2 hours ago

Manoj jarange patil Live morcha : आज देशभरात गणेशोत्सवाची मोठी धामधूम सुरू आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. वर्षभरापासून गणेशभक्त याची वाट पाहत असतात. अखेर तो दिवस आला आहे. आज सकाळी घरोघरी गणेशाची प्राणप्रतिष्ठा केली जात आहे. बाप्पा घरी येणार म्हणून घरीत मोदकांचा नैवेद्य (Ganesh Chaturthi 2025) तयार करण्यात येत आहे. दुसरीकडे मराठी आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील (maratha reservation) अंतरवाली सराटीतून आज मुंबईच्या दिशेने निघणार आहे. त्यामुळे सरकारसमोर मोठं आव्हान असणार आहे.

Aug 27, 2025 21:57 (IST)

शिवसेना शिंदे गटाचे आमदारांनी केला जरांगेंचा सत्कार

शिवसेना शिंदे गटाचे आमदार विलास भूमरे यांच्याकडून मनोज जरांगे पाटील यांचा सत्कार करण्यात आला.  जरांगे पैठण इथे पोहोचल्यानंतर त्याचा  सत्कार करण्यात आला.  भूमरे यांच्याकडून आंदोलकांना पाणी आणि जेवणाची सोय करण्यात आली होती. 

Aug 27, 2025 20:52 (IST)

Live Update: मनोज जरांगे पाटील यांचे शेवगावात येथे अनोखे स्वागत

मनोज जरांगे पाटील  यांचे शेवगावात येथे अनोखे स्वागत 

30 जेसीबी रस्त्याच्या दुतर्फा लावून स्वागत

Aug 27, 2025 20:16 (IST)

Live Update: जरांगेंच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर

पैठण फाट्यावर जरांगे यांचे कुटूंबीय भेटीला आले होते. यावेळी कुटुंबातील सदस्यांनी त्यांना ओवाळणी केली. यावेळी पत्नी आणि मुलगा ,मुलींना अश्रू अनावर झाले. जरांगे पाटील यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. शेवटी मुलीला चक्कर आली. तरीही जारांगे पाटील पुढे निघाले. 

Aug 27, 2025 18:59 (IST)

Live Update: जरांगेंच्या ताफ्यामुळे पैठण ते मिरी दरम्यान ट्राफिक जॅम

पैठण ते मिरी दरम्यान ट्राफिक जॅम 

वाहतूक अत्यंत संथ गती सुरू  

मिरी ते पैठण 47 किमी अतंरा मध्ये वाहतूक जॅम

Advertisement
Aug 27, 2025 18:50 (IST)

Live Update: जरांगेंचा ताफा पैठणला पोहचला

जरांगेंचा ताफा पैठणला पोहचला आहे. 48 किलो मीटरचा प्रवास करण्यासाठी साडे सात तास लागले आहेत. यावेळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. सकाळ पासून इथं लोक मोठ्या प्रमाणात जमले होते. 

Aug 27, 2025 18:48 (IST)

Live Update: हे आंदोलन पाच ते सहा टप्प्यात- मनोज जरांगे पाटील

हे आंदोलन एका टप्प्यात होणार नाही. तर ते पाच ते सहा टप्प्यात होईल असं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. मनोज जरांगे यांनी ही नवी माहिती दिली आहे. 

Advertisement
Aug 27, 2025 18:10 (IST)

कुणाच्या तरी राजकीय पुनर्वसनासाठी जरांगे याचं आंदोलन- लक्ष्मण हाके

न्यायालयाने परवानगी दिली नव्हती. तरी मुंबई पोलिसांनी नियम अटीसह जरांगे यांना परवानगी दिली आहे. त्याचं पालन त्यांनी करावं असं ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे.  मनोज जरांगे यांनी बेकायदेशीर मागणीसाठी षडयंत्र म्हणून गणपती उत्सव असताना मुंबईत जाण्याचं ठरवलं आहे. मुंबईतील चाकरमानी, नोकरदार वर्गाला त्रास देण्याचा त्यांचा मानस आहे. कुणाच्या तरी राजकीय पुनर्वसनासाठी जरांगे हे सगळं करत आहे असा हल्लाबोल ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे 

Aug 27, 2025 18:08 (IST)

Live Update: जरांगेंच्या मागण्या मान्य होतील, मुरलीधर मोहोळ

केंद्रीय राज्यमंत्री खा. मुरलीधर मोहोळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत प्रतिक्रीया दिली आहे. जरांगेंच्या मागण्या मान्य होतील. संवाद वाढवायची गरज आहे असं ते म्हणाले.  मनोज जरांगे पाटील यांनी संयम बाळगावा अशी माझी विनंती  आहे.  राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल व्यक्तिगत बोलणं योग्य नाही. राज्याच्या प्रमुखांबद्दल व्यक्तिगत बोलणं दुर्दैवी  आहे असं ही   खा. मोहोळ म्हणाले. 

Advertisement
Aug 27, 2025 18:05 (IST)

Live Update: मनोज जरांगेंच्या आंदोलनाला काँग्रेस खासदारांचा पाठिंबा

 जालन्याचे काँग्रेस खासदार कल्याण काळे यांनी आपला मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहेत. शिवाय या आंदोलनात आपण सहभागी होणार असल्याचं ही काळे यांनी स्पष्ट केलं आहे. आपण मुंबईत या आंदोलनात सहभागी होवू असं ही ते म्हणाले. 

Aug 27, 2025 16:47 (IST)

Live Update: मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी उदय सामंत मुंबईतून रवाना

मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी उदय सामंत मुंबईतून बाहेर पडले आहेत.  पण भेट कुठे होणार हे निश्चित नाही. जरांगेचा प्रवास अत्यंत सावकाश सूरू आहे. आत्ता पर्यंत जरांगे केवळ २१ किमी प्रवास करू शकले आहेत. पाच तासांत केवळ २१ किमी अंतर पार केलं आहे.  वाटेत शेकडो लोक रस्त्यात त्यांचे स्वागत करत आहेत. 

Aug 27, 2025 15:39 (IST)

Manoj Jarange Patil Live Morcha : जरांगेंच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांकडून एका दिवसाची परवानगी

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांकडून एका दिवसाची परवानगी देण्यात आली आहे.  5000 आंदोलकांसोबतच जरांगे आझाद मैदानावर आंदोलन करू शकणार आहे. त्यामुळे या आंदोलनाला पहिलं मोठं यश मिळाल्याचं बोललं जात आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या दिशेने आज कुच केली आहे. त्यांना नवी मुंबईतच  अडवलं जाईल असं बोललं जात होतं पण आता त्यांच्या आंदोलनाला परवानगी मिळाली आहे. 

Aug 27, 2025 15:31 (IST)

मनोज जरांगे पाटील यांचा ताफा शहागड चौकात पोहोचला

अंतरवली ते शहागड या 11 किमीच्या अंतरासाठी अडीच तास लागले आहेत.  मुख्य महामार्गावर संथ गतीने आंदोलक मुंबईच्या दिशेने कुच करत आहेत. सध्या जरांगे शहागड चौकात पोहोचले आहेत. 

Aug 27, 2025 15:29 (IST)

Manoj Jarange Patil Live Morcha : जरांगे पाटीलांच्या आंदोलनाबाबत अजित पवारांचे मौन

Manoj Jarange Patil Live Morcha : जरांगे पाटीलांच्या आंदोलनाबाबत अजित पवारांनी कोणतीही प्रतिक्रीया दिलेली नाही. त्यांना या आंदोलनाबाबत विचारलं असता त्यांनी त्यावर काही न बोलता निघून जाणे पसंत केले आहेत. 

Aug 27, 2025 14:27 (IST)

Live Update : छत्रपती संभाजीगर जिल्ह्याच्या हद्दीवर जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी महिला सज्ज

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरागे पाटील यांनी मुबईच्या दिशेने कूच केलीय.जरागे पाटील सकाळी दहा वाजतां हजारो मराठा आंदोलकांसह मुबंईच्या दिशेने निघाले आहेत जरागे पाटील यांना निघून जवळपास तिनं तास झाले आहेत जरांगे पाटील यांनी आव्हान केल्या प्रमाणार गावागावाच्या फट्यावर जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी महिला सह गावाकरी थांबले आहेत.त्यातच जरांगे यांच्या ताफ्यात शेकडो वाहन सहभागी होत असल्यामुळे जरागे पाटलांच्या ताफ्यात वाढत होत चालली आहे जालना आणि छत्रपती संभाजीगर जिल्ह्याच्या हद्दीवर जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी महिला वाट पाहत आहेत.  

Aug 27, 2025 13:50 (IST)

Live Update : जरांगेपाटलांचा पहिला मुक्काम जुन्नर, शेतकऱ्यांचा बाजार बंद

जरांगेपाटलांचा पहिला मुक्काम जुन्नर... शेतक-यांचा बाजार बंद...

- कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत बाजार समिती बंद..

- पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचा आदेश

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेला मनोज जरांगेपाटीलांचा लढा आता मुंबईकडे निघणार आहे त्यांच्या या मराठी वादळाचा पहिला मुक्काम जुन्नर शहरात असणार असून मोठ्या प्रमाणात मराठा बांधवांची गर्दी अपेक्षित असल्याने कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचा २८ ऑगस्ट रोजी होणारा शेतमालाचा लिलाव बंद ठेवण्याचे आदेश जारी केलेत 

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईकडे जाणार आहे त्यांच्या मार्गावरील पहिला मुक्काम जुन्नरमध्ये होणार असून, हजारो मराठा बांधव जुन्नर शहरात दाखल होणार आहेत. यावेळी जरांगे पाटील किल्ले शिवनेरीवर नतमस्तक होऊन पुढील प्रवासाला सुरुवात करतील या दरम्यान मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी आणि त्यातून उद्भवणारा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी खबरदारीचा उपाय म्हणून जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचा शेतमालाचा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय

Aug 27, 2025 13:48 (IST)

Live Update : पूर्णा तालुक्याच्या वझुर गावातून शेकडो मराठा बांधव मुंबईच्या दिशेने!

पूर्णा तालुक्यातील वझुर येथून आज शेकडो मराठ्यांनी मराठा आरक्षण आंदोलनकर्ता मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून जोरदार शक्तिप्रदर्शन करत मार्गक्रमण केले, हे मराठा बांधव अंतरवाली सराटी मार्गे मुंबईच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहेत. यावेळी ग्रामस्थांनी त्यांना वाजत गाजत पाठवणी केली आहे, "एकच मिशन मराठा आरक्षण", "आता कुठे जायचं मुंबईला जायचं" अशा घोषणाने परिसर दणाणून गेला होता....

Aug 27, 2025 13:44 (IST)

Live Update : मनोज जरांगेंनी आंदोलन करण्यापेक्षा सरकार बरोबर चर्चा करावी - दादा भुसे

मनोज जरांगे यांच्या मागण्या रास्त आहेत, त्यात दुमत असल्याचे काही कारण नाही..परंतु, मुंबई, कोकण, महाराष्ट्र व देशात सध्या गणपती बाप्पांचा उत्सव सुरू आहे..या कालावधीमध्ये आंदोलनापेक्षा चर्चेतून ते पुढे आले तर एक समाधानकारक तोडगा निघू शकतो - दादा भुसे

Aug 27, 2025 13:42 (IST)

Live Update : पुण्याची ग्रामदैवी आणि दुसरा मानाचा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपतीची प्राणप्रतिष्ठा संपन्न

पुण्याची ग्रामदैवी आणि दुसरा मानाचा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपतीची प्राणप्रतिष्ठा संपन्न

दुसरा मानाचा गणपती तांबडी जोगेश्वरी विराजमान 

पारंपारिक पालखीत मिरवणूक आणि ढोल ताशाचा गजरात तांबडी जोगेश्वरी गणपतीचा आगमन सोहळा पडला पार 

यंदा कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या गाभाऱ्यात तांबडी जोगेश्वरी बाप्पा विराजमान

Aug 27, 2025 13:08 (IST)

Live Update : मनोज जरांगे यांच्या टार्गेटवर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस

मनोज जरांगे यांचं मोठं वक्तव्य

एकनाथ शिंदे यांना गरिबीची जाण ते चांगले नेते आहेत 

अजित पवार यांच्याकडे जाऊन अनेकांची काम होतात 

भाजपामध्ये सुद्धा अनेक मंत्री काम करतात 

मनोज जरांगे यांच्या टार्गेटवर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस

Aug 27, 2025 12:32 (IST)

Live Update : उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावर, राज ठाकरेंच्या घरातील बाप्पाचं दर्शन घेणार

Live Update : उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावर, राज ठाकरेंच्या घरातील बाप्पाचं दर्शन घेणार

Aug 27, 2025 12:25 (IST)

Live Update : धुळे-सोलापूरमार्गावर मोठा जल्लोष, आरक्षण घेतल्याशिवाय येणार नाही, मराठा समाज ठाम

धुळे-सोलापूरमार्गावर मोठा जल्लोष, आरक्षण घेतल्याशिवाय येणार नाही, मराठा समाज ठाम

Aug 27, 2025 12:21 (IST)

Live Update : मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन, धुळे सोलापूर महामार्गावर एका बाजुने बंद

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे धुळे सोलापूर महामार्गावर एका बाजुने बंद करण्यात आला आहे. 

Aug 27, 2025 12:13 (IST)

Live Update : मानाच्या पहिल्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा

मानाच्या पहिल्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा 

मानाचा पहिला म्हणजेच ग्रामदैवत कसबा गणपतीचं उत्सव मांडवात मिरवणुकीनंतर होत आहे प्राणप्रतिष्ठा 

वाजत गाजत आणि ढोल ताश्याच्या नगाऱ्यात बाप्पाच आगमन झाल 

Aug 27, 2025 11:56 (IST)

Live Update : धुळे-सोलापूर महामार्गावर मोठी गर्दी, जरांगेंचा मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना

धुळे-सोलापूर महामार्गावर मोठी गर्दी, जरांगेंचा मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना

Aug 27, 2025 11:19 (IST)

Live Update : पुण्याचा मानाचा दुसरा गणपती श्री तांबडी जोगेश्वरीच्या मिरवणुकीला सुरुवात

पुण्याचा मानाचा दुसरा गणपती श्री तांबडी जोगेश्वरी

तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मिरवणुकीला देखील सुरुवात 

पारंपारिक पालखीतून मानाच्या दुसऱ्या गणपतीची मिरवणूक 

थोड्याच वेळात  मनाच्या दुसऱ्या गणपतीची होणार प्राणप्रतिष्ठा

Aug 27, 2025 11:18 (IST)

Live Update :दिपक केसरकर यांच्या सावंतवाडी येथील निवासस्थानी गणपती बाप्पा विराजमान

माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते दिपक केसरकर यांच्या सावंतवाडी येथील निवासस्थानी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. दिपक केसरकर यांनी सकाळीच सपत्नीक गणरायाची विधीवत पुजा केली. यावेळी दिपक केसरकर यांनी आपली मंत्रीमंडळात वर्णी लागली नसली तरी आपण नाराज नाही गणराया न मागताच सर्व काही देत असतो असा आशावाद यावेळी दिपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे.

Aug 27, 2025 10:56 (IST)

Live Update : आई वडिलांना सांभाळा, गणपतीच्या देखाव्यातून सुबोध भावे यांचा संदेश

आई वडिलांना सांभाळा, गणपतीच्या देखाव्यातून सुबोध भावे यांचा संदेश

सुबोध भावे यांनी त्यांच्या घरी साकारला गणपती आणि कार्तिक यांचा देखावा

Aug 27, 2025 10:24 (IST)

Live Update : अहिल्यानगर शहर मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी सज्ज नेफ्टी बायपास चौकामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताचे झळकले बोर्ड

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी आज आंतरवली सराटी या ठिकाणाहून मनोज जरांगे पाटील हे मराठा बांधवांसह मुंबईकडे रवाना होणार आहे अहिल्यानगर मार्गे शिवनेरी किल्ल्यावर जाणार आहे यासाठी शेवगाव पांढरीपुल शेंडी बायपास नागापूर एमआयडीसी, बायपास कल्याण मार्गे आळेफाटा असा अहिल्यानगर जिल्ह्यातून होणारा प्रवास असणार आहे अहिल्यानगर बायपास चौकामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताचे बोर्ड लावण्यात आले आहे या बोर्डवरती *चलो मुंबई एक मराठा लाख मराठा*अशी घोषवाक्य लिहिलेली आहेत तर नेप्ती गावाच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यात येणार आहे 

Aug 27, 2025 10:20 (IST)

Live Update : अभिनेता सिद्धार्थ जाधव ढोल वाजवताना भक्तिरसात तल्लीन

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाच्या आगमन मिरवणूक सोहळ्याला कलावंत ढोल पथकाकडून वादन 

कलावंत ढोल पथकात अनेक अनेक मराठी अभिनेते आणि अभिनेत्री 

अभिनेता सिद्धार्थ जाधव ढोल वाजवताना भक्तिरसात तल्लीन

सिद्धार्थ जाधवने ढोल वाजवत केलं बाप्पाचं स्वागत

Aug 27, 2025 09:35 (IST)

Live Update : गणरायाच्या आगमनासाठी नागपूर शहरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण

गणरायाच्या आगमनासाठी नागपूर शहरात सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. विशेषतः चितार रोड परिसरामध्ये गणेशभक्तांची मोठी गर्दी उसळली आहे. शंभर वर्षांहून अधिक परंपरा असलेल्या चितार ओळी परिसरातून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे तसेच घरगुती मंडळांच्या गणेशमूर्ती मोठ्या भक्तिभावाने घेऊन जात असल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे.

गणपतीच्या आगमनावेळी ढोल-ताशांचा गजर, टाळ-झांजांचा निनाद आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरांनी परिसर दुमदुमून गेला आहे. महिलांनी गणेशाच्या आरत्या गात मूर्तींचे स्वागत केले तर लहान मुलांनीही पारंपरिक पोशाख परिधान करून सहभाग नोंदवला आहे.

गर्दीच्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी संपूर्ण शहरात विशेष सुरक्षा व्यवस्था केली आहे. महाल, इतवारी, चितार रोड तसेच इतर संवेदनशील भागांत पोलीस तैनात असून वाहतूक व्यवस्थेसाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे. सीसीटीव्ही आणि ड्रोनच्या माध्यमातून देखरेख ठेवण्यात येत आहे.

Aug 27, 2025 09:33 (IST)

Live Update : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर, इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथे पार पडणार शेतकरी मेळावा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर असून त्यांनी सकाळी तालुक्यातील विविध विकास कामांची पाहणी केली आहे. यानंतर आज सकाळी साडेअकरा वाजता इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यावर AI तंत्रज्ञाना संदर्भात शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले असून या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थिती लावणार आहेत.याशिवाय आज सायंकाळी गणेशोत्सवानिमित्त शहरातील विविध मंडळांना ते सपत्नीक भेट देणार आहेत.

Aug 27, 2025 09:32 (IST)

Live Update : धाराशिव जिल्ह्यातुन हजारो मराठा बांधव अंतरवाली सराटीकडे रवाना

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानंतर राज्यभरातुन मराठा समाज आंतरवली सराटीकडे निघाले असुन जरांगे पाटील यांच्यासह ते मुंबईकडे निघणार आहे. धाराशिव जिल्ह्यातुन हजारो बांधव राञी पासुन गावा गावातुन मराठा बांधव अंतरवली सराटीकडे कुच करताना पाहायला मिळत आहेत.जो पर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तो पर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. 

Aug 27, 2025 09:31 (IST)

Live Update : :मराठा आरक्षणासाठी लातूरमधून समाजबांधवांचा मुंबईकडे मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद, लातूरहून समाज बांधव रवाना

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत होणाऱ्या महा आंदोलनासाठी लातूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर मराठा समाजबांधवांनी मुंबईकडे कूच केली आहे. लातूर शहरासह विविध तालुक्यांतून शेकडो युवक, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिक ट्रॅक्टर, पिकअप, टेम्पो, चारचाकी व दुचाकी वाहनांमधून रवाना झाले आहेत.

अंतरवाली सराटी या ठीकाणी काही जण पोहचणार आहेत तर लातूरचे अनेक कार्यकर्ते आणि समाजबांधव थेट मुंबईतील आंदोलनस्थळी उपस्थित राहणार आहेत. या आंदोलनात लातूर जिल्ह्यातील मराठा समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळत आहे. 

Aug 27, 2025 08:53 (IST)

Live Update : मनोज जरांगेंच्या आंदोलनाला जालना पोलिसांकडून परवानगी, मात्र पोलिसांकडून 40 अटींचं पत्र

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला जालना पोलिसांकडून परवानगी, मात्र पोलिसांकडून 40  अटींचं पत्र 

Aug 27, 2025 08:20 (IST)

Live Update : राज्यभरातून मराठा बांधव अंतरवाली सराटीत यायाला सुरुवात..

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे आज मुबंईकडे हजारो आंदोलकासह कूच करणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी हिंदू सणा मध्ये विघ्न आणल्यास शिवराय निपात करायचे अशी टीका त्यांनी केली होती. या टिकेनतर आज जरांगे यांच्या आंदोलन स्थळी असलेल्या व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या नंतर गणपतीची मूर्ती बघायला मिळत आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन केल्या नंतर जरांगे पाटील गणपतीच दर्शन घेऊन आणि आरती करून मुबईच्या दिशेने निघणार आहेत, फडणवीस आणि विरोधकांनाच्या टिके नंतर पहिल्यादा आज गणपतीची मूर्ती ही व्यासपीठावर बघायला मिळत असल्याने फडणवीस यांच्या टिकेला जरांगे यांनी मी कट्टर हिंदू आहे अस म्हणत या मूर्तीच्या स्वरूपात उत्तर दिल तर नाही ना अशा चर्चाना आतां उधान आलय...

Aug 27, 2025 07:49 (IST)

Live Update : मराठा आरक्षणाचे केंद्रबिंदू ठरलेल्या बीड जिल्ह्यातून मराठा समाज अंतरवली सराटीकडे रवाना

मराठा आरक्षणाची मागणी घेऊन आंदोलक मनोज जरांगे पाटील मुंबईला जाण्यावर ठाम आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी बीड जिल्ह्यातून मराठा समाज अंतरवाली सराटीकडे निघाला आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात चलो मुंबईचा नारा देत हे समाज बांधव पंधरा दिवसांची शिदोरी घेऊन जरांगे पाटील यांच्यासोबत मुंबईकडे जाणार आहेत. मराठा आरक्षण ओबीसीतूनच घेण्याचा निर्धार या समाज बांधवांनी केलाय. आणि यावेळी आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही. असा पवित्रा समाज बांधवांनी घेतला आहे. 

Aug 27, 2025 07:48 (IST)

Live Update : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी 50 क्विंटल तिखट पुऱ्या केल्या तयार

मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनासाठी अनेक हातभार लागत आहे. यात ज्या मार्गाने मोर्चा  जाणार आहे त्या मार्गावर आंदोलकांच्या जेवणाची विशेष सोय करण्यात आली आहे. यात साष्ट पिंपळगाव येथील गावकऱ्यांनी तब्बल पन्नास क्विंटल तिखट पुऱ्या तयार केल्या आहेत. पुऱ्या आणि त्यासोबत लोणचं आणि पाण्याची बॉटल अशा पद्धतीने गावकऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

Aug 27, 2025 07:45 (IST)

Live Update : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर जालना पोलिसांकडून विशेष खबरदारी

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी म्हणून जरांगे आज मुंबईकडे मोर्चा घेऊन निघत आहे. त्यामुळे जालना पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. अंतरवाली सराटी परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून वरिष्ठ अधिकारी देखील आंदोलनास्थळी पोहोचले आहेत. 

Aug 27, 2025 07:43 (IST)

Live Update : राष्ट्रीय महामार्ग धुळे-सोलापूर वरुन किमान 100 हून अधिक वाहने सराटीच्या दिशेने

मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून मुंबईच्या दिशेने आंदोलन करण्याची भूमिका घेतली त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.  

अंतरवाली सराटीतून निघण्याची भूमिका जाहीर केलेली आहे एनडीटीव्हीच्या कॅमेरात अर्धा तासामध्ये राष्ट्रीय महामार्ग धुळे सोलापूर वरुन किमान 100 हून अधिक वाहने सराटीच्या दिशेने जाताना दिसले

Aug 27, 2025 07:25 (IST)

Live Update : सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या मुलाचा जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा

मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांचे आजचे आंदोलन या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाकडून गठीत करण्यात आलेल्या उपसमितीचे सदस्य सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचा मुलगा सुरज पाटील यांनी फेसबुकवर व्हिडिओ आणि बॅनर पोस्ट करीत चलो मुंबईचा नारा दिला असल्याचे पाहायला मिळत आहे.

Aug 27, 2025 07:23 (IST)

Live Update : नागपूरकराचे अराध्यदैवत गणेश टेकडी मंदिरात सकाळपासून भक्तांची गर्दी

नागपूरकराचे आराध्यदैवत गणेश टेकडी मंदिरात सकाळपासून भक्तांची गर्दी 

* गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मंदिरात भव्य आकर्षक सजावट.

* पहिली आरती घेण्यासाठी भक्ताची पहाटेपासून रांग..

Aug 27, 2025 07:19 (IST)

Live Update : नाशिकच्या प्रसिद्ध बुधा हलवाईच्या कारखान्यात बाप्पाचे आवडते तळणीचे मोदक बनवण्याची लगबग..


गणेशोत्सव काळात मिठाई व्यावसायिकांची मोठी उलाढाल होत असते. पेढे, मलई बर्फी, मोतीचूर लाडू यांसह खास करून बाप्पाच्या आवडत्या मोदकांना विशेष मागणी असते. उकडीचे मोदक, खव्याचे मोदक, तळणीचे मोदक असे विविध प्रकार मोदकांचे बघायला मिळत असतात. विशेष म्हणजे तळणीच्या मोदकांचं नाव काढताच तोंडाला पाणीच सुटते.  नाशिकच्या प्रसिद्ध बुधा हलवाईकडे या दहा दिवसांच्या काळात दररोज साधारणतः 100 ते 150 किलो तळणीच्या मोदकांची विक्री होते. 

रवा, खोबरं, पिठीसाखर यांचं सारण बनवत त्यापासून हे मोदक तयार केले जातात.. दरम्यान हे तळणीचे मोदक तयार करण्याची कशी लगबग सुरू आहे 

Aug 27, 2025 07:18 (IST)

Live Update : लाडक्या बाप्पाचं मनमाडमध्ये जंगी स्वागत...

लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी नाशिकच्या मनमाडमध्ये गणेशभक्तांमध्ये जोरदार उत्साह पाहायला मिळत आहे. रात्री उशिरापर्यंत बाप्पाच्या मूर्तिचे वाजत गाजत जल्लोषात आगमन होत होते.20 ते 25  फुटापर्यंत भव्य मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्यावर जास्त भर दिला जात आहे.मोठ्या मूर्ती शहरात आणणल्यानंतर त्यांना विद्युततारा अडथळा ठरत असल्याने वीज पुरवठा खंडित करू मूर्ती मंडपापर्यंत नेण्यात आल्या.दरवर्षी प्रमाणे यंदाही गणेश भक्ताचा उत्साह शिगेला पोहचला असून डीजेच्या तालावर वाजत गाजत बाप्पाचा आगमन सोहळ्याच्या मिरवणूका काढण्यात आल्या.