जाहिरात

Crime News: कला शिक्षकाची भलतीच कला! महिलांच्या वॉशरुममध्ये जायचा अन्...

तो हे जे काही करत होता त्या मागचे कारण ऐकून तर सर्वांनाच धक्का बसला आहे. या घटनेनंतर महिला खरोखर सुरक्षित आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Crime News: कला शिक्षकाची भलतीच कला! महिलांच्या वॉशरुममध्ये जायचा अन्...
नागपूर:

एका शाळेवर कला शिक्षकम्हणून काम करत असलेल्या शिक्षकाचा भलताच कारनामा समोर आला आहे. त्यांने जे काही केलं त्यामुळे शिक्षकी पेशाला तर कलंक लावलाच पण विकृतीची सीमाचं त्याने पार केल्याचे या प्रकरणातून दिसून आले आहे. त्याने जे कृत्य केले त्यासाठी त्याला नागपूर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र तो हे जे काही करत होता त्या मागचे कारण ऐकून तर सर्वांनाच धक्का बसला आहे. या घटनेनंतर महिला खरोखर सुरक्षित आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

या विकृत शिक्षकाचे नाव मंगेश खापरे असं आहे. तो महिलांच्या शौचालया बाहेर जायचा. महिला वॉशरुममध्ये गेली की खिडकीतून त्यांच्या अश्वील व्हिडीओ काढायचा. कधी महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढायचा आणि तिथून पळ काढायचा. विदर्भ साहित्य मंडळाचे सस्तंग सुरु होते. त्या ठिकाणी महिला मोठ्या प्रमाणात आल्या होत्या. एक महिला ज्यावेळी वॉशरूमसाठी गेली त्यावेळी आपला कुणी तरी व्हिडीओ काढत असल्याचा तिला भास झाला. ही बाब तिने बाहेर येवून आपल्या पतीला सांगितली. 

ट्रेंडिंग बातमी - CIDCO Lottery 2025 : सिडकोचे माझे पसंतीचे घर! प्रतिक्षा संपली लॉटरीची तारीख ठरली

पतीनं तातडीने तिथं शोधाशोध केली त्यावेळी हा मंगेश खापरे त्यांच्या हाताला लागला. तातडीने त्यांनी पोलीसांना कळवले. पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले. शिवाय त्याचा मोबाईल ही चेक केला. मोबाईल तपासल्यानंतर पोलीसांनाही धक्का बसला. त्याच्या मोबाईलमध्ये महिलांचे अनेक व्हिडीओ होते. त्यातले काही वॉशरूममधले होते. तर काही व्हिडीओ हे महिलांचे आंघोळी करतानाचे होते. त्याचा हा मोबाईल पोलीसांनी जप्त केला आहे. 

ट्रेंडिंग बातमी - KDMC की भ्रष्टाचाराचा बाजार? दीड लाखाची लाच घेताना लिपीक गळाला, 2 बडे अधिकारीही अडकणार

याची त्यानंतर पोलीसांनी चौकशी केली. याच गुन्ह्यासाठी तो या आधीही जेलमध्ये गेला आहे. तो असं का करतो याची चौकशीही पोलीसांनी केली. त्यावर आपण पत्नी पासून विभक्त राहातो. त्यामुळे स्वताला एकटं समजतो. त्यामुळेच असं करत असल्याचं त्याने चौकशी दरम्यान सांगितले आहे. या आधी ही असे गुन्हे त्याने केल्याचे कबुल केले आहे. त्याच्या विरोधात आता विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Political news: 'अशोक चव्हाण म्हणजे भाजप नाही, त्यांची युती धर्माची माहिती कमी' शिंदेंच्या शिलेदार थेट भिडला

दरम्यान नागपूर पोलीसांनी महिलांना सतर्क राहण्याचे आव्हान केले आहे. शिवाय त्याने कुठे कुठे जाऊन अशी कृत्ये केली, त्याचा तपास आता नागपूर पोलिसांद्वारे केला जात आहे. कारण त्याच्या मोबाईलमध्ये महिलांचे असंख्य व्हिडीओ सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर महिलांना सतर्क आणि जागरूक राहण्याचे आव्हान पोलिसांकडून केले जात आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: