल झालं आहे. जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. राजेंद्र पाटील यांच्यासह अंबडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके हे देखील दाखल झाले आहेत.
( नक्की वाचा : रावसाहेब दानवेंच्या पराभवाचं खरं कारण काय? 'या' कारणामुळे हुकली सिक्सरची संधी )
तहसीलदार चंद्रकांत शेळके आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र पाटील या दोघांनीही जरांगे यांच्याकडे उपचार घेण्याची विनंती केली. मात्र ही विनंती जरांगे पाटलांनी नाकारली आहे. दरम्यान, जरांगे उपचार घेत नसल्याचे सरकारला लेखी कळवलं आहे. तसेच राज्य शासनाच्या शिष्टमंडळाबाबत अजून कोणताही निरोप आला नसल्याचंही तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी सांगितलं.