Manoj Jarange: "वेळ गेलेली नाही,...", लग्नाळू तरुणांची लग्न होणार; मनोज जरांगेंचा मोलाचा सल्ला ऐका!

Manoj Jarange: मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी तरुणांना आत्महत्या न करण्याचे आवाहन करत "कचाकच काम करा, तरच मुली मिळतील" असा सल्ला दिला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Manoj Jarange on Marriage Issues: महाराष्ट्रातील ग्रामीण भागात सध्या 'मुलांची लग्ने' हा सामाजिक प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. बुलडाणा जिल्ह्यात पाच दिवसांत दोन तरुणांनी लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच, मनोज जरांगे पाटील यांनी तरुणांना नैराश्य झटकून कामाला लागण्याचे आवाहन केले आहे. तसेच, मराठवाडा आणि विदर्भातील शेतीला पाणी मिळाल्यास शेतकऱ्यांच्या मुलांचे प्रश्न सुटतील, असे सांगत त्यांनी मोठ्या आंदोलनाचे संकेत दिले आहेत.

"मुलांनो सावध व्हा, आळशीपणा सोडा!"

मनोज जरांगे यांनी तरुणांना अत्यंत थेट भाषेत सल्ला दिला आहे. ते म्हणाले "तरुणांनी आत्महत्या करू नये. पण काम केले नाही तर मुलगी कशी मिळेल? कचाकच कामं करा, व्यवसाय करा, शेती कसायला शिका. शेतीत पैसा आहे, फक्त जोडधंदा करण्याची तयारी हवी.  मुलांनो सावध व्हा, अजूनही वेळ गेलेली नाही.

Advertisement

(नक्की वाचा-  Aurangpura Renamed: छत्रपती संभाजीनगरमधील औरंगपुराचं नाव बदललं; महापालिकेत नामांतराचा प्रस्ताव मंजूर)

पाण्यासाठी मोठे आंदोलन उभे राहणार

आत्महत्या थांबवायच्या असतील आणि शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न व्हायची असतील, तर शेतीतून उत्पन्न मिळणे गरजेचे आहे. यासाठी शेती बागायती असणे गरजेचं आहे. पश्चिम महाराष्ट्राला जसं पाणी आहे, विदर्भ आणि मराठवाड्याला तसं पाणी नाही. उजनी आणि जायकवाडीचे पाणी वळवण्यासाठी केवळ पाट फिरवण्याची गरज आहे, पण सरकारच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी मरत आहे. त्यामुळे हा मुद्दा देखील मी लावून धरणार आहे. मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना पाणी मिळालंच पाहिजे, या मुद्द्यावर खुप मोठं आंदोलन आम्ही उभं करणार आहोत, असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिला. 

बुलडाण्यातील दोन जीव गेले

संग्रामपूरमधील हरीश वानखेडे आणि चिखलीतील सत्यपाल भिसे या दोन तरुणांनी लग्नासाठी स्थळ मिळत नसल्याने गळफास घेतला. गरिबी आणि बेरोजगारी या तरुणांच्या जीवावर बेतली आहे.

(नक्की वाचा-  Women Cricketer: सेक्सटॉर्शन महागात पडलं! महिला क्रिकेटरला मुंबई पोलिसांचा दणका, तिघांना अटक)
 
कोल्हापुरातील बॅनर चर्चेत

कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील कोवाड गावात एका निनावी बॅनरने सर्वांचे लक्ष वेधले आहे. "गावात रस्ते नाहीत, पाणी नाही, कचऱ्याचे ढीग आहेत; अशा परिस्थितीत आमच्या मुलांना मुली कोण देणार?" असा उपरोधिक प्रश्न या बॅनरद्वारे प्रशासनाला विचारण्यात आला आहे.
 

Topics mentioned in this article