Rohit Pawar On NCP Merjer: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत नवनव्या चर्चा रंगताना दिसत आहेत. अजित पवार यांची दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावे अशी इच्छा होती, तसा निर्णयही होणार होता, असा दावा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने केला आहे. मात्र अजित पवार गटातील मुख्य नेत्यांनी अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचं म्हटलं आहे. यावरुनच आता आमदार रोहित पवार यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे.
काय म्हणाले रोहित पवार?
"राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा अजित पवार गटाकडूनच होत आहे. अजित दादा असताना त्यांच्याशी काय चर्चा झाली हे आम्हाला माहित आहे. अजित दादांशी बोलत असताना आम्ही एनडीएसोबत जायचे की दादा आमच्यासोबत येऊन रस्त्यावरील लढाई लढणार ही चर्चा दादांमध्ये आणि आमच्यामध्ये झाली होती होता. आज दादा नसल्याने या विषयांवर चर्चा करणे गौण आहे, त्यामुळे दादा गेल्यानंतर लगेच आमच्यासाठी या विषयाला पूर्णविराम लागला आहे, असं रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
Sunetra Pawar: दादांप्रमाणे वहिनींचा रुद्रावतार, NCP बैठकीत 'त्या' आमदाराला झाप झापलं
जयंत पाटील यांच्या घरासमोरील सीसीटीव्ही तपासा..
"राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा त्यांच्याकडूनच पुन्हा पुन्हा होत आहे. त्या पक्षामध्ये काही नेत्यांचे महत्त्व राहावे म्हणून ते आम्हाला सुप्रिया सुळे, पवार साहेबांना विरोध करत आहेत. आम्हाला विरोध करत आहेत म्हणून त्यांचे महत्त्व आहेत. सोपा विषय आहे, अजित पवार जेव्हा जेव्हा भेटायचे तेव्हा ते जयंत पाटील साहेबांच्या घरी भेटायचे. जयंत पाटील यांच्याघरासमोर लोढा साहेबांचे घर आहे. तिथे सीसीटीव्ही कॅमेरे असतील, त्याचे फुटेज आणा, मग १३ वेळा भेटले की १४ वेळा भेटले बघा.." असे आव्हानही त्यांनी दिले आहे.
"उद्या सकाळी साडे दहा वाजता आम्ही पत्रकार परिषद घेणार आहे. याप्रकरणात ज्या पद्धतीने सरकारचा तपास सुरु आहे, तो मंदगतीने होत आहे. डिटेलमध्ये तपास होताना दिसत नाही. ब्लॅक बॉक्स ऊन, पाऊस, आगीपासून सुरक्षित आहे, मात्र राजकारणापासून सुरक्षित नाही. यामध्ये काय राजकारण सुरु आहे, हे पाहावं लागेल," असे मोठे विधानही रोहित पवार यांनी यावेळी केले.