मनोज सातवी, मीरा- भाईंदर:
Mira Bhayandar Flat Dispute: मुंबईमध्ये मराठी- हिंदी भाषावादाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. परप्रांतियांकडून वारंवार मराठीचा अपमान केला जात असल्याने मनसे, शिवसेना आक्रमक होत आहे. अशातच मीरा-भाईंदर मध्ये शाकाहारी मांसाहारी वाद चव्हाट्यावर आला आहे. भाईंदर पश्चिमेत केवळ शाकाहारी खाणाऱ्यांनाच फ्लॅटची विक्री केली जात असल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्याने केला आहे.
फक्त मारवाडी- ब्राम्हणांनाच फ्लॅट...
समोर आलेल्या माहितीनुसार, मीरा-भाईंदरमध्ये शाकाहारी मांसाहारी वाद पुन्हा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाईंदर पश्चिम येथील श्री स्कायलाईन या गृह प्रकल्पात फ्लॅट खरेदीसाठी आलेल्या काँग्रेसचे पदाधिकारी असलेल्या रविंद्र खरात यांना “मारवाडी जैन किंवा ब्राह्मण असाल तरच फ्लॅट मिळेल” असे सांगत जात विचारून फ्लॅट देण्यास नकार दिल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे.
Thane Metro News: ठाणे मेट्रो कधीपर्यंत धावणार? प्रताप सरनाईकांनी सांगून टाकलं, पण..
या विरोधात खरात यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, समाजकल्याण मंत्री, महारेरा, ठाणे जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तालय अशा अनेक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार संविधानातील कलम 14-15, BNS 2023 आणि SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे सरळ उल्लंघन असून “घटनात्मक अधिकारांसाठी माझी लढा सुरूच राहील,” अशी ठाम भूमिका रविंद्र बाबासाहेब खरात यांनी घेतली आहे.
'मांसाहार खाणाऱ्यास घर नाही'
रविंद्र खरात यांनी सांगितले की, त्यांच्या मित्रांसोबत ते श्री स्कायलाईन या गृहप्रकल्पामध्ये फ्लॅट खरेदीबाबत चौकशी करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना इथे फक्त जैन आणि मारवाडी लोकांनाच फ्लॅट दिले जातात असं सांगण्यात आले. भारतीय संविधानानुसार सर्वांना समान हक्क असताना याठिकाणी जात- लिंगाच्या आधारे फ्लॅट दिले जातात, हे अत्यंत धक्कादायक आहे.
Mumbra Video: पोलिसांसमोरच टोईंग व्हॅनवरून बाईक खाली उतरवली; चूक कुणाची?
त्याचबरोबर तुम्ही जर मराठी असाल, तुम्ही मांसाहार करत असाल, तुमची जात जैन किंवा मारवाडी नसेल तर तुम्हाला फ्लॅट दिला जाऊ शकत नाही, असं इथल्या प्रतिनिधींनी सांगितले आहे. सरळसरळ इथे जायीवाद, धर्मवाद आणि भाषावाद करण्याचा हा प्रकार आहे. संबंधित बिल्डरवर कारवाई व्हावी, अशी मागणी रविंद्र खरात यांनी केली आहे.