Mumbai News: राज्यातील रुग्णांसाठी मोठी बातमी, विधानसभा अध्यक्षांनी दिला महत्त्वाचा आदेश

Maharashtra News: सगळ्या महत्त्वाच्या रुग्णालयांचे प्रतिनिधी होते.  याशिवाय काही मंत्री देखील या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीमध्ये विधानसभा अध्यक्षांनी महत्त्वाचे आदेश दिले आहेत. 

जाहिरात
Read Time: 2 mins

मुंबई: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गुरुवारी एक महत्त्वाचा आदेश दिला. या आदेशामुळे सगळ्या आमदारांसह वैद्यकीय सेवेसाठी झगडणाऱ्या तमाम रुग्णांना मोठा फायदा होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एक बैठक बोलावली होती. या बैठकीला धर्मादाय आयुक्त, धर्मादाय आयुक्त कार्यालयातील अधीक्षक, सगळ्या महत्त्वाच्या रुग्णालयांचे प्रतिनिधी होते.  याशिवाय काही मंत्री देखील या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीमध्ये विधानसभा अध्यक्षांनी महत्त्वाचे आदेश दिले आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत बोलताना म्हटले की, "आज एक बैठक बोलावण्यात आली होती. धर्मादाय आयुक्त, धर्मादाय आयुक्त कार्यालयातील अधीक्षक, सगळ्या महत्त्वाच्या रुग्णालयांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.  विधान भवनात एक कक्ष निर्माण करणार आहोत. आमदारांनी एखाद्या रुग्णाला दाखल करण्यासाठी सांगितले असेल त्याची पूर्तता झाली नसेल तर  हा कक्ष पुढील कारवाई करून त्या आमदाराला सहकार्य देईल."

राज्यातील आमदारांकडे रुग्णालयात दर्जेदार उपचार परवडणाऱ्या दरात मिळावे यासाठी अनेक रुग्णांचे नातेवाईक येत असतात. आमदार या रुग्णांना धर्मादाय आयुक्तांच्या अखत्यारीत येणाऱ्या रुग्णालयांमध्ये पाठवत असतात. मात्र रुग्णांना तिथे खाट न मिळणे किंवा चांगले उपचार न मिळणे यासह विविध तक्रारींचा सामना करावा लागतो. रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना यामध्ये हस्तक्षेपासाठी आमदारांकडे पुन्हापुन्हा जावे लागते. अनेकदा प्रयत्न करूनही आमदारांना दाद मिळत नाही. याची दखल विधानसभा अध्यक्षांनी घेतली आहे. 

(नक्की वाचा-  Pune News : पुण्यातील या ठिकाणाचे नाव बदलण्याची डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी)

विधानसभा अध्यक्षांचा ताकीदवजा आदेश
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले की, "सरकारला निर्देश देतोय की महाराष्ट्रात 556 धर्मादाय आयुक्तांच्या अखत्यारीत येणारी रुग्णालये आहेत. यामध्ये त्वरीत एक फलक मोक्याच्या जागेवर लावा. त्या रुग्णालयामध्ये आऱक्षित खाटा किती, त्या दिवशी किती बेड भरलेले आहेत, किती रिकामे आहेत याची माहिती फलकावर दिसली पाहीजे. याचे पालन त्वरीत व्हायला हवे."

Advertisement