Maharashtra Politics: ठाकरे गटात भूकंप, केंद्रबिंदू कोकण! सर्वात मोठा शिलेदार फुटला

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरु असून उद्धव ठाकरेंना धक्क्यांमागून धक्के बसत आहेत. आज एकनाथ शिंदेंचा कोकण दौरा होणार असून या दौऱ्यात मोठे प्रवेश होणार आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

राकेश गुडेकर रत्नागिरी: राज्याच्या राजकारणात सध्या शिवसेना शिंदे गटाच्या ऑपरेशन टायगरची चर्चा आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरु असून उद्धव ठाकरेंना धक्क्यांमागून धक्के बसत आहेत. आज एकनाथ शिंदेंचा कोकण दौरा होणार असून या दौऱ्यात मोठे प्रवेश होणार आहेत. या दौऱ्याआधी ठाकरेंना आणखी मोठा हादरा बसला असून शिवसेना आमदार भास्कर जाधव यांचे चुलत बंधूही आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची रत्नागिरीमध्ये आभार सभा पार पडणार आहे.  रत्नागिरीमधील चंपक मैदानात अडीचच्य सुमारास ही सभा होणार असून या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. एकनाथ शिंदेंच्या या दौऱ्यात मोठे पक्षप्रवेश होणार असून त्याची यादीच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी वाचून दाखवली.

माजी आमदार सुभाष बने, माजी आमदार  कदम, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष रोहन बने,  शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख विलास चाळके, शिवसेना जिल्हा सह संपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रचना महाडिक आज शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. 

(नक्की वाचा- Amravati News: 'भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही पण..', कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांना हिणवलं)

आज प्रवेश करणाऱ्यांची लिस्ट वाचत बसलो तोवर एकनाथ शिंदे साहेब लँड होतील... 150 हुन अधिक प्रमुख पदाधिकारी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सोडून आमच्याकडे येतील.  पराभवानंतर अनेक नेत्यांनी आपलं काय चुकलं याचा आत्मचिंतन केले. लोक का जात आहेत याचे आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असंही उदय सामंत म्हणाले. 

Advertisement

दरम्यान, आजच्या पक्षप्रवेशामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे निष्ठावंत शिलेदार भास्कर जाधव यांच्या भावाचाही समावेश आहे. आमदार भास्कर जाधव यांचे चुलत बंधु, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळशेठ जाधव आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे भविष्यात भास्कर जाधवही शिंदेच्या शिवसेनेत जाणार की काय? अशी चर्चा रंगली आहे.