Yavatmal News: गर्भपाताच्या गोळीने 17 वर्षीय मुलीचा मृत्यू, शिक्षकाला अटक तर डॉक्टरचीही चौकशी सुरू

Yavatmal News: पीडितेच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुलगी बारावीची विद्यार्थिनी होती आणि ती साडेचार महिन्यांची गर्भवती होती.

जाहिरात
Read Time: 2 mins

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरात एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा गर्भपाताची गोळी घेतल्यानंतर मृत्यू झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी मुलीवर बलात्कार करणाऱ्या शिकवणी शिक्षकाला अटक केली असून, तिला गर्भपाताची गोळी देणाऱ्या डॉक्टरचीही चौकशी सुरू आहे.

पीडितेच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुलगी बारावीची विद्यार्थिनी होती आणि ती साडेचार महिन्यांची गर्भवती होती. बदनामीच्या भीतीने तिच्या वडिलांनी नांदेड येथील एका डॉक्टरशी संपर्क साधला, ज्याने तिला गर्भपातासाठी काही गोळ्या दिल्या. मात्र, या गोळ्या घेतल्यानंतर मुलीची प्रकृती बिघडली आणि तिला गंभीर रक्तस्राव सुरू झाला. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

(नक्की वाचा-  Ambernath: अंबरनाथमध्ये 'ड्रग्ज माफिया' पती-पत्नीला अटक; एकावर 21 तर दुसऱ्यावर 4 गुन्हे दाखल)

शिक्षकानेच केला होता बलात्कार

या घटनेनंतर पोलिसांनी 28 वर्षीय शिकवणी शिक्षक संतोष गुंडेकर याला अटक केली आहे. संतोष गुंडेकरवर डिसेंबर 2024 पासून अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी मृत्यूपूर्वी मुलीने दिलेला जबाब नोंदवून घेतला आहे. हा जबाब या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा मानला जात आहे.

(नक्की वाचा : Dombivli : डोंबिवली हादरले: नमाजासाठी आलेल्या तरुणांना पोलिसांसमोरच मारहाण; शिंदे गटाच्या सरपंचावर आरोप )

डॉक्टरचीही चौकशी सुरू

या प्रकरणात पोलिसांनी केवळ शिक्षकावरच कारवाई केली नाही, तर नांदेडच्या त्या डॉक्टरवरही लक्ष केंद्रित केले आहे. पोलिसांनी सांगितले की, त्या डॉक्टरकडे गर्भपातासाठी आवश्यक असलेल्या कायदेशीर परवानग्या नव्हत्या. तरीही त्याने मुलीवर उपचार केले. सध्या डॉक्टरचीही सखोल चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे पुसद शहरात संतापाचे वातावरण असून, आरोपी शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Advertisement

Topics mentioned in this article