Rohit Pawar: 'गोट्या खेळत होता का? तुमच्या बापाचा पैसा नाही', रोहित पवारांनी अधिकाऱ्याला झापलं, आमसभेत घमासान

Rohit Pawar News: नागरिकांच्या तक्रारीवर मोघम उत्तर देणाऱ्या अधिकाऱ्याची रोहित पवार यांनी कान उघडणी केली. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

MLA Rohit Pawar Jamkhed VIDEO:  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे त्यांच्या आक्रमकपणासाठी ओळखले जातात. शुक्रवारी रोहित पवार यांच्या जामखेड मतदार संघातील आमसभेवेळीही रोहित पवार यांचा असाच आक्रमकपणा पाहायला मिळाला. नागरिकांच्या तक्रारीवर मोघम उत्तर देणाऱ्या अधिकाऱ्याची रोहित पवार यांनी कान उघडणी केली. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  शुक्रवारी जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवार यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या आमसभेत शासकीय कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी नागरिकांनी जामखेड नगरपरिषदेच्या माध्यमातून सुरू असलेल्या गटार योजनेत ठेकेदारांकडून होत असलेले निकृष्ट दर्जाचे काम उघड केले. तक्रारींवर अधिकाऱ्यांकडून मोघम उत्तरे मिळताच आमदार रोहित पवारांचा आक्रमकपणा पहायला मिळाला. 

Wardha News : पुणे सोडलं अन् शेतकरी झाला; मॅकेनिकल इंजिनियर तरुणाच्या पिकाला सोन्याचा भाव, राज्यभरात चर्चा

आतापर्यंत गोट्या खेळत होता का? तक्रार करणारे नागरिक बावळट, वेडी आहेत काय? तू मिजासखोर बनू नकोस. हा तुमच्या बापाचा पैसा नाही, लोकांचा पैसा आहे. जास्त अहंकार आणि अटीट्यूड दाखवू नकोस,” अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्याला सुनावले. यापुढे अशा कामचुकार अधिकाऱ्यांनी जबाबदारी घेतली नाही, तर जनतेला थेट शेण थापायला सांगा  अशी फटकारणी देखील आमदार पवारांनी केली. या प्रसंगामुळे सभागृहात चांगलाच खडाजंगी माहोल पाहायला मिळाला. रोहित पवार यांचा हा व्हिडिओ सध्या माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.