मोसीन शेख, बीड: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीड, जालना सिल्लोड येथे मराठा बांधवांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. या आत्महत्यांवरुन मनोज जरांगे पाटील व्यथित झालेत. आपल्याला आरक्षण 100 टक्के मिळणार आहे, मात्र जिव्हारी लागेल असे काम करु नका, असे आवाहन त्यांनी केले. तसेच राज्य सरकारलाही त्यांनी गर्भित इशारा दिला. यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीच्या आधी धनंजय मुंडे, वाल्मिक कराडने भेट घेतल्याचा मोठा दावाही केला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
"मराठा बांधवांना विनंती आहे, आरक्षण 100 टक्के मिळणार आहे. जिव्हारी लागेल असे काम करू नका, काल बीड ,जालना, सिल्लोड येथे आत्महत्या करण्यात आल्या. आत्महत्या करू नका, थोडा विचार करा. तुमची मराठा विद्यार्थ्यांबाबतची भावना योग्य आहे, मात्र तुम्ही गरजेचे आहात," असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी टोकाचे पाऊल न उचलण्याचा सल्ला दिला.
तसेच यावेळी त्यांनी सरकारवरही निशाणा साधला. "तुम्हाला नेमके किती बळी पाहिजे? मराठा लेकरं देखील तुमचं लेकरं समजा मुख्यमंत्री, तुम्हाला किती बळी घ्यायचे आहेत. अन्यथा आम्हाला भयंकर आंदोलन करावे लागणार आहे. मुख्यमंत्री तुम्ही आरक्षण देत नाही, ही कोणती मग्रुरी आहे? फडणवीस साहेब तुम्ही भावनावनश होऊ नका. अन्यथा आम्हाला वेगळा आंदोलन करून तुम्हाला जेरीस आणावे लागेल. मुख्यमंत्री तातडीने आरक्षण द्या अन्यथा आमचा संयम सुटणार आहे. तुम्ही मजा पाहणार असेल तर तुम्हाला याचे फळ भोगावे लागेल.." असा इशारा त्यांनी दिला.
नक्की वाचा - Crime News: कला शिक्षकाची भलतीच कला! महिलांच्या वॉशरुममध्ये जायचा अन्...
धनंजय मुंडेंनी घेतली भेट...
यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. 'आरोपींना यंत्रणा सोडणार नाही, टोळी धनंजय मुंडे यांची आहे, आरोपींना लपवत आहे. धनंजय मुंडे निवडणूकीपूर्वी मला भेटायला आले होते. 8 दिवसापासून फोन येत होते. रात्री 2 वाजता आले, सोबत कराड होता. त्यांनी कराडची ओळख करून दिली. त्यावेळी मी त्यांना हर्व्हेस्टरचे पैसे बुडवणारा हाच का?' असे मी म्हटले. त्यांनी म्हटले लक्ष राहुद्या, मराठयांनी मला मोठं केले, असे म्हणत जाताना पाया पडल्याचाही दावा त्यांनी केला.