'कुठे आहे स्फोटक परिस्थिती?' तायवाडेंनी कोणाला केला सवाल?

मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष महाराष्ट्रात उभा राहीला आहे. त्यात मनोज जरांगे पाटील यांनी राज्यात स्फोटक स्थिती आहे असे वक्तव्य केले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
नागपूर:

मराठा आरक्षणावरून सध्या राज्याचे राजकारण तापले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आरक्षणासाठी आक्रमक आहेत. शिवाय सगे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी व्हावी असा त्यांचा आग्रह आहे. मात्र ओबीसी समाजाने त्याला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष महाराष्ट्रात उभा राहीला आहे. त्यात मनोज जरांगे पाटील यांनी राज्यात स्फोटक स्थिती आहे असे वक्तव्य केले आहे. त्याला आता राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

जरांगे म्हणतात तशी महाराष्ट्रात कुठेही स्फोटक स्थिती झाली नाही, आम्हा सर्वांना तोडगा हवा आहे असे वक्तव्य तायवाडे यांनी केले आहे. शिवाय जरांगे पाटलांच्या वक्तव्यालाही छेद दिला आहे. आरक्षणाबाबत तोडगा निघाला पाहीजे असे ते म्हणाले. त्यासाठी राज्यातल्या सर्वच पक्षांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हा एक सामाजिक विषय आहे. त्यानुसार तो हाताळला गेला पाहीजे असेही तायवाडे म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांवर काळाचा घाला, 5 जणांचा मृत्यू 42 जण जखमी

छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतली. यावर ही तायवाडे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा अनुभव मोठा आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक प्रश्नांवर तोडगा काढला आहे. त्यामुळे त्यांची भुजबळांनी भेट घेणे काही गैर नाही. पवारांनी मार्गदर्श केल्यास या समस्येचा तोडगाही निघेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान छगन भुजबळ यांनी नुकतीच शरद पवारांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी ओबीसी मराठा आरक्षणाबाबत चर्चा केली. 

ट्रेंडिंग बातमी - संभाजी राजे फक्त एकाच धर्माच्या अतिक्रमणाच्या विरोधात आहेत? पोलीस स्टेशन बाहेर उभे राहून दिले आरोपांना उत्तर

मराठा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा हा समाजीक आहे. त्यामुळे यावर तोडगा काढला गेला पाहीजे असे भुजबळांनी पवारांना सांगितले. शिवाय आपण त्यासाठी पुढाकार घ्या असे आवाहन ही त्यांनी केले. हा विषय जर राजकीय होत गेला तर त्याचा मोठा फटका राज्याला बसेल असेही ते म्हणाले. सध्या गावागावात वाद निर्माण होत आहेत. अशा वेळी शरद पवारांनी या प्रकरणी लक्ष देणे गरजेचे आहे अशी भूमीका भुजबळांनी मांडली.   
 

Advertisement