जाहिरात

Narhari Zirwal News: 'पक्षाच्या प्रतिमेची काळजी घ्या', लाच प्रकरणी सुनेत्रा पवारांची नरहरी झिरवळांकडे नाराजी

Narhari Zirwal News: मंत्रालयातील नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील लाच प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी झिरवळ यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

Narhari Zirwal News: 'पक्षाच्या प्रतिमेची काळजी घ्या', लाच प्रकरणी सुनेत्रा पवारांची नरहरी झिरवळांकडे नाराजी
"Narhari Zirwal Ministry Bribe Case: नरहरी झिरवळ यांच्याकडे सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली नाराजी"
NDTV Marathi

Narhari Zirwal News: मंत्रालयातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) अंतर्गत खळबळ उडाली आहे. कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवळ (Narhari Zirwal News) यांच्या मंत्रालयाच्या कार्यालयातील कर्मचारी लाच प्रकरणात अडकल्याने पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेषतः उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (DCM Sunetra Pawar) यांनी झिरवळ यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.  

नेमके प्रकरण काय?

मंत्रालयातील अन्न आणि औषध प्रशासन विभागातील लिपिक राजेंद्र ढेरिंगे (वय 35 वर्षे) याला एसीबीने लाच घेतल्याप्रकरणी  रंगेहाथ अटक केली. अटकेची कारवाई केल्यानंतर त्याच्या कार्यालयातून 42 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आलीय. तसेच ढेरिंगेच्या नाशिक शहरातील घरी छापा टाकून सर्च ऑपरेशन राबवण्यात आले. अन्न आणि औषधी प्रशासन मंत्र्यांकडील अपील अर्जावर सकारात्मक निर्णयासाठी लाच मागितल्याचे तपासात समोर आले. या मुद्यावरून विरोधी पक्षातील नेतेमंडळीही जोरदार टीका करत आहेत. 

(नक्की वाचा: Ajit Pawar Death News: शंका अधिक बळावत चालल्या आहेत, रोहित पवारांच्या नव्या पोस्टने मोठी खळबळ)

सुनेत्रा पवार आणि वरिष्ठ नेत्यांची नाराजी

नरहरी झिरवळ यांनी सोमवारी (16 फेब्रुवारी) उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच पक्षातील इतर वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या भेटीदरम्यान सुनेत्रा पवार यांनी आपली नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली. "वैयक्तिक आणि पक्षाच्या प्रतिमेची काळजी घ्यावी, प्रशासकीय अधिकारी बदनाम होणार नाहीत, याची खबरदारी घ्या" अशा सूचना सुनेत्रा पवार तसंच पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी झिरवळ यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com