9 minutes ago

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil Morcha Live Update) यांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरु केले आहे. मनोज जरांगे आता थेट मुंबईच्या दिशेने कूच करत आहेत. मनोज जरांगे पाटील (maratha reservation) अंतरवाली सराटीतून काल रवाना झाले. काल (27 ऑगस्ट) त्यांचा मुक्काम शिवनेरी येथे होता. आज ते शिवनेरीहून निघणार असून त्यांचा मुक्काम वाशी येथे असेल. किल्ले शिवनेरीचे दर्शन घेऊन मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना होईल. हा मोर्चा चाकण, तळेगाव आणि लोणावळा या महत्त्वाच्या ठिकाणांवरून पुढे सरकत थेट वाशीपर्यंत पोहोचतील. 

Aug 28, 2025 15:53 (IST)

Manoj Jarange Patil Morcha Live: आझाद मैदानात मराठा आंदोलक जमू लागले

मराठा आंदोलक आझाद मैदानात जमण्यास सुरुवात झालेली आहे.  आझाद मैदानात जोरदार घोषणाबाजी मराठा आंदोलकांकडून देण्यात येत आहेत.  मनोज जरांगे पाटील ज्या सभा मंडपावरून सर्व मराठा आंदोलकांना मार्गदर्शन करणार आहेत, त्या ठिकाणी सभा मंडपाची तयारी देखील सुरू करण्यात आलेली आहे.

Aug 28, 2025 15:51 (IST)

Manoj Jarange Patil Morcha Route: मनोज जरांगे पाटील आज मुंबईत पोंहचण्याची शक्यता कमी

मनोज जरांगे पाटील आज मुंबईत पोंहचण्याची शक्यता कमी आहे. अजूनही नारायणगाव पासून पाच किमी अंतरावरच त्यांचा ताफा आहे. उद्या दुपार नंतरच जरांगे मुंबईत येण्याची शक्यता आहे. 

Aug 28, 2025 15:34 (IST)

Manoj Jarange Patil Live News: काँग्रेस खासदारांचा मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा

"मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी सातत्याने आवाज उठवला आहे. त्यांचं आंदोलन हे समाजाच्या न्यायहक्कासाठी आहे. काँग्रेस पक्ष त्यांच्या सोबत ठामपणे उभा आहे," असं खासदार शिवाजीराव काळगे म्हणाले.

Aug 28, 2025 15:32 (IST)

Manoj Jarange Patil Live News: नवी मुंबई पोलिस कोणगावमध्ये तैनात

नवी मुंबई पोलिसांचा कोणगांव पनवेल येथे फौज फाटा सज्ज झाला आहे. पनवेल कोनगाव या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने जात आहेत. नवी मुंबई मधून कोनगाव या ठिकाणाहून उलवे, पाम बीच मार्गे वाशीकडून आझाद मैदान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते निघायला सुरुवात झाली आहे.

Advertisement
Aug 28, 2025 15:30 (IST)

Manoj Jarange Patil Live News: दोन मराठा आंदोलकांची मंगळवेढा ते मुंबई सायकल वारी

Manoj Jarange Patil Live News: दोन मराठा आंदोलकांची  मंगळवेढा ते मुंबई सायकल वारी 

दोन मराठा आंदोलकांची मंगळवेढा ते मुंबई सायकल वारी केली आहे. त्यानंतर ते आझाद मैदानात दाखल झाले आहेत. जरांगेंच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी ते मुंबईत दाखल झाले आहेत. 

Aug 28, 2025 15:20 (IST)

Manoj Jarange Patil Morcha Route: जरांगेंचा ताफा पुणे नाशिक महामार्गावर दाखल

Manoj Jarange Patil Morcha Route: जरांगेंचा ताफा पुणे नाशिक महामार्गावर दाखल 

 

मनोज जरांगे यांचे सर्व कार्यकर्ते आता पुणे नाशिक महामार्गावर दाखल झाले आहेत. त्यामुळे आता पुढील प्रवास मंचर राजगुरुनगर चाकण मार्गे तळेगाव असा होणार आहे. संथ गतीने पुढे जाणारा ताफा आता काहीसा वेगाने पुढे जाताना दिसत आहे.

Advertisement
Aug 28, 2025 15:13 (IST)

Manoj Jarange Patil Morcha Live: आजही जरांगेंना प्रवासासाठी उशीर, 22 किमीसाठी 1 तास

Manoj Jarange Patil Morcha Live: आजही जरांगेंना प्रवासासाठी उशीर झाला आहे. त्यांना  22 किमीसाठी 1 तास लागला आहे.  

Aug 28, 2025 15:11 (IST)

Manoj Jarange Patil Live Location: जरांगेंचा ताफा नारायणगावमध्ये पोहोचला, मोठी गर्दी

Manoj Jarange Patil Live Location: मनोज जरांगे पाटील यांचा ताफा नारायणगावमध्ये पोहोचला आहे. त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे.  रस्त्याच्या दोन्ही बाजूने मराठा समाजाचे लोक त्यांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. त्यांचा हा ताफा मुंबईच्या दिशेने पुढे जाणार आहे. ठिकठिकाणी मोठ्या संख्येने त्यांचे स्वागत होत आहे. 

Advertisement
Aug 28, 2025 15:02 (IST)

Manoj Jarange Patil Live Morcha : चौकटीत राहून आंदोलन करा, मुख्यमंत्र्यांचा सल्ला

Manoj Jarange Patil Live Morcha : आंदोलनासाठी रिसोर्स कोण उभे करते हे उघड होतं आहे. त्याला ही हरकत नाही. आम्ही आंदोलन करण्याच्या विरोधात नाही. पण चौकटीत करा हेच सांगणं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. 

Aug 28, 2025 14:42 (IST)

Manoj Jarange Patil Live News : मनोज जरांगे यांच्या महामोर्चामुळे जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी

मनोज जरांगे पाटील यांनी काढलेल्या मराठा संघर्ष मोर्चामुळे जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली आहे.  अवजड वाहने मोठ्या प्रमाणावरती रस्त्यावर आली आहेत. पोलिसांनी या वाहनचालकांना रस्त्याच्या कडेला वाहनं लावण्याचं आवाहन केलंय. 

जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील हलकी वाहने ही पुणे बेंगलोर महामार्ग त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावरून वळवण्यात आली आहे. फक्त मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चामधील सहभागी होणाऱ्या वाहनांना जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून प्रवेश दिला जातोय. त्यामुळे जुन्या मुंबई पुणे महामार्गावरती वाहतूक कोंडी झाली आहे.

Aug 28, 2025 14:17 (IST)

Manoj Jarange Patil Live News : शिवनेरी ते मुंबई नॉनस्टॉप Live

Aug 28, 2025 14:15 (IST)

Manoj Jarange Patil Live News : जुन्नरहून तळेगावला पोहोचायला लागले 7 सात; मराठा आंदोलनामुळे मोठी वाहतूक कोंडी

जुन्नरहून सात वाजता निघालेल्या आंदोलकाला तळेगाव येथे पोहोचण्यासाठी तब्बल 2 वाजले. जुन्नर ते तळेगाव अंतर 86 किमी इतकं आहे. यासाठी त्यांना सात तास लागले. त्यामुळे या भागात मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं दिसून येत आहे.  परिणामी मनोज जरांगे पाटील यांना तळेगावमध्ये येईपर्यंत रात्रीचे 8 वाजतील, अशी माहिती आहे. 

Aug 28, 2025 14:11 (IST)

Manoj Jarange Patil Live News : तळेगाव येथे मनोज जरांगेंच्या स्वागतासाठी मोठी तयारी; डिजे लावला, आंदोलकांचा मोठा ताफा

तळेगाव येथे मनोज जरांगेंच्या स्वागतासाठी मोठी तयारी; डिजे बोलावला, आंदोलकांचा मोठा ताफा

या भागात मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे

जुन्नरहून सात वाजता निघालेल्या आंदोलकाला तळेगाव येथे पोहोचण्यासाठी तब्बल 2 वाजले. जुन्नर ते तळेगाव अंतर 86 किमी इतकं आहे. यासाठी त्यांना सात तास लागले. त्यामुळे या भागात मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं दिसून येत आहे.

परिणामी मनोज जरांगे पाटील यांना तळेगावमध्ये येईपर्यंत रात्रीचे 8 वाजतील, अशी माहिती आहे. 

Aug 28, 2025 14:05 (IST)

Manoj Jarange Patil Live News : पुण्यात अघटित घडलं, मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे निघालेल्या आंदोलकाचा मृत्यू

 मराठा आरक्षण प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांचे नेतृत्वाखाली मुंबईकडे निघालेल्या सतीश देशमुख यांचा पुणे जिल्ह्यात हृदयविकाराने मृत्यू झाला.. सतीश देशमुख बीडच्या केज तालुक्यातील वरपगाव येथील रहिवासी आहेत.. पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे ते थांबलेले असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि यात त्यांचा मृत्यू झाला.  त्यांच्या पश्चात पत्नी संध्या, मुलगा प्रसाद आणि वृद्ध आई पुष्पा बाई असा परिवार आहे.. सतीश देशमुख यांच्या अकस्मात निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे..

Aug 28, 2025 14:02 (IST)

Manoj Jarange Patil Live News : मराठा आरक्षणासाठी राज्यभरातून पूर; अकोल्यातून 5 हजार मराठा बांधव मुंबईकडे रवाना होणार

मराठा समाज संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टला अंतरवाली सराटी येथून आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे रवाना झाले असून, ते आज जुन्नर येथे पहाटे दाखल झाले आहेत. त्यांच्या या आंदोलनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.. या दरम्यान, अकोला जिल्ह्यातून आतापर्यंत सुमारे 3 हजार मराठा बांधव रेल्वे, बस व चारचाकी वाहनांद्वारे आपल्या सोयीनुसार मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.. दरम्यान, आज अकोल्यातूनच आणखी 2 हजार मराठा बांधव चारचाकी वाहनांमधून पातूर येथे गोळा होऊन समृद्धी महामार्गाने मुंबईकडे रवाना होणार आहेत.

Aug 28, 2025 14:01 (IST)

Manoj Jarange Patil Live News : इंदापूरमधून 500 पेक्षा अधिक गाड्या, मराठ्यांचं वादळ निघालं मुंबईला.....

आरक्षणासाठी हजारोंच्या संख्येने इंदापूर मधून मराठा समाज बांधव मुंबईकडे निघाले आहेत. एकट्या इंदापूर मधून पाचशेहून अधिक चार चाकी वाहन मुंबई च्या दिशेने रवाना झालीत.सरकारने जर आरक्षण दिलं नाही तर समुद्राच्या लाटेत हे सरकार वाहून गेल्याशिवाय राहणार नाही. झाडाची साल आणि पाने खाऊन जगू पण मागे हटणार नाही. पाठीमागे या सरकारने आमची फसवणूक केली मात्र आता अध्यादेश निघाल्याशिवाय मागे हटणार नाही अशी आक्रमक भूमिका मराठा समाज बांधवांनी घेतली आहे. 

Aug 28, 2025 13:45 (IST)

Manoj Jarange Patil Live News : सरकारकडून दुसऱ्या दिवशी कोणतीही चर्चा नाही

सरकारकडून दुसऱ्या दिवशी कोणतीही चर्चा नाही 

उदय सामंत मुंबईमध्ये 

आज उदय सामंत यांच्या घरच्या गणपतीचे विसर्जन

राधा कृष्ण विखे पाटील शिर्डीमध्ये

Aug 28, 2025 13:41 (IST)

Manoj Jarange News Live Updates : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी पंढरपुरातून आमदार अभिजीत पाटील मुंबईला रवाना

मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनासाठी आज पंढरपुरातून आमदार अभिजीत पाटील हे मराठा बांधवांसोबत मुंबईला रवाना झाले. अभिजीत पाटील हे माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. आज माढा आणि पंढरपूर तालुक्यातील मराठा बांधवांसोबत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन पंढरपुरातून विविध गाड्यांच्या ताफ्यासह मुंबईकडे कूच केली आहे. आपण विधिमंडळात मराठा आरक्षणाबाबत प्रश्न मांडला होता. सरकारने वेळीच उपाययोजना केल्या असत्या तर सणासुदीत मराठा बांधवांना मुंबईला जायची वेळ आली नसती. अजूनही वेळ गेली नाही. असे सांगत आमदार अभिजीत पाटील यांनी सरकारला मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे. 

Aug 28, 2025 13:27 (IST)

Manoj Jarange Patil Live News : जुन्नर चौकातून मनोज जरांगेचं आंदोलकांना आवाहन...

सर्वांनी शांततेत मुंबईत यायचं आहे. 5000 तर 5000 आंदोलनाला बसणं गरजेचं आहे.  कायद्याचं पालन करणे गरजेचं आहे. 

कुणीही आडमुठेपणा करू नका. जर 5000 म्हटले तर तेवढेच या. समाज आपल्याकडे आशेने बघतो, आंदोलनात बाधा येऊ देऊ नका

Aug 28, 2025 13:25 (IST)

Manoj Jarange Patil Live News : जरांगे पाटील यांच्या मोर्चातील तीन वाहनांवर दगडफेक, मोठं नुकसान; एक जखमी

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चातील तीन वाहनांवर काल रात्री दगडफेक झाल्याची माहिती आहे. 

अहिल्यानगर जिल्ह्यातील टाकळी डोकेश्वर परिसरामध्ये अज्ञातांकडून काल रात्री दहा वाजेच्या सुमारास दगडफेक झाली. दगडफेकीमुळे चार चाकी वाहनाची काच फुटून नुकसान झालं. तर एक जण किरकोळ जखमी आहे.

दगडफेक झाल्यानंतर परिसरामध्ये काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढून परिस्थिती नियंत्रणात आणली. दगडफेक झालेलं वाहन बीड जिल्ह्यातील बोरखेड गावातील असल्याची प्राथमिक माहिती असून या संदर्भात अधिक माहिती पोलीस प्रशासनाने अद्यापपर्यंत दिलेली नाहीये

Aug 28, 2025 12:59 (IST)

Manoj Jarange Patil Live News : धुळ्यातून हजारोंच्या संख्येने आंदोलक मुंबईच्या दिशेने निघणार..

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील वातावरण चांगलंच तापलंय. आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील  यांच्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज मुंबईच्या दिशेने निघाला आहे.. धुळ्यातील मराठा समाज बांधव आहे उद्या सकाळी हजारच्या संख्येने धुळे मेमो ट्रेन ने मुंबईकडे कूच करणार आहेत

Aug 28, 2025 12:55 (IST)

Live Update : मराठा आरक्षणासाठीचा महामोर्चा; तळेगाव–चाकण महामार्ग आज वाहतुकीसाठी बंद

मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठीचा महामोर्चा आज मुंबईकडे मार्गस्थ होत आहे. शिवनेरी किल्ल्याचे दर्शन घेऊन नारायणगाव मंचर–खेड–चाकण–तळेगावमार्गे लोणावळ्यातून मोर्चा आझाद मैदान, मुंबईकडे रवाना ही होणार आहे. मोर्चात मोठ्या संख्येने मराठा बांधव सहभागी होत असल्याने तळेगाव–चाकण राष्ट्रीय महामार्ग क्र. 548 डी वर वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली आहे. 

वाहनधारकांनी पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गाचा किंवा अन्य पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाने केले असून दिवसभर या मार्गावर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तात्पुरता वाहतूक बदल करण्यात आला आहे. तसेच पुणे ग्रामीण पोलीस दलातील वडगांव, कामशेत, लोणावळा, पोलीस प्रशासन ही सज्ज झाले असून जागोजागी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Aug 28, 2025 12:54 (IST)

Manoj Jarange Patil Live News : मनोज जरांगे यांच्या रॅलीत ड्रोन उडवण्यास बंदी

मनोज जरांगे यांच्या रॅलीत ड्रोन उडवण्यासाठी बंदी 

पुणे पोलिसांकडून अँटी ड्रोन गणने ड्रोनवर कारवाई होणार 

पुणे ग्रामीण आणि बारामती अँटी ड्रोन पथक तैनात 

खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांकडून ड्रोन बंदी

Aug 28, 2025 12:54 (IST)

Manoj Jarange Patil Live News : मनोज जरांगे यांच्या रॅलीत ड्रोन उडवण्यास बंदी

मनोज जरांगे यांच्या रॅलीत ड्रोन उडवण्यासाठी बंदी 

पुणे पोलिसांकडून अँटी ड्रोन गणने ड्रोनवर कारवाई होणार 

पुणे ग्रामीण आणि बारामती अँटी ड्रोन पथक तैनात 

खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांकडून ड्रोन बंदी

Aug 28, 2025 12:47 (IST)

Manoj Jarange Patil Live News : शिवनेरी गडावर जाण्यापूर्वी पहिल्या पायरीवर मनोज जरांगे झाले नतमस्तक

Aug 28, 2025 12:38 (IST)

Manoj Jarange Patil Live News : मोठी बातमी! जुन्नरमध्ये मराठा समाजाच्या आंदोलकाचा हार्टअटॅकने मृत्यू

मोठी बातमी! जुन्नरमध्ये मराठा समाजाच्या आंदोलकाचा हार्टअटॅकने मृत्यू

Aug 28, 2025 12:35 (IST)

Live Update : विजयाचा गुलाल घेऊनच पंढरपुरात परतणार, मराठा मोर्चात सहभागी झालेले मराठा बांधवाचा निर्धार

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पंढरपुरातून देखील काही मराठा बांधव मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत, यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावरुन जात असताना त्यांनी आपण विजयाचा गुलाल घेऊनच पंढरपुरात परतणार असल्याचा निर्धार केला. 

Aug 28, 2025 12:33 (IST)

Live Update : नारायणगाव ते शिवनेरीपर्यंत वाहतूक कोंडी, 15 ते 20 किलोमीटरपर्यंत ट्रॅफिक जाम

नारायणगाव ते शिवनेरीपर्यंत वाहतूक कोंडी 

 नारायणगावपासून 15 ते 20 किलोमीटरपर्यंत ट्रॅफिक जाम 

अजूनही आंदोलन शिवनेरीच्या दिशेने निघाले

Aug 28, 2025 12:27 (IST)

Live Update : मनमाडहून शेकडो मराठा आंदोलक मुंबईला रवाना, जनशताब्दी एक्सप्रेसने आंदोलकांची मुंबईकडे कुच

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिकच्या मनमाड रेल्वे स्थानकातून शेकडो मराठा बांधव जनशताब्दी एक्सप्रेसने मुंबईकडे रवाना झाले.यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.आता आरक्षण घेतल्याशिवाय परत यायचे नाही असा निर्धार मराठा आंदोलकांनी केलाय.यावेळी मुस्लिम समाजाने  मराठा आरक्षणाला पाठिंबा जाहीर केला.

Aug 28, 2025 12:23 (IST)

Manoj Jarange Patil Live News : मनोज जरांगे शिवनेरी गडावर नतमस्तक

Aug 28, 2025 12:20 (IST)

Manoj Jarange Patil Live News : शिवनेरी गडावर मनोज जरांगे पाटील यांचं भव्य स्वागत

शिवनेरी गडावर मनोज जरांगे पाटील यांचं भव्य स्वागत

Aug 28, 2025 12:16 (IST)

Live Update : OBC नेते हरिभाऊ राठोड कसं पाहतात Manoj Jarange यांच्या Maratha Morcha कडे

Aug 28, 2025 12:14 (IST)

Manoj Jarange Patil Live News : ...तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही, मराठा आंदोलक आक्रमक

आरक्षणाच्या नावाखाली तारीख पे तारीख, सरकार आम्हाला फसवत आहे.

जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही.

Aug 28, 2025 11:50 (IST)

Live Update : उद्या नाशिकमधून हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईकडे करणार कूच..

मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिकमध्ये बैठक पार पडली. यावेळी उद्या मोठ्या संख्येने नाशिक जिल्ह्यातील मराठा समाजाचे बांधव जेवणाच्या सामग्री पुरविण्याची जबाबदारी घेणार आहे. त्यामध्ये यावेळी नाशिक जिल्ह्यातील मराठा समाजाकडून खास स्टिकर तयार करण्यात आले आहेत. दुचाकीसह चारचाकी वाहनांना ते लावण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्याला एका दिवसाची आंदोलनाची जबाबदारी दिली तरी नाशिकमधून ५ हजार आंदोलक आझाद मैदानावर आंदोलन करतील अशी तयारी यावेळी करण्यात आली आहे. तो पर्यंत आम्ही मुंबईतील गणेशोत्सवात गणरायाचं दर्शन घेऊ अशी भूमिका नाशिकमधील मराठा आंदोलकांनी घेतली आहे. लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करू सरकारने अवहेलना करू नये अशी प्रतिक्रिया यावेळी मराठा आंदोलकांनी दिलीये. 

Aug 28, 2025 11:48 (IST)

Live Update : मनोज जरांगे यांचा मोर्चा मुंबईला जुन्या महामार्गावरून जाणार

मनोज जरांगे यांचा मोर्चा मुंबईला जुन्या महामार्गावरून जाणार

मुंबई - पुमे एक्सप्रेस वेवरून सर्वसामान्य वाहतूक वळवली जाणार

मोर्चातील गर्दी लक्षात घेता मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरुन वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून जुन्या महामार्गावरून जाणार

Aug 28, 2025 11:46 (IST)

Live Update :मुंबईत होणाऱ्या जरांगे पाटील यांच्या उपोषणासाठी मुंबई पोलिसाची तयारी सुरू

मुंबईत होणाऱ्या जरांगे पाटील यांच्या उपोषणासाठी मुंबई पोलिसाची तयारी सुरू

सर्व पोलीस फोर्स मिळून 1500 च्या आसपास पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत

गरज भासल्यास अतिरिक्त पोलीस फोर्स मागवण्यात येईल

आझाद मैदान परिसरात 200 पेक्षा जास्त पोलीस अधिकारी तैनात करण्यात येणार आहेत

आझाद मैदान परिसरात पाच डीसीपी आणि त्यापेक्षा पुढील दर्जाचे अधिकारी तैनात असतील

यासोबतच दंगल नियंत्रण पथक, अग्नीशमन पथकसुद्धा असणार तैनात

Aug 28, 2025 11:44 (IST)

Live Update : सरकारचं शिष्टमंडळ आजच जरांगेंची भेट घेणार, 2 वाजेच्या सुमारास भेट होण्याची शक्यता

सरकारचं शिष्टमंडळ आजच जरांगेंची भेट घेणार

जरांगे शिवनेरी किल्ल्यावरून खाली आल्यावर होऊ शकते भेट

दुपारी दोन वाजेच्या सुमारास शिष्टमंडळाची जरांगेंशी भेट होऊ शकते

Aug 28, 2025 11:37 (IST)

Live Update : शिवनेरी गड चढण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांची संपर्ण पत्रकार परिषद, पाहा

Aug 28, 2025 11:23 (IST)

Live Update : आंदोलकांच्या गाठीभेटी अन् जरांगेंची गाडीतच झोप...

Aug 28, 2025 11:12 (IST)

Live Update : मनोज जरांगे यांचा मोर्चा दुपारी १ वाजता शिवनेरीहून पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होणार

मनोज जरांगे यांचा मोर्चा दुपारी १ वाजता शिवनेरीहून पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होणार

Aug 28, 2025 11:04 (IST)

Live Update : मनोज जरांगे यांचं आंदोलन दाखल होण्यापूर्वीच रॅपिड ऍक्शन फोर्सची एक तुकडी आझाद मैदानावर

मनोज जरांगे यांचं आंदोलन दाखल होण्यापूर्वीच रॅपिड ऍक्शन फोर्सची एक तुकडी आझाद मैदानावर दाखल झाली आहे. दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली तर ही फोर्स त्यासाठी तैनात असते. 

Aug 28, 2025 10:11 (IST)

Live Update : मुंबईत आंदोलन सुरू असतानाच महाराष्ट्रभरात आंदोलन करणार - मनोज दरांगे पाटील

मराठा आंदोलनासंदर्भात NDTV मराठीवर मोठी बातमी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार....

मनोज जरांगेंचं सात टप्प्यात आंदोलन होणार

मुंबईत आंदोलन सुरू असतानाच महाराष्ट्रभरात आंदोलन करणार

गावपातळीपासून ते राज्यपातळीपर्यंत आंदोलन करण्याचा निर्णय

उद्या फक्त मुंबईतच नव्हे तर राज्यभर आंदोलन होणार 

Aug 28, 2025 10:10 (IST)

Live Update : 'फडणवीस साहेब, तुम्हाला आदरपूर्वक सांगतो... आम्हाला अटी घालू नका' - मनोज जरांगे पाटील

तुम्ही गोळ्या जरी घातल्या तरी मनोज जरांगे ते झेलणार, पण आता हटत नाही. 

रात्री मुंबईत पोहोचणार हे निश्चित

२९ ऑगस्टला सकाळी आमरण उपोषणाला बसणार

संयम ठेवा, शांततेने घ्या. तुमच्या चुकीमुळे समाजाच्या तोंडाशी आलेला घास जाता कामा नये. गडबड गोंधळ करू नका. तुमच्या एका चुकीच्या भूमिकेमुळे समाजाच्या स्वप्नावर पाणी फिरायला नको. 

फडणवीस साहेब, तुम्हाला आदरपूर्वक सांगतो. तुम्ही आम्हाला अटी घालू नका. 

Aug 28, 2025 10:01 (IST)

Live Update : मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद

Aug 28, 2025 09:59 (IST)

Live Update : मनोज जरांगे पाटील यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे...

- रायगड-शिवनेरी येथून खूप प्रेरणा, बळ आणि शक्ती मिळते. 

- आझाद मैदानात आंदोलनासाठी एका दिवसाची परवानगी देण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस कोणाला थांबवणार नाही, गोरगरिबांच्या वेदनेचा सन्माम करतील अशी आम्हाला आशा आहे, असं जरांगे पाटील म्हणाले.  

 - एक दिवसाची परवानगी देणं म्हणजे गोरगरिबांची चेष्टा आहे.  तुम्ही जाणूनबुजून एक दिवसाची परवानगी दिली. तुम्ही मोठं मन दाखवायवा हवं होतं. गरीबांच्या वेदना लक्षात घेऊ पूर्णवेळ आंदोलन करण्याची परवानगी द्यावी. 

- फडणवीस साहेब, संधीचं सोनं करण्याची हिच योग्य वेळ आहे. गोरगरिब मराठ्यांची मन जिंकता येईल. मराठ्यांच्या मागणीची अमंलबजावणी करा, हेच मराठे गुलाल टाकून मरेपर्यंत तुम्ही दिलेल्या आरक्षणाचे उपकार विसरणार नाहीत. 

- फडणवीस साहेब, तुमची आठमुठी भूमिका सोडून द्या. मोकळ्या मनाने वागा; शिवनेरीत मनोज जरागे यांची मुख्यमंत्र्यांवर टीका  

Aug 28, 2025 09:31 (IST)

Live Update : मनोज जरांगे पाटील यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद

मनोज जरांगे पाटील यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार

Aug 28, 2025 08:56 (IST)

Live Update : मनोज जरांगेंचा आजचा मुंबईपर्यंतचा मार्ग कसा असणार?

28 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील किल्ले शिवनेरीचे दर्शन घेऊन चाकण - तळेगाव - लोणावळा - वाशी मार्गे मुंबईच्या आझाद मैदानावर पोहोचणार...

29 ऑगस्टला आंदोलनासाठी आझाद मैदानावर हजर असणार...

Aug 28, 2025 08:08 (IST)

Live Update : Manoj Jarange यांच्या आंदोलनातील पडद्यामागचे कारभारी?

Aug 28, 2025 08:06 (IST)

Live Update : Manoj Jarange Patil यांच्या आंदोलनात किती वाहनं?

Aug 28, 2025 08:05 (IST)

Live Update : जालना पोलिसांकडून मनोज जरांगेंना 40 अटी-शर्थीतून परवानगी

जालना पोलिसांकडून मनोज जरांगेंना 40 अटी-शर्थीतून परवानगी देण्यात आली आहे. 

1)सदर प्रवासामध्ये आक्षेपार्ह घोषणा तसेच जातीय तेढ निर्माण करणारी विधाने होणार नाही. याची दक्षता घ्यावी.

2)सदर प्रवासाचा मार्ग हा घोषीत केल्या प्रमाणेच राहील व नंतर बदलणार नाही याची दक्षता घ्यावी.

3) सदर प्रवासादरम्यान अत्यावश्यक सेवा पुरविणारे वाहन े जसे अॅम्ब्युलन्स, फायरब्रिगेड इत्यादी तसेच इतर व वाहतुक / रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी.

4)सदर प्रवासा दरम्यान खाजगी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई करण्याची जबाबदारी आयोजक आणि आंदोलनकर्ते यांची राहील याची नोंद घ्यावी.

5)सदर प्रवासामध्ये सहभागी होणारे नागरिक हे आपल्या हातामध्ये कोणत्याही प्रकारचे घातक शस्त्र, लाठी, काठी, तलवार, लोखंडी गज, दगड किंवा ज्वलनशील पदार्थ बाळगणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

Aug 28, 2025 07:54 (IST)

Live Update : भाजपकडून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या समर्थनार्थ विविध ठिकाणी पोस्टरबाजी

मनोज जरांगे मोर्चा मुंबईत येत असतानाच भाजपाने मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनात मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टर लावले. इतिहास शिव्यांना लक्षात ठेवत नाही इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो मराठा आरक्षण संदर्भात पोस्टर सर्वांचे लक्ष वेधत आहे

Aug 28, 2025 07:26 (IST)

Live Update : आंदोलनात नेमके आंदोलक किती याची आकडेवारीच कोणाकडे नसल्याची शक्यता

मराठा आंदोलकांसंदर्भात सगळ्यात मोठी बातमी 

आंदोलनात नेमके आंदोलक किती याची आकडेवारीच कोणाकडे नसल्याची शक्यता 

आंदोलनात वाहनांची संख्या किती ?

आंदोलनात दुचाकी किती ? 

यासंदर्भातली अचूक माहिती प्रशासनाकडे आणि आंदोलकांकडेही नाहीच ? 

शेकडोंच्या संख्येने लोकांनी वाटेत वाहने सहभागी केली 

नियोजन करण्यांकडे नाही

रात्रभर शेकडो वाहनांचा ताफा जुन्नरच्या दिशेनं येणं सुरूच

Aug 28, 2025 07:22 (IST)

Manoj Jarange Morcha LIVE: मनोज जरांगे पाटील जुन्नरमध्ये दाखल

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील जुन्नरमध्ये दाखल झाले आहेत. फॉरेस्ट रेस्ट हाऊसमध्ये पोहोचले असून, येथे थोडा वेळ विश्रांती घेऊन ते पुढे शिवनेरी किल्ल्याकडे रवाना होणार आहेत. गेल्या अनेक तासांपासून सकल मराठा समाजाचे नेते त्यांची वाट पाहत होते. आता त्यांच्या आगमनाने जुन्नरमधील मराठा आंदोलकांमध्ये उत्साह वाढला आहे.

Aug 28, 2025 07:06 (IST)

Live Update : मनोज जरांगे पाटील मोर्चा Live

Aug 28, 2025 06:59 (IST)

Live Update : मनोज जरांगे पाटील यांचा दुसऱ्या दिवसाचा दौरा कसा असेल?

मोर्चाचा दुसरा दिवस - 28 ऑगस्ट

28 ऑगस्ट रोजी सकाळी किल्ले शिवनेरीचे दर्शन घेऊन मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना होईल. हा मोर्चा चाकण, तळेगाव आणि लोणावळा या महत्त्वाच्या ठिकाणांवरून पुढे सरकत थेट वाशी मार्गे मुंबईतील आझाद मैदानावर पोहोचेल. या दिवशी मोठा जनसमुदाय रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे.