Marathwada Rainfall: मराठवाड्यात नेमका किती पाऊस झाला? सध्या पेरणीची स्थिती काय?

Marathwada Rainfall: महाराष्ट्रात चालू खरीप हंगामातील पाऊस आणि पेरणीचा अधिकृत अहवाल जाहीर झाला आहे. 29 जुलै अखेर राज्यात सरासरीच्या 94.85% पाऊस झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

महाराष्ट्रात चालू खरीप हंगामातील पाऊस आणि पेरणीचा अधिकृत अहवाल जाहीर झाला आहे. 29 जुलै 2026 अखेर राज्यात सरासरीच्या 94.85% (480.4 मि.मी.) पाऊस झाला आहे. मराठवाडा विभागात सरासरीच्या 77% पाऊस नोंदवला गेला असून, मराठवाड्यात आतापर्यंत 86% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे.

मराठवाड्यातील पाऊस आणि पेरणीची स्थिती

मराठवाड्यातील पाऊस: 1 जून ते 29 जुलै या कालावधीत मराठवाड्यात सरासरीच्या 77% पाऊस झाला आहे.
मराठवाड्यातील पेरणी: मराठवाडा विभागात आतापर्यंत 86% क्षेत्रावर खरीप पेरणी पूर्ण झाली आहे.

Advertisement

महाराष्ट्रातील विभागावर पावसाची टक्केवारी (1 जून ते 29 जुलै)

राज्यात 1 जून ते 29 जुलै दरम्यान एकूण 480.4 मि.मी. (सरासरीच्या 94.85%) पाऊस पडला असून, एकूण 33 पर्जन्य दिवस नोंदवले गेले आहेत. राज्यातील एकाही तालुक्यात सरासरीच्या 25% पेक्षा कमी पाऊस झालेला नाही.

(नक्की वाचा-  IAS Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईला न्यायालयाचा झटका! 8 दूध डेअरींना दिलासा)

विभागवार पावसाची टक्केवारी 

  • कोकण विभाग- 111% (सर्वाधिक - सरासरीपेक्षा जास्त) 
  • पुणे विभाग - 87% (सरासरीपेक्षा कमी)
  • नाशिक विभाग - 83% (सरासरीपेक्षा कमी)
  • मराठवाडा विभाग - 77% (सरासरीपेक्षा कमी)
  • विदर्भ विभाग - 73% (राज्यात सर्वात कमी)
  • संपूर्ण राज्य - 94.85% 

(नक्की वाचा-  लोक हसले, पण गडी खचला नाही; 4 आंबे साडेतीन लाखांना विकून दाखवले, उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्याची देशभर चर्चा)

राज्यातील खरीप पेरणीचा आढावा

एकूण पेरणी क्षेत्र: राज्यात चालू वर्षात आजअखेर 120.84 लाख हेक्टर (84%) क्षेत्रावर पेरणी झाली आहे. 
पेरणीत आघाडी: अमरावती विभागात सर्वाधिक 28.95 लाख हेक्टर म्हणजे 92% पेरणी झाली आहे.
सर्वात कमी पेरणी: ठाणे विभागात सर्वात कमी 1,54,674 हेक्टर म्हणजे 39% पेरणी झाली आहे.
विदर्भ विभाग: विदर्भात आतापर्यंत 81% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे.


Topics mentioned in this article